GST आयुक्त वळवींच्या प्रकरणी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरण खंडपीठाचे जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश

Satara News 20240910 140522 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील झाडाणी प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरेंनी हे प्रकरण बाहेर काढल्यानंतर या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. दरम्यान, गुजरात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांचा मूळ पत्ता शोधून आठवड्यात त्याचा तपशील सादर करावा, जेणेकरून झाडाणी प्रकरणात त्यांना प्रतिवादी ठरवून कामकाज पाहता येईल, असे निर्देश पुण्यातील … Read more

झाडाणी प्रकरणी चंद्रकांत वळवींसह दोघांबाबत शासनाकडे प्रस्ताव जाणार; उर्वरित 8 जणांवर लवकरच कारवाई

Crime News 20240729 220825 0000

सातारा प्रतिनिधी | सहयाद्री वाचवा मोहिमेतंर्गत सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी झाडानी प्रकरण उघडकीस आणले होते. या प्रकरणात महाराष्ट्र, गुजरात राज्यासह देशात खळबळ माजली होती. या प्रकरणी तातडीने कार्यवाही होत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुनावणी सुरु झाली होती.सोमवार दि.२९ जुलै रोजी याबाबत आज अंतिम सुनावणी होती. त्यात जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, या … Read more

झाडाणी प्रकरणी ‘या’ दिवशी होणार अंतिम सुनावणी; चंद्रकांत वळवींनी दिली कबुली

Satara News 39

सातारा प्रतिनिधी । सध्या राज्यात गाजत असलेल्या महाबळेश्वरमधील झाडाणी येथील तब्बल ६२० एकर जमीन व्यवहार प्रकरणी आज गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर पुन्हा सुनावणी पार पडली. यावेळी सुनावणीस गुजरातचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी स्वतः उपस्थिती लावली. त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर काही कागदपत्रे सादर केली तर उर्वरित कागदपत्रे सादर करण्यासाठी व म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागितली. … Read more

जमीन घोटाळा सुनावणीसाठी जीएसटी आयुक्त कुटुंबासह हजर; मात्र, अप्पर जिल्हाधिकारीच गैरहजर

Satara News 20240703 154722 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील जमीन घोटाळ्याच्या सुनावणीला अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांनी कुटुंबासह सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात हजेरी लावली. परंतु, ज्यांच्या समोर सुनावणी होती, ते अप्पर जिल्हाधिकारीच मंत्रालयातील बैठकीला गेले असल्याने बुधवारी सुनावणी होऊ शकली नाही. आता गुरुवार, दि ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, याप्रकरणी आपण प्रशासनास सहकार्य करू, अशा मोजक्या शब्दात … Read more

महाबळेश्वरातील जमीन घोटाळ्यात आणखी 8 जणांना नोटीसा, जिल्हाधिकाऱ्यांसमोर गुरूवारी सुनावणी

Crime News 20240619 072024 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील जमीन घोटाळ्या प्रकरणी अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्या आठ नातेवाईकांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. त्यांना गुरुवारी (दि. २० जून) होणाऱ्या सुनावणीला हजर राहावे लागणार आहे. सध्या राज्यात महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी जमीन घोटाळ्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. यापूर्वी तीन जणांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसा बजावल्या होत्या. आता आणखी आठ जणांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीसा … Read more

जिल्हाधिकाऱ्यांचा GST आयुक्तांना दणका, झाडाणी गावातील रिसॉर्टचं बेकायदेशीर बांधकाम पाडणार

Satara News 61

सातारा प्रतिनिधी । मूळचे नंदुरबारचे रहिवासी आणि अहमदाबाचे जीएसटी आयुक्त असणाऱ्या चंद्रकांत वळवी, त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावची संपूर्ण जमीनच बळकावल्याचं प्रकरण सध्या राज्यात गाजत आहे. याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी बेमुदत उपोषण सुरू केल्यानंतर जीएसटी आयुक्ताने केलेलं बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. सुशांत मोरे यांच्या हाती … Read more

