सातारच्या समाज कल्याण अधिकारी महिलेस लाखाची लाच घेताना अटक

Satara News 20240606 073752 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील एका निवासी शाळेकरिता मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या दहा टक्के म्हणजे ६ लाखांची मागणी करुन १ लाखाची लाच स्विकारताना सातारा येथील जिल्हा समाज कल्याण अधिकारी तथा सांगलीतील इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहाय्यक संचालकाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या सपना सुखदेव घोळवे (वय ४०) या वर्ग एकच्या अधिकाऱ्यास ताब्यात घेण्यात आले. दरम्यान याच … Read more

पोलीस अधीक्षकांनी कराडमधील दोघांना सातारा, सांगली जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी केलं तडीपार

Karad News 7

कराड प्रतिनिधी | कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघांना दोन वर्षांसाठी सातारा आणि सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. प्रशांत ऊर्फ परशुराम रमेश करवले (वय २३, रा. कृष्णा घाट, सोमवार पेठ, कराड) आणि निशिकांत निवास शिंदे (वय २१, रा. रेठरेकर कॉलनी, कराड), अशी त्यांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध कराड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकणे, … Read more

अवैध गांजाची वाहतूक प्रकरणी दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 7 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त

Phalatan News

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात बेकायदेशीरपणे गांजाची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची धडक मोहीम पोलिसांकडून राबविली जात आहे. दरम्यान, आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास फलटण पोलिसांच्या पथकाने बारामतीहुन फलटणकडे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुका गांजा व विना नंबरप्लेटची मोटार सायकल असा एकुण 7 लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अवैध गांजाची वाहतूक … Read more

आचारसंहिता कालावधीत स्थानिक गुन्हे शाखेकडून धडाकेबाज कारवाई, वाईमध्ये 2 पिस्टल हस्तगत

Wai News 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील परखंदी गावच्या हद्दीत एमआयडीसी रस्त्यावरील चौकात पिस्टल खरेदी विक्री करण्याकरीता आलेल्या दोन युवकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून २ देशी बनावटीची पिस्टल, २ काडतूस, ५ हजार ५०० रुपये रक्कम, २ मोबाईल व एक दुचाकी मोटार सायकल असा एकुण २ लाख ५५ हजार ९०० रुपयांचा … Read more

जिल्हा परिषदेत नोकरी लावल्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन दोन युवकांची 3 लाख रुपयांची फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

Crime News 20240603 125852 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्हा परिषदेत आरोग्य सेवक पदावर नोकरी लावल्याचे बनावट नियुक्तीपत्र देऊन २ युवकांची ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पिंपरी येथील दोघांवर रहिमतपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपी रोहित ऊर्फ सागर सदाशिव पवार याला अटक करण्यात आली आहे. रोहित ऊर्फ सागर सदाशिव पवार (वय ४०) व निहाल इनामदार (दोघेही … Read more

फलटण तालुक्यात चोरीपूर्वी चोरट्यांकडून ड्रोनद्वारे पाहणी

Phaltan News 20240603 101024 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण शहराच्या ग्रामीण भागामध्ये चोरी करण्याचे प्रयत्न चोरट्यांकडून सुरू केले जात आहे. याबाबत फलटण तालुक्यातील खुंटे, जिंती परिसरामध्ये चोरट्यांकडून परिसराची ड्रोनने पाहणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. काळाप्रमाणे आता चोरटे सुद्धा हायटेक झाले असून ग्रामीण भागातील परिसरामध्ये ड्रोन उडवून त्या माध्यमातून परिसराची पाहणी करत आहेत. कोठे पहारेकरी आहेत? कोठे गस्त घालत … Read more

साताऱ्यात दुचाकीला धडक देऊन गेला होता पळून;12 तासांच्या आत पोलीसांनी पुण्यात ठोकल्या बेड्या

Satara News 5

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील हिट अँड रन प्रकरणात दुचाकीला धडक देऊन पळून गेलेल्या वाहन चालकाला 12 तासांच्या आत पकडण्याची कामगिरी सातारा तालुका पोलिसांनी फत्ते केली. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे व त्यांच्या टीमने वेगाने तपासाची चक्रे फिरवून अपघात करून गेलेले वाहन व चालक यांना ताब्यात … Read more

