जोशी विहीर येथे कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दोघे जागीच ठार

Crime News 34 jpg

सातारा प्रतिनिधी । पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर जोशीविहिर (ता. वाई) येथे झालेल्या भीषण अपघातात मंदार कोल्हटकर (वय ४५, रा. कोल्हटकर आळी, सातारा) व धीरज पाटील (वय ३८, रा. ढवळी, ता. वाळवा, जि. सांगली) हे जागीच ठार झाले. हे दोघे तरुण भारतच्या सातारा कार्यालयात वितरण विभागात कार्यरत होते. मंदार कोल्हटकर व धीरज पाटील हे आपल्या दुचाकीवरुन रस्त्याच्या … Read more

कोयना जलाशयात वादळी वाऱ्याने स्पीड बोट पलटी; एकजण बुडाला तर दोघे पोहत बाहेर आले

Patan News 20240418 215729 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयात मोठी दुर्घटना घडली आहे. वादळी वाऱ्यात स्पीड बोट पलटी होऊन एक जण जलाशयात बुडाला असून दोघेजण सुदैवाने बचावले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला, मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड पावसामुळे शोधकार्यात अडथळे आले. या घटनेची माहिती मिळताच प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहे. कामाची पाहणी … Read more

कराड विमानतळावर प्रशिक्षण ॲकॅडमीचं विमान कोसळलं; प्रशिक्षणार्थी जखमी, मोठी दुर्घटना टळली

Karad News 20240418 152622 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराडच्या विमानतळावर प्रशिक्षण ॲकॅडमीचं फोर सीटर विमान कोसळून अपघात झाला आहे. त्यात प्रशिक्षणार्थी जखमी झाला आहे. सोलो ट्रेनिंग सुरु असताना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. पॉवर वाढल्याने प्रशिक्षणार्थीला विमान कंट्रोल झालं नाही. त्यामुळे विमान कोसळलं. सुदैवाने विमानाने पेट घेतला नाही. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. सोलो ट्रेनिंगवेळी झाला … Read more

महाबळेश्वरातील हॉटेल कामगाराचा वाईच्या धोम धरणातील पाण्यात बुडून मृत्यू

Crime News 32 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील एका मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये काम करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाचा वाईच्या धोम धरणात बुडुन मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मनोजकुमार महेंद्र पाल (सध्या रा. बोंडारवाडी, ता. महाबळेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, वाई सोमवार दि. १५ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मनोजकुमार महेंद्र पाल … Read more

कराडच्या शिवशंकर पतसंस्थेत तब्बल 13 कोटींचा अपहार; 18 संचालकांसह 5 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

Karad Crime News jpg

कराड प्रतिनिधी । कराड येथील बहुचर्चित असलेल्या शिवशंकर नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल १३ कोटी ९ लाख ९६ हजारांचा अपहार केल्या प्रकरणी पतसंस्थेच्या १८ संचालकांससह ५ कर्मचाऱ्यांवर कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याची फिर्याद विशेष लेखा परीक्षक धनंजय गाडे यांनी दिली असून ठेव नसताना ठेव तारण कर्ज, विनातारण कर्ज वितरण, कागदपत्रांचीही पूर्तता न … Read more

5 जणांनी केली बकऱ्यांची चोरी, 24 तासात आवळल्या मुसक्या, दोघे निघाले अल्पवयीन

Crime News 31 jpg

सातारा प्रतिनिधी । बकऱ्यांची चोरी करणाऱ्या संशयितांच्या लोणंद पोलिसांनी 24 तासाच्या आत मुसक्या आवळल्या. चोरून नेलेल्या बकऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेल्या स्विफ्ट कारसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ओंकार अशोक खुंटे, करण विनोंद खुंटे, सुरज ऊर्फ चिंग्या संतोष खुंटे आणि दोन अल्पवयीन मुलांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. लोणंद पोलीस ठाण्याच्या हददीतील आंदोरी (ता. खंडाळा) … Read more

‘ड्राय डे’ दिवशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या हॉटेलवर LCB चा छापा, 13 लाख 23 हजाराचा मद्यसाठा जप्त

Satara Crime News 2 jpg

कराड प्रतिनिधी | घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी ड्राय डे असताना दारूची चोरटी विक्री सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) मिळाली. एलसीबीच्या पथकाने कराड ढेबेवाडी मार्गावरील विंग (ता. कराड) येथील हॉटेल रॉयल लँडस्केपवर छापा मारून १३ लाख २३ हजार रूपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा आणि रोकड जप्त केली. याप्रकरणी आनंदा सोपान माने (रा. … Read more

सातारा रस्त्यावरील ‘या’ पेट्रोल पंपावर रिक्षा जळून खाक

Rickshaw Burnt News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा रस्त्यावरील पुणे येथील सिटी प्रायीड समोरील भापकर पेट्रोल पंप देशमुख पेट्रोलियम पंपावर रविवारी दुपारच्या सुमारास सीएनजी भरलेल्या रिक्षाने अचानक पेट घेतला. यावेळी लागलेल्या आगीत रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथील सातारा रोडवर गणेश बडदे (वय 52, रा. काकडे वस्ती) … Read more

सासूला का मारता? विचारल्याच्या कारणावरून संतापलेल्या ‘त्यानं’ एकावर कोयत्याने केला हल्ला

Crime News 20240403 122923 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | “सासूला का मारहाण करता?”, अशी विचारणा केल्याच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार करत हल्ला केल्याची घटना साताऱ्यातील खंडोबाचामाळ येथे घडली आहे. हल्ल्यात त्यांच्या डाव्या हाताचे अर्थे बोट अक्षरशः तुटले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे नामदेव हणमंत खंडाळे(वय ४०, रा. राथिका रोड, परिसर सातारा) हल्ल्यात जखमी झालेल्याचे नाव … Read more

अत्याचार केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल

20240403 113744 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | “तू आवडतेस, रात्री तू माझ्याशी बोल, माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे, मी तुझ्यासोबत लग्न करेन, अशी बतावणी करून वारंवार विनयभंग व अत्याचार करीत जर कोणास सांगितले तर तुझी मी बदनामी करेन, अशी धमकी दिल्याप्रकरणी एक जणाविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम मारुती काळेल (रा. जांभुळणी, ता. माण) असे … Read more

जावळीत शेतजमिनीच्या रस्त्यावरून 5 जणांवर गुन्हा दाखल

Crime News 20240403 110940 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | शेतजमिनीत रस्ता खुला करण्याच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी जावळी तालुका धनकवडी येथील पाच जणांवर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील धनकवडी येथील जमीन गट नं. ५०/८ या क्षेत्रामध्ये जाणे – येणेकरिता रस्ता खुला करण्याचे काम सुरू होते. त्यासाठी पोलिस संरक्षण पुरवण्यात आले होते. त्यानुसार मेढा … Read more

सातारा एलसीबीची धडाकेबाज कारवाई, पाच चोरट्यांकडून 26 गुन्हे उघड, 40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Satara News 20240402 182843 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पाच चोरट्यांकडून जिल्ह्यातील चोरी, घरफोडीचे 26 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या गुन्ह्यांमध्ये चोरीस गेलेली रोकड आणि दागिने, असा एकूण 40 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्यामध्ये 2 लाख 40 हजार रूपयांची रोडक आणि 56 तोळ्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. या कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती … Read more