कराडच्या कोयना नदीवरील जुन्या पुलाखाली आढळला 35 वर्षीय पुरूषाचा मृतदेह

CRIME NEWS 20240223 233529 0000 jpg

कराड प्रतिनिधी | कराड येथील कोयना नदीवरील जुन्या कोयना पुलाखाली सुमारे ३५ वर्षीय पुरूषाचा मृतदेह अढळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. मृतदेहाच्या गळ्यावर वार केल्यासारख्या खुणा असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. त्यामुळे कराड शहर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कराडच्या जुन्या कोयना पुलाच्या परिसरातील नदीपात्रात एका पुरूषाचा मृतदेह वाहनधारकांना दिसला. त्यामुळे … Read more

साताऱ्यात एकतर्फी प्रेमातून महिला डॉक्टरचे अपहरण करून विनयभंग, संशयितावर गुन्हा दाखल

20240223 111748 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | एकतर्फी प्रेमातून महिला डॉक्टरचे अपहरण करून विनयभंग करण्यात आल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी अनुप नंदकुमार गाडे (वय ३८, रा. हॅपी होम सोसायटी, एमआयडीसी, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला डॉक्टर ३२ वर्षांच्या असून त्या साताऱ्यातील एका हॉस्पिटलमध्ये काम … Read more

वीज वितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाकडून 2 हजाराची लाच घेताना कनिष्ठ अभियंत्याला ACB ने पकडले रंगेहात

CRIME NEWS 20240223 105012 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या फलटण कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कनिष्ठ अभियंत्याला २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. विशेष म्हणजे नवीन वीज कनेक्शनची प्रकरणे मंजूर करण्यासाठी आपल्याच हाताखालील वरिष्ठ तंत्रज्ञाकडून त्याने लाच घेतली. सदाशिव अशोक गंगावणे (रा. प्लॅट नं ४०१, लोटस रेसोडन्सी, धानोरी रोड, लोहगाव पुणे ४७, वर्ग-३. सध्या रा. गणपती मंदीर … Read more

पैशासह किंमती ऐवजासाठी प्रवाशाचा खून करणाऱ्या ट्रक चालकास जन्मठेपेची शिक्षा

Crime News 19 jpg

कराड प्रतिनिधी । ट्रकने पुण्याहून कोल्हापूरला जाताना पैशांसाठी प्रवाशाचा खून केल्याप्रकरणी ट्रक चालकास दोषी धरून जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. बी. पतंगे यांनी सुनावली. संदीप शिवशंकराप्पा बुडगी (रा. बावीकेरे, ता. निलमंगला, जि. बेळगाव, सध्या रा. मुद्दापुरा, ता. जि. चित्रदुर्ग, कर्नाटक), असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील 3 जणांच्या टोळीविरुद्ध तडीपारीची कारवाई

Crime News 18 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हयातील बोरगांव पोलीस ठाणे हद्दीत अवैद्य दारुची विक्री तसेच शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या टोळ्या कार्यरत होत्या. या ३ जणांच्या टोळीला सातारा पोलिसांनी २ वर्षाकरीता तडीपार केले. टोळी प्रमुख १) शकीला गुलाब मुलाणी, (वय ६०), २) अमीर गुलाब मुलाणी, (वय ३७), ३) समीर गुलाब मुलाणी, (वय ३३), (सर्व रा. टिटवेवाडी (देशमुखनगर) ता. जि. … Read more

कोरेगावात उपकार्यकारी अभियंत्यास लाच घेताना पकडले

Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । ठेकेदाराकडून कामांची मंजुरी देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना, कोरेगाव उपविभाग कार्यालयातील उपकार्यकारी अभियंता मदन रामदास कडाळे (वय 46 रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर. सध्या रा. तामजाईनगर सातारा) याला सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. मंगळवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास महावितरणच्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यात … Read more