मोबाईलवरचे संदेश व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेस केला जीवे मारण्याचा प्रयत्न, पोलिसांनी पती-पत्नीला ठोकल्या बेड्या

Crime News 1

सातारा प्रतिनिधी । पतीला मोबाईलवर केलेले संदेश व्हायरल करण्याची धमकी देत २ लाख रुपये न दिल्याने विवाहितेला गळफास लावत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात असल्याची धक्कादायक घटना वडवाडी ता.खंडाळा येथे घडली आहे. या घटनेमुळे खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली असून याप्रकरणी शिरवळ पोलिसांनी पती-पत्नीला अटक केली आहे. विशाल दिलीप बामणे (वय ३३), रेश्मा विशाल बामणे (३०, रा.वडवाडी … Read more

साताऱ्यात फलाटावर ST बस लावत असताना चालकाचे सुटले नियंत्रण; कामगार गंभीर जखमी

Satara News 1 1

सातारा प्रतिनिधी । फलाटावर एसटी बस लावत असताना चालकाचे अचानक नियंत्रण सुटून एसटी बसने मिठाईच्या दुकानाला जोराची धडक दिली. यात दुकानातील कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना आज शनिवारी सकाळी सातारा येथी बसस्थानकात घडली. जखमीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, खंडाळा आणि कराड येथे एसटीचे आणखी दोन अपघात झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती … Read more

मुंबई बाँबस्फोटातील आरोपी समीर हिंगोराच्या फर्न हॉटेलनंतर विशाल अग्रवालच्या MPG क्लबलाही ठोकलं टाळं

Vishal Agarwals MPG Club News

सातारा प्रतिनिधी | देशभरातील पर्यटकांची आवडती पर्यटनस्थळं असणाऱ्या महाबळेश्वर आणि पाचगणीत अनाधिकृत बांधकामांनी कळस गाठला आहे. या बांधकामांना आता सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिलाय. मुंबई बाँबस्फोटातील आरोपी, चित्रपट निर्माता समीर हिंगोराची पार्टनरशीप असलेल्या पाचगणीतील फर्न हॉटेलनंतर शनिवारी बिल्डर विशाल अग्रवालच्या महाबळेश्वरातील एमपीजी क्लाबलाही टाळे ठोकण्यात आले. या कारवाईमुळे अनाधिकृत बांधकाम करणाऱ्या नंदनवनातील व्यावसायिकांचे धाबे दणाणले … Read more

कराडात 47 बुलेटच्या मॉडीफाय सायलेन्सरवर पोलीसांनी फिरवला बुलडोझर

Karad News

कराड प्रतिनिधी । बुलेटचा अधिकृत सायलेन्सर काढून त्या जागी कानठळ्या देणारा सायलेन्सरवर कराडच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या वतीने शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारण्यात आला. अशा बुलेटस्वारांना कारवाईचा दणका देत वाहतूक नियंत्रण शाखेने तब्बल ४७ मॉडीफाय सायलेन्सरवर बुलडोझर फिरवत ते नष्ट केले. यापुढे शहर व परिसरात प्रत्येक बुलेटची तपासणी करून मॉडीफाय सायलेन्सर जागेवरच जप्त केला जाईल, असा इशारा … Read more

हॉटेल बेसिलिकाच्या अतिक्रमणावर पाचगणी पालिकेचा हातोडा; जेसीबीच्या साह्याने कारवाई

Pachagani News 20240601 090811 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराचे मुख्य प्रवेशव्दार राज्य महामार्ग क्र १३९ लगत दांडेघर नाक्याचे रस्ता रुंदीकरणाचे कामामध्ये अडथळा ठरणारी हॉटेल बेसिलिका लगत अतिक्रमण केलेले कंपौन्ड वॉल पालिकेने जेसीबीच्या साहाय्याने शुक्रवारी पाडली. कारवाई नगरपालिकेचे अतिक्रमण पथकाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशान्वये वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वर तहसिलदार तेजस्विनी पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक निखील … Read more