आले व्यापाऱ्याकडून कृषी सेवा केंद्र चालकावर कोयत्याने वार

Crime News 20240121 064306 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथे एका आले व्यापाऱ्याने कृषी सेवा केंद्र चालकावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली. सुमारे यात चालक जखमी झाला आहे. याप्रकरणी रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पंढरीनाथ नारायण गायकवाड (वय ४८) असे जखमी चालकाचे नाव असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पंढरीनाथ नारायण … Read more

विटांनी भरलेली ट्रॉली अंगावरुन गेल्यान ‘त्याच्या’ डोळ्यादेखत ‘तिचा’ झाला मृत्यू

Crime News 20240121 055228 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शिंगणापूर-दहिवडी घाट महामार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ विटांनी भरलेली ट्रॉली महिलेच्या अंगावरुन गेल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना घडली. रंजना वाघमारे (मूळ रा. नांदेड, सद्या रा. मांडवे, ता. माळशिरस) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मांडवे (ता. माळशिरस) या ठिकाणाहून विटांनी भरलेल्या दोन ट्रॉली असलेला ट्रॅक्टर (क्र.एमएच ११ यु … Read more

तडीपार असून देखील कराडात वावरत होता, डीबी पथकाने सापळा रचून संशयिताला केली अटक

Karad News 20240120 200158 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दोन वर्ष तडीपार केले असताना कराडमध्ये प्रवेश करून कोल्हापूर नाका परिसरात छुप्या पद्धतीने वावरताना आढळलेल्या संशयिताला कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. आबीद आलम मुजावर (रा. पालकर वाडा, मंगळवार पेठ, कराड), असे त्याचे नाव आहे. दोन वर्षांसाठी केलं आहे तडीपार आबीद मुजावर हा कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील … Read more

राजवाडा नगरवाचनालय परिसरात अर्धवट जळलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

CRIME NEWS 20240120 141020 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील राजवाडा परिसरात आज पहाटेच्या सुमारास नगर वाचनालयाजवळ एकाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे सातारा शहरात एकच खळबळ उडाली. गोपाल विजयकुमार लकेरी (वय 49 वर्षे, रा. 102 प्रतापगंज पेठ, सातारा) असे संबंधित मृत व्यक्तीचे नाव आहे. संबंधित व्यक्तीचा मृतदेह हा पायापासून मांड्यापर्यंत अर्धवट जळालेल्या स्थितीत होता. सकाळी फिरायला गेलेल्या … Read more

सातारा-कास रस्त्यावर भरधाव कारचा टायर फुटला;पहा व्हिडिओ

Satara News 20240120 082956 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भरधाव गाडीचा टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले अन् कारने रस्त्याकडेला असलेल्या हॉटेलच्या भिंतीला धडक दिली. सातारा-कास मार्गावर गुरुवारी दुपारी हा थरारक अपघात झाला. या घटनेच्या वेळी समोरून एक दुचाकीस्वार येत होता. त्याच्या गाडीवर पत्नी आणि मुले होती. सुदैवाने कार रस्त्यातून बाजूला जाऊन हॉटेलच्या संरक्षक भिंतीला धडकली. अन्यथा भीषण अपघात घडला असता. … Read more

दहिवडी-नातेपुते मार्गावर अज्ञात वाहनाची बसली तरसाला धडक, पुढं घडलं असं काही…

Satara News 20240119 102220 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | दरवर्षी अज्ञात वाहनांच्या धडकेत अनेक वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो. अशीच एक घटना माण तालुक्यातील दहिवडी-नातेपुते मार्गावर वावरहिरे येथे घडली. या ठिकाणी तरस हा वन्य प्राणी मृतावस्थेत आढळून आला आहे. दहिवडी-नातेपुते मार्गावर वावरहिरे येथे असणाऱ्या मोठ्या पुलाजवळ असलेल्या बाभळीच्या झाडाखाली तरस मृतावस्थेत आढळून आला. तरसाला अज्ञात वाहनाची धडक बसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला … Read more

कराड – पाटण मार्गावर ट्रक – दुचाकीचा भीषण अपघात

Karad News 20240119 083445 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड-चिपळूण मार्गावर वारूंजी गावच्या हद्दीत ट्रक व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला. निखील हणमंत जाधव (वय 19, रा. म्होप्रे, ता. कराड) असे अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील म्होप्रे येथील युवक निखील जाधव … Read more

भविष्य निर्वाह निधीच्या वरीष्ठ सहाय्यकास 3 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

Crime News 20240118 072546 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | भविष्य निर्वाह निधीचा खाते वर्ग आदेश काढण्यासाठी ज्युनियर कॉलेजच्या पर्यवेक्षकाकडून ३ हजार रुपयांची लाच घेताना सातारा जिल्हा परिषदेतील वेतन व भविष्य निर्वाह निधीच्या वरिष्ठ सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. हेमंत विठोबा हांगे, असे लाचखोर वरिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे. भविष्य निर्वाह निधीचा खाते वर्ग आदेश काढण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार … Read more

कराडची बुधवार पेठ स्फोटाने हादरली, गॅस शेगडीच्या ज्वाळांनी कपडे पेटल्याने 6 जण भाजले

Karad News 20240118 070008 0000 jpg

कराड प्रतिनिधी | शहरातील भर वस्तीतील बुधवार पेठेत बुधवारी रात्री साडे नऊच्या सुमारास एका घरात स्फोट झाला. या घटनेत सहा जण भाजले आहेत. सिलेंडरचा स्फोट झाल्याची वार्ता शहरभर झाली अन् प्रशासकीय यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, हा सिलेंडरचा स्फोट नसून पंख्याचा कंडेंसर तापून फुटल्याने मोठा आवाज झाला. अचानक झालेल्या आवाजामुळे छोट्याशा खोलीतील लोक हडबडले … Read more

पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला

Satara News 20240117 045215 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पंधरा दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलिसांच्या तावडीतून एक आरोपी पळाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पळालेल्या आरोपीला पकडण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले असून, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सूरज हणमंत साळुंखे (वय २२, सावली, सातारा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहूपुरी पोलिसांनी सूरज साळुंखे याला … Read more

बॉम्बे रेस्टॉरंटच्या चौकात दुचाकीला किक मारत त्यानं वाढवली रेस…

Crime News 20240116 122036 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा येथील लक्ष्मी टेकडीतील नातेवाइकांकडे आलेल्या एका युवकाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात घडली. आदिनाथ प्रकाश भोरे (वय २७, सध्या रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा. मूळ रा. शेटफळे, ता. आटपाडी, जि. सांगली) असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आदिनाथ भोरे याची आत्या … Read more

खंबाटकी घाटात ट्रकने घेतला पेट; आगीत ट्रकचे मोठे नुकसान

Crime News 20240114 115807 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुणे – सातारा मार्गावर खंडाळा हद्दीत शनिवारी रात्री बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. मालट्रकच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याने या घटनेत ट्रक जळून खाक झाला. त्यामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले. ट्रकने पेट घेतल्यानंतर महामार्गावर आगीचे लोळ उठत होते. आणि धुराचे लोट पसरले होते. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे – … Read more