झाडाणीप्रकरणी प्रशासनाकडून ‘या’ दिवशी होणार सुनावणी; सामाजिक कार्यकर्ते मोरे उपोषणावर ठाम

Satara News 57

सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावची ६२० एकर जमीन बळकावल्याप्रकरणी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी यांच्यासह तिघांना दि. ११ जून रोजी सुनावणीस हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी वळवी यांचे वकील सुनावणीस उपस्थित राहिले. मात्र, कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागून घेतल्याने याबाबतची सुनावणी येत्या २० तारखेला होणार असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, … Read more

जीएसटी आयुक्ताच्या चौकशीसाठी झाडाणी ग्रामस्थांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु

Satara News 20240611 082016 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी गावची संपूर्ण ६४० एकर जमीन बळकावणाऱ्या गुजरातमधील अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि नातेवाईकांच्या चौकशीची मागणी करत माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे आणि झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत मुदत उपोषण सुरू केले आहे. चंद्रकांत वळवींनी केलेल्या अनधिकृत बांधकामा कारवाई व्हावी, अशी मागणी देखील आंदोलकांनी केली आहे. साताऱ्यातील माहिती अधिकार … Read more

GST अधिकाऱ्याच्या ‘त्या’ जमीन खरेदीच्या व्यवहारांमध्ये लक्ष घाला; साताऱ्यातील ‘या’ आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Satara News 2 3

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कांदाटी खोऱ्यातील बेकायदा जमीन खरेदी-विक्रीचे प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. नंदूरबारचा रहिवाशी असलेले आणि सध्या अहमदाबाद, गुजरात येथे जीएसटी GST मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी यांनी कांदाटीतील 640 एकर जमीन बळकावल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केला आहे. तर त्यांच्यासह एकूण 13 जणांनी झाडाणी (ता.महाबळेश्वर) … Read more

जमीन घोटाळ्यात GST आयुक्त चंद्रकांत वळवीवर गुन्हा दाखल न झाल्यास झाडाणी ग्रामस्थ 10 जूनपासून उपोषणाला बसणार

Satara News

सातारा प्रतिनिधी | झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील वडिलोपार्जित जमिनी बळकवणाऱ्या अहमदाबादचे जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी याच्यावर गुन्हा दाखल करून जमिनी परत कराव्यात, अन्यथा दि. १० जूनपासून माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्यासमवेत उपोषणास बसणार असल्याचा इशारा झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे दिला आहे. झाडाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही खोपोली (जि.रायगड) येथे १९८० … Read more

GST आयुक्ताच्या अडचणी वाढणार, माहिती अधिकार कार्यकर्त्याने ॲंटी करप्शन विभागाकडे केली मालमत्तेच्या चौकशीची मागणी

Satara News 20240522 165203 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर तालुक्यातील पुनर्वसित गावची संपूर्ण जमीन खरेदी करणाऱ्या अहमदाबादच्या मुख्य जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवींच्या अडचणी वाढल्या आहेत. जमीन खरेदी व्यवहारप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांनी जीएसटी आयुक्तासह नातेवाईक आणि शासकीय अधिकारी, उदयोगपतींच्या मालमत्तेची सखोल चौकशी करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी केली आहे. सह्याद्री वाचवा मोहिमेतंर्गत झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावातील संपूर्ण … Read more

GST मुख्य आयुक्तांच्या अनधिकृत बांधकामाचा अहवाल सादर

Satara News 2 1

सातारा प्रतिनिधी । अहमदाबादचे जीएसटी मुख्य आयुक्त असणारे चंद्रकांत वळवी व त्यांच्या कुटुंबीयांनी, नातेवाईक अशा एकूण १३ जणांनी झाडाणी (ता. महाबळेश्वर) हे संपूर्ण गावच खरेदी केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून आयुक्तांनी ६४० एकर भूखंड खरेदी करून त्यामधील ३५ एकरावर अनधिकृतपणे केलेले बांधकाम, बेकायदा उत्खनन, खाणकाम, वन्यजीव व वन … Read more