जिल्ह्याधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या खासदार, आमदारांची महत्वाची बैठक; नेमकं कारण काय?

Satara News 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील सर्व विद्यमान खासदार, आमदार तसेच मान्यता प्राप्त राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांची बैठक उद्या गुरुवार दि. 25 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 10 वा आयोजित केली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 1 जुलै 2024 या अहंता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या … Read more

महू-हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले अधिकाऱ्यांना आदेश

Satara News 2024 02 28T164855.321 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प असलेल्या जावळी तालुक्यातील कुडाळी प्रकल्पांतर्गत महू – हातगेघर धरणग्रस्तांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. या प्रश्नी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या दालनात आज मुख्यमंत्र्यांचे समन्वयक मिलिंद शिंदे यांच्यासमवेत धरणग्रस्तांची बैठक पार पडली. या बैठकीत गेली २७ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धरणाचे बांधकाम ९५ टक्के झाले, मात्र धरणग्रस्तांचे पुनर्वसन करणे शिल्लक … Read more

महाविद्यालयांमधील प्राचार्यांशी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी साधला संवाद

Satara News 2024 02 27T131740.657 jpg

सातारा प्रतिनिधी । लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा आहे. सातारा जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनीची चांगल्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. नवमतदारांनी येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदान करावे. महाविद्यालयांनीही यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यनिवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे यांनी विविध महाविद्यालयांच्या प्राचार्यांशी संवाद साधला. … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयात खा. उदयनराजेंच्या उपस्थितीत झाली आढावा बैठक

Satara News 32 jpg

सातारा प्रतिनिधी । शिवप्रभूंचे राजघराणे व तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला मानाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ आणि ‘शिवसन्मान पत्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित करण्यात आला आहे. साताऱ्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज नियोजित कार्यक्रमाच्या … Read more

साताऱ्यात ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Satara News 2024 02 03T164453.940 jpg

सातारा प्रतिनिधी । सर्वसामान्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून महागाई, बेरोजगारीने जनता हैराण झाली आहे. या संकटाच्या काळात सरकारने सर्वसामान्यांना आधार देण्याची गरज आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत सरकारने दुर्लक्ष केल्यास प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने देण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संजना जगदाळे, युवकचे अध्यक्ष मकरंद … Read more

नवमतदार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी विशेष परिश्रम घ्या : जितेंद्र डुडी

Satara News 2024 02 01T164009.905 jpg

सातारा प्रतिनिधी । 18 ते 19 वयोगटातील नवमतदारांची नोंदणी मोठ्या प्रमाणावर करणे आवश्यक असून त्यासाठी महाविद्यालयांचे प्राचार्य, सरपंच, बीएलओ यांची मदत घ्यावी. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित करावे, नवमतदार नोंदणीचा टक्का वाढविण्यासाठी दैनंदिन पाठपुरावा करावा,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा निवडणूक विषयक पूर्व तयारीचा आढावा सर्व नोडल अधिकारी, प्रांताधिकारी … Read more

सह्याद्री कारखान्याची सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस, शेतकरी संघटनेचे साताऱ्यात आंदोलन

Satara News 20240201 060428 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस पाठवली आहे. या नोटीसीनंतर शेतकरी संघटना व शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. या नोटीसीचा निषेध रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने केला आहे. त्याचबरोबर ही नोटीस रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनही सुरू केले आहे. याबाबत शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. … Read more

सामाजिक कार्यकर्ते मोरेंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा उपोषण; केली महत्वाची मागणी

Satara News 81 jpg

सातारा प्रतिनिधी । गोगावलेवाडी ता. सातारा येथील जलसागर ढाब्याच्या अतिक्रमणाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ता सुशांत मोरे यांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. विविध सहा ते सात मागण्यांसाठी मोरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण केले. निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात नमूद म्हटले आहे की, गोगावलेवाडी तालुका सातारा येथे अरुण कापसे यांनी … Read more

जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो आशा-सेविकांचं आंदोलनं, केली ‘ही’ महत्वाची मागणी

Satara News 20240117 132217 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आशा व गटप्रवर्तकांना मानधन वाढ आणि 2 हजार रुपये दिवाळी बोनस करण्याचे आश्वासन देऊन 2 महिने हाेऊनही याबाबतचा शासन निर्णय झाला नाही. त्यामुळे शेकडो आशा व गटप्रवर्तकांच्या वतीने जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्यातील अंगणवाडीच्या आशा आणि … Read more

मुकादमाने पैसे नाकारले म्हणून ‘त्यांनी’ चक्क जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून केलं जेवण; पुढं घडलं असं काही…

Sugarcane Workers News jpg

सातारा प्रतिनिधी । मध्य प्रदेशमधून सातारा जिल्ह्यात आलेल्या ऊसतोड मजुरांना मुकादमाने पैसे दिले नाहीत. पोलिसांनीही दखल घेतली नाही. त्यामुळे गरीब 65 मजुरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल पेटवून स्वत:सह लहान मुलांच्या पोटात दोन घास घातले. ऊसतोड मजुरांच्या कुटुंबियांच्या या आंदोलनाची चांगलीच चर्चा सध्या जिल्हाभर होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, मध्यप्रदेश येथून ऊस तोडणीसाठी 65 मजूर … Read more

सातारा जिल्ह्यात आजपासून ‘या’ तारखेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश लागू

Jitendra Dudis News

सातारा प्रतिनिधी । राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण मिळावे अशी मागणी करत मराठा बांधवांकडून ठिकठिकाणी आंदोलने केले जात आहेत. दरम्यान, सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आजपासून शस्त्र व जमाव बंदी आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केला आहे. आजपासून … Read more