महिलेची 10 लाखांची फसवणूक, उंब्रज पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल

Crime News 8 jpg

कराड प्रतिनिधी | जमिनीवर बँकेचा व पतसंस्थेच्या कर्जाचा बोजा असतानाही त्याच जमिनीची मुदत खरेदी दस्त करून महिलेची १० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकीही महिलेला दिली होती. याप्रकरणी सुनंदा जालिंदर हजारे (रा. वराडे, ता. कराड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हणमंत शंकर कारंडे (रा. उंब्रज, ता. कराड), रामकृष्ण बाबुराव … Read more

साताऱ्यात दहशतवादी असल्याच्या फोनमुळे पोलिसांची उडाली धावपळ, पुढे काय घडलं?

Satara News 46 jpg

सातारा प्रतिनिधी | मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला शुक्रवारी मध्यरात्री आलेल्या एका फोनमुळे राज्यातील पोलिसांची काही काळ झोप उडाली. साताऱ्यात काही दहशतवादी असून त्यांच्याकडे रडार असल्याची माहिती फोनवरून मिळाल्याने मध्यरात्रीपासूनच यंत्रणा कामाला लागली. फोन करणाऱ्याचा शोध लागल्यानंतर तपासात सर्व बाबींचा उलगडा झाला आणि पोलिसांचा जीव भांड्यात पडला. पंतप्रधान पुढील आठवड्यात सातारा दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

कराडात सराईत गुंडांचं पोलिसांनी तयार केलं डिजिटल क्राईम रेकॉर्ड

Karad News 20240210 213457 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे, नागपूरनंतर सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये आज शनिवारी (दि. १०) रोजी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. कराड उपविभागातील १९० गुन्हेगारांची यावेळी पोलिसांनी चांगलीच झाडाझडती घेतली. पोलीस ठाण्यात हजर राहण्याचा निरोप मिळाल्यापासून गुंडांचे धाबे दणाणले होते. बरोबर ठीक सकाळी दहा वाजण्याच्या ठोक्यावर गुंड पोलीस उपअधीक्षकांच्या ऑफिसमागील आवारात दाखल झाले. त्यानंतर साडे दहा वाजल्यापासून यादीनुसार … Read more

कराड DYSP कार्यालयात आज गुंडांची परेड, सकाळी 10 वाजता हजर राहण्याच्या सूचना

Karad News 20240209 233558 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे आणि नागपूर नंतर आता कराडमध्ये शनिवारी (दि. १०) रेकॉर्डवरील गुन्हेगारांची परेड होणार आहे. कराड उपविभागातील दोनशेहून अधिक गुन्हेगार या परेडमध्ये दिसतील. त्यात कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ८० जणांचा समावेश आहे. पोलिसांचा निरोप मिळाल्यापासून गुंडांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांसमोर ओळख परेड असल्याचे एव्हाना गुंडांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे डीवायएसपी कार्यालयात शनिवारी … Read more

गांजा विक्री प्रकरणी तिघांना अटक, पावणे सात लाखांचा गांजा जप्त

20240209 092806 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि फलटण ग्रामीण पोलिसांनी पिंपरद (ता. फलटण) गावच्या हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या तिघांना सापळा रचून पकडले. त्यांच्याकडून ६ लाख ४१ हजार रुपये किंमतीचा २५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सुनील भांग्या पावरा (रा. रोहिणी, ता. शिरपूर, जि धुळे), उमेश भाईदास पावरा (रा. बोराडी, ता. शिरपूर, … Read more

मलकापूर-आगाशिवनगर परिसरातून देशी बनावटीचे पिस्टल अन् काडतुसासह युवकास अटक

Crime News 20240208 103417 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मलकापूर-आगाशिवनगर परिसरातुन एक देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसासह एका युवकास अटक केली आहे. लवराज रामचंद्र दुर्गावळे (वय 29, रा. आगाशिवनगर- मलकापुर), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून 60 हजार रुपये किंमतीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील … Read more

साताऱ्यात विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा दाखल

Satara Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । नवरा बायकोचे भांडण झाल्यास त्याचा लहान मुलांवर देखील परिणाम होतो. कारण त्यावेळी त्या ठिकाणी ते भांडण लहान मुलेही पाहत व ऐकत असतात. त्याबाबत शिक्षा देखील होऊ शकते. असाच काहीसा प्रकार सातारा शहरात घडला असून सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा आज दाखल करण्यात आला आहे. स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलीसमोर बायकोला … Read more

धोकादायक वळणावर मालट्रकचा भीषण अपघात, ड्रायव्हरसह क्लिनर जागीच ठार

20240206 210353 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील ढाणकल गावच्या हद्दीत एका मोठ्या धोकादायक वळणावर मंगळवार दि. 6 रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक डाव्या बाजूला डोंगराच्या टेकडीला जावून धडकला. या अपघात चालक आणि क्लिनर दोघेही जागीच ठार झाले. लहू त्रंबक माने (वय 30) व क्लिनर अक्षय कांबळे (वय 27 दोघे रा. पाटस, ता. दौंड, … Read more

सव्वा कोटींच्या वीजचोरी प्रकरणी ‘महावितरण’कडून 374 ग्राहकांकडून 1 कोटीचा दंड वसूल

Satara News 2024 02 06T151100.271 jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या राज्य वीज वितरण मंडळाने तथा महावितरणच्या कर्मचऱ्यांकडून वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम राबविली जात आहे. गेल्या वर्षी २०२३ मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आकडा टाकून वीज चोरी करण्याच्या प्रकरणांमध्ये तब्बल 374 जणांनी बेकायदा वीज वापर करून वीज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. आशा लोकांवर कारवाई करत त्यांच्याकडून सुमारे 1 कोटीचा म्हणजे 98 लाखांचा … Read more

“वाईन शॉपच लायसन्स मिळवून देतो…” म्हणत दोघांकडून व्यावसायिकाची 75 लाखांची फसवणूक

Crime News 40 jpg

सातारा प्रतिनिधी | मंत्री व मंत्रालयातील सचिवांशी ओळख आहे. वाईन शॉप लायसन मिळवून देतो , असे सांगून साताऱ्यातील रिअल इस्टेट व्यावसायिकाची तब्बल 75 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विनायक शंकर रामुगडे व कलावती रामचंद्र चव्हाण, अशी संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी घनशाम चंद्रहार भोसले (वय 47, … Read more

भीषण स्फोटात मिठाईचे दुकान जळून खाक

Crime News 39 jpg

सातारा प्रतिनिधी । आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास नागठाणे येथे श्री गणेश राजपुरोहित स्वीटमार्ट या मिठाईच्या दुकानात झाला मोठा स्फोट झाला. या स्फोटाने परिसर हादरला. स्फोटात मिठाईच्या दुकानाला भीषण आग लागली. याबाबत अधिक माहिती अशी की, नागठाणे येथे श्री गणेश राजपुरोहित स्वीटमार्ट हे मिठाईचे दुकान आहे. या दुकानास आज पहाटेच्या सुमारास अचानक मोठा स्फोट झाला. या … Read more

वाहन मालकासह एजंटही अडकले कायद्याच्या कचाट्यात

Crime News 20240206 065400 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा केलेल्या वाहनांचे जुन्या आरसी बुकवरील मूळ तपशिल काढून आवश्यक असणाऱ्या वाहनांचा तपशिल तयार करून बनावट आरसी तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १८ वाहन मालकांसह एजंटांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्या काळी असलेल्या कागदी आरसी बुकच्या जागी आता डिजिटल … Read more