सातारा पोलिसांची मोठी कारवाई, लल्लन टोळीला ‘मोक्का’

Satara News 20240423 220009 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात दहशत माजवून गुंडगिरी करणाऱ्या अजय उर्फ लल्लन जाधव टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. सातारा शहरातील प्रतापसिंहनगर, खेड या परिसरात लल्लन टोळीची दहशत होती. तरूणीला तलवारीने भोसकून गाड्यांच्या काचा फोडत दहशत निर्माण केल्यानंतर या गुंडांची बेकायदेशीर घरे पोलिसांनी बुलडोजरने जमीनदोस्त केली होती. आता मोक्काची कारवाई करत पोलिसांनी या टोळीचे कंबरडे मोडले … Read more

मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला 20 वर्षे सश्रम कारावास; कराड न्यायालयाचा निकाल

Karad News 20240423 063736 0000 jpg

कराड प्रतिनिधी | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी युवकाला 20 वर्षे सश्रम कारावास आणि 1 लाख 80 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. तसेच पिडीत मुलीला एक लाख रुपये भरपाई देण्याचा आदेशही देण्यात आला. कराड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. के. एस. होरे यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली. सागर शरद लोंढे (वय … Read more

शिरवळमध्ये 2 युवकांकडून पिस्तूल जप्त; गुन्हा दाखल

Crime News 20240422 182200 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील पळशी रोड याठिकाणी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका सराईत टोळीच्या दोन युवकांना पोलीसांनी अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून विनापरवाना बाळगलेल्या एक देशी बनावटीचे पिस्तूल, २ जिवंत काडतुसे व दुचाकी, असा एक लाख वीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घटनास्थळ व शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलिस … Read more

सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Karad News 20240422 170607 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील कराड येथील द यशवंत को-ऑपरेटिव्ह बँकेतील करोडो रुपयांच्या अपहार प्रकरणी सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्यासह रोहित भीमराव लभडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील विशेष न्यायाधीश (एमपीआयडी) के.पी नांदेडकर यांनी फेटाळला आहे. द यशवंत कोऑपरेटिव्ह बँक (शाखा कराड, जि. सातारा) चे अध्यक्ष शेखर सुरेश चरेगावकर व द चिखली अर्बन … Read more

किरकोळ वादातून दगडाने मारहाण करुन पंधरा वर्षीय मुलाचा खून

20240422 003643 0000 jpg

कराड प्रतिनिधी | किरकोळ वादातून पंधरा वर्षीय मुलाला दगडाने मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला. तर आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मुलाचा भाऊ गंभीर जखमी झाला. विमानतळ कराड येथे रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून अटक केले आहे. अल्तमस अहमद खान (वय १५, सध्या रा. वारुंजी, ता. कराड, … Read more

विजयनगरमध्ये लाकडी दांडक्याच्या मारहाणीत युवकाचा मृत्यू; कराड शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल

Karad News 20240421 190445 0000 jpg

कराड प्रतिनिधी | लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील विजयनगर येथे शनिवारी घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांच्या विरोधात कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण बर्गे (रा. खराडे, ता. कराड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेकी माहिती अशी की, कराड तालुक्यातील विजयनगर येथे शनिवारी … Read more

चाकूचा धाक दाखवून ‘त्याने’ परप्रांतीय इसमाचे 10 हजार रुपये हिसकावले; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 2 jpg

सातारा प्रतिनिधी । चाकूचा धाक दाखवून एकाने परप्रांतीय इसमाकडून 10 हजार रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची घटना वाई तालुक्यात घडली होती. या घटने प्रकरणी वाई पोलिसांनी एकास अटक केली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांस त्यांच्या बातमीदारांमार्फत गोपनीय बातमी प्राप्त झाली की, वाई पोलीस ठाणे गु.र.नं ९९/२०२४ … Read more

कराडच्या शिवाजी हौसिंग सोसायटीतील घरफोडी प्रकरणी दोघांना अटक, अर्धा किलोचे दागिने जप्त

Crime News 35 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा पोलीस रेकॉर्डवरील आरोपींकडून घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणत ३६ लाख ४० रूपये किंमतीचे अर्ध्या किलोचे दागिने आणि गुन्हयात वापरलेले ५ लाख ५० हजार रूपये किंमतीचे वाहन, असा ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि कराड शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. कराडमधील शिवाजीनगर हौसिंग … Read more

सातारा पोलिस मुख्यालयातच निरीक्षकाला धमकी; तिघांच्या विरोधात गुन्हा

Satara News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा पोलिस मुख्यालयात एक खळबळजनक प्रकार घडला असून मुख्यालयातील राखीव पोलिस उपनिरीक्षक कार्यालयात निरीक्षकालाच धमकी देत टेबल ढकलून खुर्चीला धक्का देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राखीव पोलिस निरीक्षक जयसिंग जाधव यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार … Read more

दुचाकी चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 1 लाख 40 हजाराच्या किंमतीच्या 2 दुचाकी जप्त

Crime News 20240419 142553 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वाई पोलिसांच्या पथकाने आज शुक्रवारी केलेल्या धडक कारवाईत दोन दुचाकी चोरट्याला अटक केली. तसेच त्याच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी देखील जप्त केल्या. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांस त्यांच्या खास बातमीदारांमार्फत वाई पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा नोंद असलेला संशयित … Read more

साताऱ्यातील कॅफेत अश्लील कृत्य; तब्बल 9 जणांवर गुन्हा दाखल

Crime News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा शहर पोलिसांच्यावतीने सातारा शहरातील काही कॅफेवर अचानक धडक कारवाईची मोहीम राबविली. यावेळी तीन कॅफेमध्ये छापा टाकण्यात आला असता त्यामध्ये अश्लील कृत्य, रजिस्टरमध्ये नोंद न ठेवणे,असे प्रकार आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी एकूण नऊ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. यश किरण निकम (रा. शिवथर, ता. सातारा), जयदीप नलवडे (पूर्ण नाव नाही, रा. … Read more

निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण

Crime News jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील चोराडे फाटा येथे लोकसभा निवडणुकीच्या स्थिर सर्वेक्षण पथकातील शासकीय कर्मचाऱ्याला नाकाबंदी दरम्यान गाडी तपासणी करताना पोलिसाने शिवीगाळ करून मारहाण केल्याचा प्रकार नुकताच घडला. “मी आमदार, खासदाराच्या गाड्या चेक करतो,” असे म्हणत पोलिसांनी केलेल्या मारहाणीप्रकरणी औंध पोलिस ठाण्यात एकावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती … Read more