कराडात 40 हजार रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त; अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई

Crime News 5

कराड प्रतिनिधी | प्रतिबंधीत असलेला गुटखा व पानमसाल्याचा विक्रीच्या उद्देशाने साठा करुन ठेवल्याप्रकरणी दोघांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून गुटखा, पानमसाल्याचा ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सातारच्या अन्न औषध प्रशासन विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. याबाबत अन्नसुरक्षा अधिकारी वंदना विठ्ठलराव रुपनवर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कराड शहरातील पालिका परिसरात … Read more

साताऱ्यातील घरफोडी उघड, दोन सराईत चोरट्यांकडून 5 लाख 60 हजाराचा ऐवज जप्त

Satara News 20241206 095601 0000

सातारा प्रतिनिधी | गोडोलीतील गौरव रेसीडन्सी अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडी करून दागिने लंपास करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून ५ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. राजकुमार उर्फ राजू ओमकार आप्पा आपचे (रा. कोथळी, ता. उमरगा, जि. धाराशिव) आणि अर्शद सत्तार बागवान (रा. शनिवारी पेठ, … Read more

साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात बॉम्बची माथेफिरूकडून अफवा; प्रशासन, पोलिसांची धावपळ

Satara News 20241206 075744 0000

गुरूवारी सायंकाळी माथेफिरूने सुरक्षारक्षकाला धमकी देत, “माझ्या अंगावर बॉम्ब आहे, हे संपूर्ण विश्रामगृह उडवून देणार,” असे सांगितले. ही माहिती मिळताच सुरक्षारक्षकाने सातारा जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. अवघ्या काही मिनिटांत बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वानपथक, अग्निशमन दल, वाहतूक शाखा, रुग्णवाहिका आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांवर माथेफिरूने धमक्या देण्यास सुरुवात केली. “माझ्या … Read more

खासगी सावकाराकडून 1 कोटी 16 लाख 80 हजारांचे दागिने हस्तगत; आर्थिक व स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कारवाई

Satara News 8

सातारा प्रतिनिधी । सातारा आर्थिक व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या वतीने नुकतीच एक धडक कारवाई करत सुमारे 1 कोटी 16 लाख 80 हजारांचे १४६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. संबंधित तपास करण्यात आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार … Read more

कराड उपजिल्हा रुग्णालयासमोर ट्रकची-दुचाकीला जोरदार धडक; दुचाकीस्वार ठार

Crime News 4

कराड प्रतिनिधी । कराड ते विटा मार्गावर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासमोर एका अज्ञात ट्रकचालकाने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून ट्रकचालक पसार झाल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भीमराव तुकाराम भोसले (औध. ता. खटाव जिल्हा सातारा) असे अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि, … Read more

धारदार हत्याराने खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप; 2 हजार रुपये दंडाची शिक्षा

Crime News 2

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील मायणी येथे हरिष उर्फ दादा बबन साठे (वय ३५, रा. इंदिरानगर, मायणी) याचा धारदार हत्याराने खून करणारा आरोपी बापू महादेव पाटोळे (वय ३८, मूळ रा. रामोशी गल्ली, मायणी, ता. खटाव, जि. सातारा) यास जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. याबाबतची अधिक माहिती अशी, २१ सप्टेंबर २०१७ रोजी … Read more

सराफी, कापड दुकान फोडले; वाठार स्टेशनमध्ये पावणेचार लाखांचा ऐवज पळविला

Crime News 20241204 111304 0000

सातारा प्रतिनिधी | वाठार स्टेशन येथील सोन्या- चांदीचे व कपड्याच्या दुकानाचे शटर तोडून पावणेचार लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना काल मध्यरात्री घडली. याप्रकरणी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की येथील तिरुपती कलेक्शन व सह्याद्री ज्वेलर्स या दोन्ही दुकानांचे अज्ञात चोरट्याने कटावणी व लाकडी बांबूच्या साहाय्याने शटरचे … Read more

वाठार निंबाळकरमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक ठार

Crime News 20241204 103037 0000

सातारा प्रतिनिधी | वाठार निंबाळकर (ता. फलटण) येथे भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. प्रवीण बाळासाहेब जाधव (वय ३६, रा. ढवळ, ता. फलटण) असे मृताचे नाव आहे. याबाबत माहिती अशी, की वाठार फाटा ते पुसेगाव रस्त्यावर रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास कारने (एमएच १४ एचडब्ल्यू ६३२१) उसाच्या ट्रॉलीला ओव्हरटेक केले. यात समोरून … Read more

कराडच्या वारुंजीत विहिरीत बुडून 4 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

Crime News 20241204 093418 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील वारुंजी येथे घरानजीक खेळताना पाय घसरून विहिरीत पडल्याने चार वर्षांच्या बालिकेचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी बाराच्या सुमारास घटना घडली. ओवी विश्वास जाधव (वय 4, मूळ रा. तासवडे, सध्या रा. वारुंजी) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. कराड तालुक्यातील तासवडे येथील ओवी जाधव चिमुरडी सध्या वारुंजी येथे राहण्यास होती. सोमवारी … Read more

कोर्टाच्या आवारात पक्षकाराला हार्टॲटॅक, वकीलांच्या प्रसंगावधानाने मिळालं जीवदान

Crime News 20241204 083214 0000

कराड प्रतिनिधी | देशभरात मंगळवारी ‘ॲडव्होकेटस् डे’ साजरा झाला. याच दिवशी कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात हार्टॲटॅक येऊन एक पक्षकार जागीच कोसळला. वकीलांनी त्यांना प्रथमोपचार देऊन कारमधून तातडीनं दवाखान्यान नेलं. वेळीच उपचार मिळाल्यानं आणि वकीलांच्या प्रसंगावधानानं त्यांचा जीव वाचला. जयवंत पोळ (वय ६५, रा. हजारमाची, ता. कराड), असं पक्षकाराचं नाव आहे. वकीलांनी पक्षकाराला … Read more

‘खंबाटकी’नजीक एस-कॉर्नरवर भरधाव टँकरची 3 वाहनांना धडक; दोघे जखमी

Khambatki Tunnel News 1

सातारा प्रतिनिधी । पुणे- सातारा महामार्गावरील खंबाटकी बोगदा उतरून पुण्याच्या बाजूला जाताना तीव्र उतारावरील एस-कॉर्नरवर पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या टँकरने तीन वाहनांना ठोकरले. आज सकाळी झालेल्या या अपघातात दोघे जखमी झाले असून, लॅपटॉप घेऊन निघालेला टेंपो‍ कॅनॉलमध्ये जाऊन पडला. या अपघातात नंदा नीलेश येवले (कारमधील प्रवासी), टेंपो चालक मोहम्‍मद आयुब तालिब (वय २३, रा. कोठीयायी, … Read more

फलटणमध्ये किरकोळ वादातून दमदाटी, मारहाण; पोलिस ठाण्यात 20 जणांवर गुन्हा दाखल

Phalatan Crime News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात किरकोळ वादातून दमदाटी आणि मारहाणीची घटना घडली असून या प्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. येथील एकता गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या मिनी साउंड कॉम्पिटिशन स्पर्धेवेळी किरकोळ वाद झाला. १५ ते २० जणांनी हाताने, लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्याने, तसेच लोखंडी फायटरने मारहाण केली आहे. शिवीगाळ, दमदाटी, … Read more