परजिल्ह्यातून दुचाकी चोरी करणारा सराईत चोरटा अडकला कराड पोलिसांच्या जाळ्यात; 8 दुचाकी जप्त

Karad News 33 1 jpg

कराड प्रतिनिधी । विविध जिल्हयातून दुचाकी चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आज अटक केली. या कारवाईत पोलिसांनी संशयिताकडून एकूण 5 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. विक्रम रमेश सकट (वय 27, रा. बेघर वस्ती, सैदापूर, ता. कराड) असे पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेवून अटक केलेल्याचे नाव आहे. … Read more

आयशरला कारची जोरदार धडक; एकजण किरकोळ जखमी

Karad News 31 jpg

कराड प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत लोटस फर्निचरच्या पाठीमागील बाजूच्या रस्त्यावरून जाणाऱ्या एका आयशर टेम्पोला पाठीमागून कारने जोराची धडक दिली. मंगळवारी दूपारी 1:45 वाजण्याच्या सुमारास हि अपघाताची घटना घडली. यामध्ये आयशर व कारचे पुढील बाजूचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून एकजण किरकोळ आहे. याबाबत घटनास्थवरून मिळालेली माहिती अशी की, आयशर टेम्पो … Read more

ST चालवत असताना हृदयविकाराचा आला धक्का, तरीही चालकाने वाचविले प्रवाशांचे प्राण

Crime News 17 jpg

कराड प्रतिनिधी । एसटी चालवत असताना अचानक चालकाला हृदयविकाराचा जोराचा धक्का बसला. मात्र, तरीही चालकाने प्रसंगावधान दाखवत एसटी दुभाजकावर चढवून जागीच थांबवली. त्यामुळे ३१ प्रवाशांचे प्राण बचावले. अखेरउपचारादरम्यान चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीक वारुंजी गावच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली. राजेंद्र विष्णू बुधावले (रा. सुळेवाडी, ता. खानापूर, जि. सांगली) असे संबंधित एसटी … Read more

‘तुझ्यावरील सर्व संकटे मी दूर करु शकतो’ म्हणत ज्योतिषाकडून युवतीचा विनयभंग, मोबाईलवर पाठवले अश्लील मेसेज

Crime News 15 jpg

सातारा प्रतिनिधी | जन्मपत्रिका पाहून नाडी चेक करायची असल्याचे सांगून युवतीचा बेडरुममध्ये विनयभंग केल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी ज्योतिषावर शह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. संतोष दिनकर चव्हाण (वय ४०), असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना दि. १४ फेब्रुवारी रोजी घडली आहे. तक्रारदार युवतीच्या कुटुंबीयांच्या ओळखीने ज्योतीषी संतोष चव्हाण हा … Read more

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी जेरबंद, पुसेगाव पोलिसांची कारवाई

Satara News 20240220 102208 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मेढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यात फरारी असलेल्या संशयिताला नाकाबंदी आणि कोंबिंग ऑपरेशन दरम्यान जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. गणेश शंकर माळवे (वय २५, रा. वर्धनगड, ता. खटाव), असे संशयिताचे नाव आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण देवकर यांनी सूचना केल्याप्रमाणे … Read more

पुण्यातून अपहरण झालेल्या मुलाची साताऱ्यात सुटका, अंधाराचा फायदा घेऊन अपहरणकर्ते पसार

Crime News 20240220 074357 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुण्यातील कात्रज भागातून ७० लाखांसाठी अपहरण करण्यात आलेल्या १२ वर्षांच्या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात पुणे पोलिसांना सातारा पोलिसांच्या मदतीने यश आले आहे. सातारा तालुक्यातील पाटेघर येथील डोंगरामध्ये अपहरणकर्ते लपले होते. पोलिसांची चाहूल लागताच मुलाला तेथेच सोडून अंधाराचा फायदा घेऊन ते पळून गेले. ७० लाखांसाठी मुलाचे अपहरण कात्रज भागातील भिलारवाडी येथून राजेश … Read more