शिवथर परिसरात बिबट्याचा वावर; कुत्र्यावर केला हल्ला

Satara News 54 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील शिवथर गावच्या हद्दीत धनगर वस्तीत अचानक एका बिबट्याने कुत्र्यावर हल्ला. शिवथर परिसरात बिबट्या आल्याने गावातील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी ज्या ठिकाणी बिबट्या हाेता त्याला तेथून हुसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्या झाडावर चढला. त्यानंतर ग्रामस्थांनी बिबट्याची माहिती वनविभागाला दिली. घटनास्थळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरात येऊन पाहणी केली … Read more

सातारा जिल्ह्यात 23 लाख रुपये किंमतीची 114 किलो अफूची झाडे जप्त, दोघांना अटक

Crime News 27 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी छापा मारून स्थानिक गुन्हे शाखेने २३ लाख रुपये किंमतीची अफूची झाडे जप्त केली आहेत. याप्रकरणी दीपक आबा झणझणे (रा. सासवड-झणझणे, ता. फलटण आणि मधुकर शिवाजी कदम (रा. देऊर, ता. कोरेगाव) यांना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खबऱ्याकडून माहिती सासवड (झणझणे) आणि … Read more

लग्नाचा बहाणा करून करायचे फसवणूक; पोलिसांनी 7 जणांच्या टोळीला केली अटक, साताऱ्यातील दोघांचा समावेश

Satara News 2024 03 05T125655.597 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यात लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या टोळ्याचे प्रमाण वाढले आहे. यातील काही टोळ्यांच्या मुसक्या पोलीस प्रशासनाकडून आवळण्यात आल्या आहेत. दरम्यान, लग्नाचा बहाणा करून फसवणूक करणाऱ्या एका टोळीवर पोलिसांनी कारवाई केली असून टोळीतील तीन पुरुष व नवरीसह चार महिलांना ताब्यात घेतले आहे. कुडाळ पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये अहमदनगर, श्रीरामपूर, पंढरपूरसह सातारा जिल्ह्यातील दोघं … Read more

सातारा पोलिसांनी खंडणी प्रकरणातील आरोपींची बसस्थानक परिसरातून काढली धिंड

Satara News 20240305 093855 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा बसस्थानक परिसरात एकाला खंडणी मागून त्याच्याकडून जबरदस्तीने मोबाईल काढून घेणार्‍या तिघांची सातारा शहर पोलिसांनी सोमवारी सातारा बसस्थानक परिसरात धिंड काढली. सातारा बसस्थानक परिसरात रविवारी एका कापड व्यापार्‍याला शस्त्राचा धाक दाखवून खंडणी मागून त्याचा जबरदस्तीने मोबाईल तसेच काही रक्कम काढून घेणार्‍या स्मित पवार, आदेश बनसोडे, गणेश साठे या तीन जणांना पोलिसांनी अटक … Read more

कार अपघातात दोन तरुणांचा झाला मृत्यू; तिघेजण गंभीर जखमी

IMG 20240304 WA0003 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा कास मार्गावर साताऱ्याहून कासकडे कारमधून फिरण्यासाठी निघालेल्या तरुणांवर काळाने घाला घातला. कारमधील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार दुभाजकाला जोरदार धडकली. या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले तर तिघेजण गंभीर जखमी झाले. आज सोमवारी सकाळच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. अरहान फैजल शेख (वय १६, रा. गुरुवार पेठ, सातारा), सोहेल अन्सारी … Read more

डोक्यात फावडे घालून केला पत्नीचा खून; पतीला अटक

Crime News 25 jpg

पाटण प्रतिनिधी । चारित्र्याच्या संशयावरून पतीने स्वतःच्या पत्नीच्या डोक्यात फावडे घालून तिचा निर्घृणपणे खून केल्याचाही घटना पाटण तालुक्यातील धायटी येथे शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पती रमेश शंकर पेंढारे याला पोलिसांनी अटक केली आहे. कोमल रमेश पेंढारे (वय २४) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या … Read more

उंब्रजच्या भराव पुलावर मोटरसायकलला अज्ञात वाहनाची धडक, आसगावचा युवक जागीच ठार तर एकजण गंभीर

Karad News 20240304 092116 0000 jpg

कराड प्रतिनिधी | पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग उंब्रज येथील भराव पुलावर अज्ञात वाहनाने मोटरसायकलला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल चालक जागीच ठार झाला असून अन्य एकजन गंभीर जखमी झाला आहे. रविवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मृत युवक सातारा तालुक्यातील आसगावचा रहिवासी आहे. घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी कराड वरून साताऱ्याला जात असताना … Read more

बोरगाव पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून केली 27 जणांना अटक

Satara News 2024 03 03T160714.284 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यात काशीळ येथे एका शेतात सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकला. यावेळी त्यांनी तब्बल 27 जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून रोकड, जुगाराचे साहित्य आणि मोबाइल, वाहने, असा सुमारे 17 लाख 83 हजार 870 रुपयांचा मुद्देमाल देखील हस्तगत केला. लक्ष्मण मारुती यादव, वैभव विजय साळुंखे, समीर सर्जेराव भोसले, मारुती सीताराम … Read more

चोरीस गेलेल्या स्टील चोरीचा गुन्हा 3 तासांत उघड; 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 24 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील कालेटेक येथील डी. पी. जैन कंपनीच्या गेटजवळील उघड्यावरील दीड टन वजनाचे स्टीलची चोरी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात होता. अखेर चोरट्यास अटक करण्यात कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास यश आले आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण सुमारे 3 … Read more

कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाकडून 9 वर्षे फरार आरोपीस अटक

Crime News 23 jpg

कराड प्रतिनिधी । कराडसह सांगली, शिराळा आणि इस्लामपूर येथे अनेक गुन्हे करून तब्बल ९ वर्षे एक आरोपी फरार होता. त्यास कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाकडून अटक करण्यात आली. दिपक महादेव थोरात (मुळ गांव वाकुडे बुद्रुक ता. शिराळा जि. सांगली हल्ली रा. राम मंदिरा समोर, करवडी ता. कराड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव … Read more

नंदुरबारच्या 2 ऊसतोड मजुर टोळी मुकादमाकडून ट्रॅक्टर मालकाची फसवणूक

Crime News 22 jpg

कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यात सध्या शेतशीवारत सध्या ऊसतोड सुरू आहे. मात्र, ऊसतोड सुरू असताना काही टोळीतील मुकादमांकडून फसवणूक केल्याची देखील घटना घडत आहे. अशीच घटना कराड तालुक्यात घडली असून “ऊसतोड मजुराच्या १२ जोड्या देतो,” असे सांगुण ट्रॅक्टर मालकांचा १० लाख २५ हजार रुपयांची फसवणुक केली आहे. या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील २ ऊसतोड मजुर टोळी … Read more

टायर फुटल्याने गॅस कंटेनर झाला पलटी, वाहतूक विस्कळीत

Satara News 2024 03 02T190329.764 jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे – सातारा महामार्गावर सारोळे गावच्या हद्दीत गॅस वाहतूक करणारा एक कंटेनर पलटी झाल्याची घटना आज सकाळी घडली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, कंटेनर (क्रमांक MH43Y7694) हा पुण्याहून सातारच्या दिशेने निघाला होता. कंटेनर सारोळे गावच्या हद्दीत आला असता येथील एका वळणावर कंटेनरचा टायर अचानक … Read more