कोरेगाव हद्दीत एसटी बसच्या धडकेत चिमुरडा ठार; बसचालकावर गुन्हा

Crime News 7

सातारा प्रतिनिधी । सातारा – पुसेगाव मार्गावर कोरेगाव तालुक्यातील गोळेवाडी गावच्या हद्दीतील एका हॉटेलसमोर भरधाव एस.टी.ने चार वर्षांच्या चिमुरड्याला पाठीमागून धडक दिली. यात हा चिमुरडा ठार झाला. श्रवण प्रसाद गोळे (वय ४, रा. सद्‌गुरूनगर, कोरेगाव) असे त्याचे नाव आहे. अपघाताची नोंद कोरेगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. रविवारी रात्री पुसेगाव-सातारा ही बस (क्रमांक एम. एच. २० … Read more

जयकुमार गोरेंना कोविड घोटाळा भोवणार; हायकोर्टाने सातारा पोलीस अधीक्षकांना खडसावले

Jaykumar Gore News 20241113 083126 0000

सातारा प्रतिनिधी | कोविड घोटाळा भाजपचे सातारा येथील उमेदवार जयकुमार गोरेंच्या चांगलाच अंगलट आला आहे. या घोटाळ्याचा तपास कोणाच्याही दबावाखाली करू नका, असे उच्च न्यायालयाने मंगळवारी सातारा पोलीस अधीक्षकांना खडसावले आहे. घोटाळ्याचा निःसंदेह तपास करून त्याचा अहवाल पुढील सुनावणीत सादर करा, असे आदेशही न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सातारा पोलिसांना दिले … Read more

रणदुल्लाबादमधील 17 वर्षीय विद्यार्थ्यांचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू

Crime News 1 2

सातारा प्रतिनिधी । कोरेगाव तालुक्यातील रणदुल्लाबाद येथील एका १७ वर्षीय बारावीतील विद्यार्थ्यांचा डेंग्यूसदृश आजाराने सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. अथर्व हणमंत जगताप असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबासह गावात शोककळा पसरली आहे. याबाबट अधिक माहिती अशी की, गावातील हणमंत जगताप यांच्या घराजवळ सांडपाणी तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. या … Read more

राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची अवैध दारु वाहतूकीवर कारवाई; 64 हजार 620 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

Crime News 20241112 083836 0000

कराड प्रतिनिधी | विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने ठिकठिकाणी छापा सत्र राबविले जात आहे. दरम्यान, कराड तालुक्यातील वाठार गावचे हद्दीत बेकायदेशीर देशी/विदेशी दारुची वाहतूकीवर सोमवारी धडक कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संचालक प्रसाद सुर्व, विजय चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर … Read more

मायणीच्या चितळीत 155 लिटर ताडी जप्त; मायणी पोलिसांची धडक कारवाई

Crime News 20241112 081505 0000

सातारा प्रतिनिधी | विनापरवाना ताडीची चोरटी विक्री करणाऱ्या खटाव तालुक्यातील चितळी येथील एकावर मायणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीकडून ५ कॅनमधील १५५ लिटर ३ हजार शंभर रुपये किमतीची ताडी जप्त करण्यात आली आहे. अंबाती रमेश नारायण गौड (वय ४३, रा. चितळी, ता. खटाव) असे गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत अधिक … Read more

जंगली हिंस्र प्राण्यांची 30 लाखांची नखे जप्त; सांगलीच्या एकास अटक, अन्य एकजण फरार

Crime News 20241112 075129 0000

कराड प्रतिनिधी | जंगली हिंस्र प्राण्याच्या नख्यांची तस्करी करण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांकडून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले असून त्याचा साथीदार पोलिसांना गुंगारा देत पसार झाला. शहरातील शनिवार पेठेत सागर लॉजनजीक असलेल्या तीन मजली इमारतीच्या टेरेसवर रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून पोलिसांच्यावतीने ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने … Read more

कराड शहर पोलिसांची दमदार कारवाई, ओगलेवाडी घरफोडीच्या गुन्ह्यातील 58 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 20241111 211518 0000

कराड प्रतिनिधी | ओगलेवाडी (ता. कराड) येथील घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी दागिने आणि रोख रक्कम मिळून 58 लाखांचा मुद्देमाल कराड शहर पोलिसांनी हस्तगत केला आहे. याप्रकरणी एका सराईत गुन्हेगारासह त्याच्या साथीदारास अटक करण्यात आली आहे. ओगलेवाडी ता. कराड येथे इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील खिडकीचा गज कापून दोरीच्या साह्याने घरात प्रवेश करून बेडरूमचा दरवाजा … Read more

वाई पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगारास सातारा जिल्ह्यातून हद्दपार

Wai News

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून वाई तालुक्यातील एकावर तडीपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. विजय लक्ष्मण अंकोशी (रा धोम कॉलनी ता. वाई जि सातारा) असे तडीपार करण्यात आल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ अनुषंगाने सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक श्री. समीर शेख यांनी कायदा सुव्यवस्था … Read more

पत्नीवर कोयत्याने हल्ला करण्यास आलेल्या हल्लेखोर पतीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 20241111 090835 0000

सातारा प्रतिनिधी | पती संशयित नजरेने पाहून सतत वादावादी करत असल्याने आठ महिन्यांपासून माहेरी रहात असलेल्या पत्नीचा खून करण्यासाठी आलेल्या पतीला भुईंज पोलिसांनी अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. स्वप्निल वालचंद सोनावणे (रा. नायगाव ता. दौंड, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील ओझर्डे … Read more

मद्यपी क्रेन चालकाची दुचाकीस भीषण धडक; कराडच्या 2 महिला ठार तर एक गंभीर जखमी

Crime News 20241111 080952 0000

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोर्टी तालुका कराड गावच्या हद्दीत स्कूटी दूचाकीला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाच्या चालकाने दारुच्या नशेत भीषण धडक दिली. या भीषण धडकेत दोन महिला जागीच ठार झाल्या तर अठरा वर्षीय युवती गंभीर जखमी झाली आहे. सदरचा अपघात रविवार दिनांक १० नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला. रुक्मिणी परदेसी (36) व … Read more

यवतेश्वर घाटात ड्रंक अँड ड्राईव्हचा थरार; कार पलटी होऊन युवक जखमी

Crime News 6

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील यवतेश्वर घाटात शनिवारी सकाळी ड्रंक अॅन्ड ड्राईव्हचा थरार घडला. पुण्याचा युवक दारू पिऊन चारचाकी गाडी चालवत होता. तोच गाडीवरील नियत्रंण सुटल्याने अपघात होऊन गाडी पलटी झाली. देव बलवत्तर म्हणून युवकाचे प्राण वाचले. सकाळी घाटात वाहनांची संख्या कमी असल्याने मोठा अनर्थ टळला. पुण्याहून कास-यवतेश्वरला फिरण्यासाठी एक युवक शनिवारी सकाळी आला होता. … Read more

बंदुकीच्या छऱ्यामुळे जखमी झालेल्या 24 वर्षाच्या युवकाचा अखेर मृत्यू

Crime News 20241110 090340 0000

पाटण प्रतिनिधी | बंदुकीचा छरा लागल्याने एक युवक जखमी झाल्याची घटना पाटण तालुक्यातील नावडी येथे घडली होती. जखमी झालेल्या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रसाद वामन जामदार (वय २४, रा. नावडी) असे मृताचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाटण तालुक्यातील नावडी गावात असलेल्या एका चौकात दि. २९ ऑक्टोबरला रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास काही … Read more