कराडला पोलिसांकडून तब्बल 581 जणांवर प्रतिबंधक कारवाई

Karad News 20241119 092955 0000

कराड प्रतिनिधी | तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ५८१ गुन्हेगारावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने ७२ जणांना मतदान पूर्ण होईपर्यंत (ता. २३) हद्दपार केले आहे. त्यांना तालुका पोलिसाच्या हद्दीत थांबण्यास किंवा प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. संबंधित सराईत गुन्हेगार हद्दीत मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. … Read more

लग्न ठरत नसल्याने तरुणाने संपवले जीवन, साताऱ्यात घटनेमुळे खळबळ

Crime News 20241118 205348 0000

सातारा प्रतिनिधी | लग्न ठरत नसल्याच्या नैराश्यातून सचिन धोंडिबा सावंत (वय ३६, रा. मुळीकवाडी, पो. तासगाव, ता. सातारा) याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दि. १६ रोजी रात्री नऊ वाजता घडली. याबाबत अधिक माहिती अशी की,सचिन सावंत हा ट्रकचालक म्हणून काम करत होता. गेल्या काही वर्षांपासून लग्नासाठी स्थळ बघणे सुरू होते. मात्र, … Read more

कराडच्या कोळेवाडीत पैशांचे वाटप करताना एकजण रंगेहाथ सापडला Video व्हायरल…; पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल

Karad News 20241118 172458 0000

कराड प्रतिनिधी | कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात महायुतीकडून भाजपचे डॉ. अतुल भोसले तर महाविकास आघाडी कडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण निवडणूक लढवत आहेत. आरोप प्रत्यारोप यांनी कराड दक्षिण मतदार संघातील वातावरण चांगलेच तापले असताना महायुतीचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्याकडून कराड तालुक्यातील कोळेवाडी येथे पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ रविवारी सोशल मिडीयामध्ये व्हायरल झाल्याने … Read more

कराड तालुक्यातील ‘या’ गावात एलसीबीची मोठी कारवाई, पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरूणास अटक

Crime News 20241118 144105 0000

कराड प्रतिनिधी | सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. मतदान अवघ्या दोन दिवसांवर असताना स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली आहे. तांबवे (ता. कराड) येथील एका संशयिताकडून पिस्तूल जप्त करण्यात आलं आहे. तांबवेतील कोयना नदीवरील पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. सौरभ मधुकर कांबळे (रा. साजूर ता. कराड) असं संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून … Read more

देवदर्शनासाठी जाताना कुटुंबावर काळाचा घाला; कार कालव्यात पलटी होऊन चारजण जागीच ठार, 7 गंभीर जखमी

Crime News 20241118 112759 0000

सातारा प्रतिनिधी | वाखरी- शिरढोण बायपास मार्गावर शिरढोणमध्ये कालव्यात भरधाव चारचाकी मोटार पलटी होऊन पवारवाडी (ता. फलटण) येथील चार जण जागीच ठार झाले, तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व जण तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाले होते. एकनाथ दत्तू निंबाळकर, शोभा धनाजी कान्हेरकर, विराज ऊर्फ रुद्र एकनाथ निंबाळकर व चालक सुदाम तानाजी नलवडे (सर्व रा. … Read more

सातारा पोलिसांकडून 170 सराईत तडीपार; विधानसभेच्या मतदानास उपस्थित राहता येणार

Satara News 59

सातारा प्रतिनिधी । सातारला जिल्ह्यातील आठ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा शहर पोलिस अलर्ट झाले आहे. पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून १७० सराईत गुन्हेगारांना १७ ते २४ नोव्हेंबर दरम्यान तडीपार केले आहे. तर ६६८ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. मात्र, सातारा शहर पोलिस ठाणे हद्दीतून तडीपार करण्यात आलेल्या गुन्हेगारांना विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. … Read more

वाहने आडवून लूटमार करणारी टोळी जेरबंद; टोळीत कराड, माणमधील आरोपींचा समावेश

Phaltan News 20241114 202855 0000

सातारा प्रतिनिधी | मोहोळ पोलीस ठाणेकडील डीबी पथकाला बेकायदेशीर हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर योग्य ती कारवाई करण्याकरीता उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर आणि पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यातील स्टाफ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वाहने अडवून लुटमार करणाऱ्या टोळीस अटक केली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड, माण … Read more

कोल्हापूर परिक्षेत्रात आचारसंहिता काळात सापडलं 20 कोटींचं घबाड, रोख रक्कम, दागिने, अवैध शस्त्रांसह अंमली पदार्थ जप्त

Crime News 8

सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता काळात कोल्हापूर परिक्षेत्रात कोट्यवधींच्या रोकडसह दागिने, मद्यसाठा, अंमली पदार्थांसह २० कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी माध्यमांना दिली आहे. पावणे सात कोटींची रोकड जप्त विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून ते १० नोव्हेंबरपर्यंत कोल्हापूर परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये ६.६४ कोटी रूपयांची रोकड, २.८३ कोटी रुपये … Read more

गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी प्रवाशाच्या बॅगमधून 14 तोळे सोन्याच्या दागिन्यांचा डबा केला लंपास

Satara News 54

सातारा प्रतिनिधी | सातारा बसस्थानकातून प्रवाशांना चोरट्यांपासून सावधान राहण्याच्या वारंवार सूचना केल्या जात असून देखील सातारा बसस्थानक ते ठाणे दरम्यान प्रवासात प्रवाशाचे तब्बल १४ तोळे सोने चोरी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी सुनील नथुराम कदम (रा. रायघर, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल झाला असून तपासासाठी हा गुन्हा मुंबई पोलिसांकडे … Read more

माण – खटाव मतदारसंघात ट्रम्पेट चिन्हावरून झाला वाद; उमेदवारावर गुन्हा दाखल

Crime News 20241114 083425 0000

सातारा प्रतिनिधी | माण-खटाव विधानसभा मतदारसंघात निवडणूक आयोगाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता उमेदवार सत्यवान विजय ओंबासे (रा. वडगाव ता. माण) यांनी मतदारांवर गैरवाजवी प्रभाव पाडण्यासाठी डिजिटल फ्लेक्सवर ट्रम्पेट या चिन्हाच्या समोर कंसात तुतारी असे लिहून आणि स्पीकरवर ऑडिओ क्लिप प्रसारित केल्याने सदरच्या गाडीवर व उमेदवारावर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक … Read more

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील BLO कडून आदेशाचा भंग; कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Karad Crime News 20241113 200240 0000

कराड प्रतिनिधी | २६० कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील एका बीएलओ यांनी मतदार ओळखचिठ्या ताब्यात न घेता त्या वाटप करण्यासाठी पर्यवेक्षकांनी दिलेल्या आदेशाचा भंग केला आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण केल्याने त्यांच्या विरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. श्रीमती तेजस्विनी ऋषिकेश कुंभार (रा. पाटण … Read more

बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील 2 सराईत गुन्हेगार सातारा जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार

Satara News 30

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये राहणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार दोघांना सातारा जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. अमोल उर्फ गोंज्या आण्णा मोहिते (वय 35 वर्षे रा. नागठाणे ता.जि. सातारा) व विक्रम अधिक यादव (वय 31 वर्षे रा अतीत ता. जि. सातारा) … Read more