खुनाच्या गुन्ह्यातील फरारी आरोपीला 2 वर्षांनी केलं जेरबंद, पुसेगाव पोलिसांची बिहारमध्ये कारवाई

Crime News 20240220 072017 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खुनाच्या गुन्ह्यात दोन वर्षे फरारी असलेल्या मुख्य संशयित आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पुसेगाव पोलिसांना यश आले आहे. बिहारमध्ये जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मेवालाल चौहान, असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत डिसेंबर २०२१ मध्ये मजूर राजू चंद्रबली पटेल (वय ३२, रा. चंद्रबली, सिरजमदेई, देवारिया, उत्तरप्रदेश) याचा कंत्राटदार मेवालाल … Read more

पाचगणीत रिसॉर्टवर छम छम; 10 ते 12 बारबालांसह 48 जणांवर पोलिसांची धडक कारवाई

Crime News 14 jpg

सातारा प्रतिनिधी । जिल्ह्यातील 24 खते औषधे बी बियाणे विक्रेत्या डीलर असे एकूण 35 ते ते 36 जणांवर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी काल धडक कारवाई केली. पाचगणी टेन्ट हाऊस रिसॉर्टवर छापा टाकून संबंधितांना अटक केल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास … Read more

ट्रकमधील फरशी अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू

Satara News 82 jpg

सातारा प्रतिनिधी । माण तालुक्यातील टाकेवाडी येथे ट्रकमधून फरशी खाली घेत असताना फरशी कोसळल्याने त्या खाली अडकून एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. लाैहर प्रसाद मतन प्रसाद (वय ४२, रा. गाैरखास उरूबाबाजार, गोरखपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. टाकेवाडी, ता. माण) असे मृत्यू झालेल्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे. याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी … Read more

बॅग चोरणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 50 हजाराचा मुद्देमाल जप्त

Satara News 79 jpg

सातारा प्रतिनिधी । वाईला जाणाऱ्या मार्गावर आसले गावच्या हद्दीत प्रवाशांची बॅग जबरदस्तीने हिसकावुन जबरी चोरी केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून ५० हजार ७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि ०९/०७/२०२३ रोजी रात्री ८ ते ९ वा.चे सुमारास पाचवड ते … Read more

आकाशवाणी झोपडपट्टीतील सराईत गुन्हेगार 2 वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडीपार

Crime News 13 jpg

सातारा प्रतिनिधी | शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाशवाणी झोपडपट्टीतला सराईत गुन्हेगार साहिल गौतम रणदिवे याला दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले आहे. सराईत गुन्हेगार साहिल गौतम रणदिवे याच्यावर शाहुपुरी पोलीस ठाणे हद्दीत दरोडा, जबरी चोरी व मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. शाहुपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी महाराष्ट्र पोलीस … Read more

तळबीड पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील 3 तस्करांना केली अटक, 1 कोटीचे मांडूळ जप्त

Crime News 12 jpg

कराड प्रतिनिधी | मांडुळाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना तळबीड पोलिसांनी जेरबंद केले आहे. रुपेश अनिल साने (रा. आड, ता. पोलादपूर), अनिकेत विजय उत्तेकर आणि आनंद चंद्रकांत निकम (दोघेही रा. कापडखुर्द, ता. पोलादपूर, जि रायगड), अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ कोटी १० लाख रुपये किंमतीचे मांडूळ पोलिसांनी जप्त केले आहे. पुणे-बंगळुरू महामार्गावरील … Read more

साताऱ्यातील शाहुपूरीत पाऊण लाखाचे पिस्टल जप्त, DB पथकाने संशयिताला ठोकल्या बेड्या

Crime News 11 jpg

सातारा प्रतिनिधी | समर्थ मंदिर चौक ते बोगदा जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल अजिंक्यतारा जवळ शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता पॅन्टचे कमरेस देशी बनावटीचे पिस्टल आढळून आले. पिस्टलची किंमत ७५ हजार रूपये आहे. पिस्टल जप्त करून धीरज विजय शेळके (रा. जकातवाडी ता. सातारा) यास अटक केली. … Read more

भुईंज पोलिसांकडून 3 डिपी चोरीचे गुन्हे उघड; एका आरोपीस अटक

Crime News 10 jpg

सातारा प्रतिनिधी । महिनाभरापूर्वी देगाव गावचे हद्दीत तसेच ३० जानेवारी रोजी बोपेगाव गावचे हद्दीत व २ फेब्रुवारी रोजी किकली गावचे हद्दीत अशा तीन ठिकाणी शेतामधील वीज वितरण कंपनीच्या ओव्हर हेड लाईनवर बसविलेले विद्युत ट्रान्सफार्मर चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून २ … Read more

नोएडातल्या युवकाकडून जिल्ह्यातील युवतीचा विनयभंग

Crime News 20240215 190402 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | नोएडा येथील कंपनीत नोकरीला असलेल्या सातारा जिल्ह्यातील २७ वर्षीय युवतीचा विनयभंग आणि कुटुंबीयांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी संकल्प जैस्वाल याच्यावर फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी युवती सध्या गावी असून ती वर्क फ्रॉम होम करते. संशयिताने युवतीसह तिच्या कुटुंबियांना फोनवरुन धमकी देत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने तिच्या … Read more

गोठणेत रानगव्याच्या हल्ल्यातील जखमी वृद्धाचा मृत्यू

Patan News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील कोयना भागातील गोठणे येथे रानगव्यानी हल्ला करून एका वृद्धाला जखमी केले होते. त्या जखमी झालेल्या दगडू रामचंद्र सुर्वे (वय 75) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दगडू सुर्वे हे आपल्या मालकीच्या क्षेत्रात गुरे चारायला गेले असता, त्यांच्यावर रानगव्याने हल्ला केला होता. रानगव्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुर्वे यांना उपचारासाठी कराड येथील कृष्णा … Read more

धोम-बलकवडीच्या कालव्यात बाप-लेक गेले वाहून; चिमुकल्याचा मृत्यू, वडील बेपत्ता

Dhom Balakwadi Dam News jpg

सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यात एक हृदयद्रावक घटना रविवारी घडली आहे. पाय घसरून धोम-बलकवडी धरणाच्या कालव्यात पडलेल्या चिमुकल्याला वाचविण्यासाठी बापाने कालव्यात उडी मारली. मात्र, दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या घटनेत चिमुकल्याचा मृत्यू झाला असून वडील बेपत्ता आहे. शंभूराज विक्रम पवार (वय ५ वर्षे), असे मृत चिमुकल्याचे नाव असून त्याचे वडील विक्रम मधुकर पवार (वय … Read more

पुण्याहून आलेल्या 2 वकिलांचा दुचाकीच्या भीषण अपघातात जागीच मृत्यू

Karad News 20240212 091631 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर संरक्षक कठड्याला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात पुण्यातील दोन वकील जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सकाळी वाठार (ता. कराड) गावच्या हद्दीत घडली. प्रशांत विश्वास भोसले (वय ३४), अमर तुकाराम अलगुडे (वय ३५, रा. धनकवडी, पुणे), अशी मृत वकिलांची नावे आहेत. न्यायालयीन कामासाठी कोल्हापूरला जाताना अपघात प्रशांत भोसले आणि अमर अलगुडे … Read more