पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर इथेनॉलच्या टँकरने अचानक घेतला पेट; पुढं घडलं असं काही…

Accident News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील सुरूर गावच्या हद्दीत पुणे – बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरून निघालेल्या इथेनॉलच्या टँकरच्या टायरने अचानक पेट घेतल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली. अचानक टँकरच्या टायरने पेट घेतल्यामुळे महामार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. दरम्यान, या घटनेत टँकरचे लाखो रुपयांचे नुकसान झाले तर पोलीस व … Read more

सातारा – लोणंद महामार्गावर पिंपोडे खुर्दच्या युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू

Accident News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा – लोणंद महामार्गावर पिंपोडे खुर्द येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. स्वप्नील रामचंद्र माने (वय २२, रा. पिंपोडे खुर्द, ता. कोरेगाव) असे अपघातात मरित्या झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवार, दि. २३ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास … Read more

खटाव तालुक्यातील ‘या’ गावातील रेशनिंग दुकानावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई

Khatav News 20240324 082035 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील चोराडे येथील विकास सेवा सोसायटीच्या रेशनिंग दुकानाची अनामत रक्कम जप्त करून दहा हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तसेच दुकानदाराच्या फेरचौकशीचे आदेश देखील जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांचा वतीने देण्यात आले. चोरडे येथील या दुकानाची पुरवठा निरीक्षकांनी तपासणी केल्यानंतर वडूज तहसीलदारांकडून पुढील कारवाईसाठी हे प्रकरण जिल्हा पुरवठा विभागाकडे वर्ग करण्यात … Read more

कराड-मसूर रोडवर कार-दुचाकीच्या धडकेत युवकाचा मृत्यू; कारचालकावर गुन्हा दाखल

Karad News 20240323 230506 0000 jpg

कराड प्रतिनिधी | रात्रीच्यावेळी दुचाकीवरून निघालेल्या युवकाला भरधाव चारचाकी कारने जोरदार धडक दिल्याची घटना कराड-मसूर रोडवर बनवडी गावच्या हद्दीत सिताराम सिटी समोर शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. चारचाकी वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अजय विलास चव्हाण (वय 33, रा.कोपर्डे हवेली) असे अपघातात मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक प्रमोद शिंदे … Read more

पोलीस अधिकारी असल्याचे सांगत वृद्धाची सोन्याची अंगठी ‘त्यांनी’ केली लंपास

Satara News 2024 03 23T110550.397 jpg

सातारा प्रतिनिधी । ‘मै पोलिस इन्स्पेक्टर हू’ असे म्हणत हातातील अंगठी घेऊन कागदात दगड गुंडाळून देत वृद्धाची फसवणूक करण्यात आली असल्याची घटना साताऱ्यातील शाहूपुरी येथे घडली आहे. यामध्ये अज्ञातांकडून २० हजार रुपयांची सोन्याची अंगठी लंपास करण्यात आली. या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा … Read more

लॉजच्या खोलीत पंख्याच्या हुकला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

Karad News 20240323 001942 0000 jpg

कराड प्रतिनिधी | लॉजच्या खोलीत पंख्याच्या हुकला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याची घटना कराड शहरातील सूर्या लॉजमध्ये शुक्रवारी सकाळी उघडकीस आली.प्रथमेश विकास पवार (वय २४, रा. आंबेगाव, ता. जि. सातारा) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मलकापूर येथे राहणारे अभिषेक सिद्धप्पा अंकलगी हे शहरातील सूर्या लॉज चालवितात. गुरुवारी दुपारी … Read more

कराडातील पी. डी. पाटील उद्यान परिसरात वृद्ध महिलेची 2 महिलांनी बोरमाळ केली लंपास

Karad News 20240322 224840 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सोन्याचे मणी देण्याचे अमिष दाखवून वृद्ध महिलेकडे असलेली बोरमाळ 2 महिलांनी लंपास केल्याची घटना कराड शहरातील पी. डी. पाटील उद्यानात शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन अज्ञात महिलांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत मालन राजाराम पवार (वय ८१, रा. गुरूवार पेठ, कराड) यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. … Read more

‘तुमच्यावर मनी लाँड्रिंगची केस आहे’ असे सांगत वृध्द डॉक्टरला पावणेबारा लाखाला फसवले

Satara News 2024 03 22T170316.917 jpg

सातारा प्रतिनिधी । दोघाजणांनी मोबाईलवरुन संपर्क करुन “तुमच्यावर मनी लॅंड्रींची केस आहे. तुमच्याबरोबर कुटुंबाला तुरुंगात टाकेन,” अशी धमकी देऊन वृध्द डाॅक्टरकडून सुमारे पावणे बारा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील वृद्ध डॉक्टर सुभाष गणपती घेवारी (वय … Read more

कराड – शामगाव मार्गावर अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू; अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल

Accident News jpg

कराड प्रतिनिधी । कराड ते शामगाव मार्गावर करवडी, (ता. कराड) गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. बाजीराव किसन पवार (वय ६५) रा. पवारवाडी-बोपोली, ता. जि. सातारा यांचा असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील करवडी येथील शुभम पिसाळ हे गुरुवारी दुपारी बारा … Read more

बोरगाव पोलिसांकडून चोवीस तासात सोने चोरीचा गुन्हा उघड

Crime News 20240321 221124 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वधू पक्षाच्या खोलीतून दागिन्यांची चोरी झाल्याची घटना बुधवारी (दि. २० मार्च) बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. चोवीस तासात बोरगाव पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघडकीस आणत दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या मेकअप आर्टिस्टला ताब्यात घेतलं. दागिने चोरल्याची कबुली संशयित महिलेने दिली आहे. सातारा तालुक्यातील नागठाणे येथील कोहीनुर मल्टीपर्पज हॉलमध्ये बुधवारी लग्नकार्य होतं. सर्वजण लग्नाच्या धामधुमीत … Read more

साताऱ्याहून मुंबईला जाताना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या मोटारीला अपघात, आठवले सुखरूप

Ramdas Athawale News 20240321 201115 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्याहून मुंबईकडे जात असताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मोटारीला कंटेनरने धडक दिली. पुणे-बंगळुरू महामार्गावरील भुईंज (ता. वाई) हद्दीतील बोगद्यात ही घटना घडली आहे. या अपघातात आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले असून रामदास आठवले हे सुखरूप आहेत. दुसऱ्या वाहनाने ते मुंबईकडे रवाना झाले. आठवलेंच्या गाडीचे मोठे नुकसान घटनास्थळावरून मिळालेल्या … Read more

साताऱ्यातील कार-दुचाकी अपघातात अधिकाऱ्याचा मृत्यू, पाल नगरीवर शोककळा

Crime News 20240321 070034 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील मोनार्क हॉटेल परिसरात कार आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. नागेश सूर्याजीराव यादव (वय 52, रा. संगम कॉलनी, गोडोली, मूळ रा. शिरगाव, ता. कराड) असे त्यांचे नाव आहे. ते वाई येथील सहकार कार्यालयात अधिकारी होते. कारचा वेग अनियंत्रित झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार नागेश … Read more