गुजरवाडी घाटात चारचाकी गाडी हजार फूट दरीत कोसळली; एक गंभीर जखमी, गाडीचा चक्काचूर

Crime News 20231215 095327 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | गुजरवाडी, ता. पाटण येथील घाटात तीव्र वळणावरून चारचाकी मारूती अल्टो गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट एक ते दीड हजार फूट खोल दरीत कोसळल्याची घटना गुरूवारी सायंकाळी 5.15 वाजण्याच्या सुमारास घडली. गाडीचा चालक शहाजी व्यंकट भिसे (52, रा. नाडे-नवारस्ता) हा या अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याने त्यांच्यावर पाटण ग्रामीण रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी … Read more

Satara News : पाचगणी भिलार वॉटर फॉल्स पॉईंटवरून कार दरीत काेसळली; 3 जण जखमी

Accident News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील तसेच जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी होय. सध्या सलग चार दिवस सुट्या लागल्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने फिरण्यासाठी येत आहेत. मात्र, या ठिकाणी अपघाताच्या देखील घटना घडत आहेत. अशीच घटना रविवारी घडली. पुण्याहून महाबळेश्वरला फिरण्यासाठी आलेल्या एक कुटूंबियांची कार पाचगणीच्या भिलार वॉटर … Read more

तुळजापूरहून देवदर्शन करून परतताना गाडीची धडक; अपघातात एकाच कुटूंबातील 6 जण जखमी

Accideant News jpg

सातारा प्रतिनिधी | तुळजापूर येथून देवदर्शन करून परतत असताना वाई तालुक्यातील ओझर्डे गावातील लटिंगे कुटूंबियांच्या गाडीची झाडाला भीषण धडक झाली. शनिवारी रात्री झालेल्या अपघातात कुटूंबातील सहा जण जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल खाण्यात आले. सचिन लटिंगे (वय ४५), वैशाली लटिंगे (वय ४१), मंगल लटिंगे (वय ६५), प्रदीप लटिंगे (वय ३६), वर्षा लटिंगे (वय २६), … Read more

खंबाटकी घाटात ट्रक-दुचाकीच्या अपघातात युवक-युवती जागीच ठार; वाहतूक कोंडीत 30 गाड्या पडल्या बंद

20230918 061858 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी घाटात दुचाकी ट्रक खाली सापडून युवक-युवती जागीच ठार झाल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. यामुळे साताऱ्याकडे येणारी वाहतूक शिरवळ, लोणंदमार्गे वळविण्यात आली आहे. दरम्यान, सलग दुसऱ्या दिवशी ट्रॅफिक जाम होऊन इंजिन गरम झाल्याने सुमारे 30 गाड्या रस्त्यातच बंद पडल्या. वाहतूक कोंडीत रविवारी दिवसभरात अपघाताच्या एकूण 4 घटनाही घडल्या आहेt. … Read more

पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खिंडवाडीत 4 गाड्यांचा विचित्र अपघात; एकामागून एक येत…

Satara Car Accident News 20230908 113631 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सद्या मोठ्या प्रमाणात अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघाताच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नुकताच पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा येथील खिंडवाडी येथे नुकताच 4 गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात चार जण जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी की. पुणे: बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सातारा जवळील खिंडवाडी येथे पुण्याहून कोल्हापूरकडे … Read more

खंबाटकी घाटात बोगद्यात Swift कारच्या बोनेटवर आदळला लोखंडी अँगल

Car Accident News 20230818 090327 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा – पुणे महामार्गावर खंबाटकी बोगद्यात पुन्हा लोखंडी अँगल स्विफ्ट कारच्या (MH-01 -BG-7760) बोनेटवर आदळल्याची घटना गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून कारचे मात्र, मोठे नुकसान झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कार क्रमांक (MH-01 -BG-7760) ही बोगद्यातून … Read more

पुणे – सातारा रस्त्यावर धावत्या कारला भीषण आग

Car News 20230813 075421 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | धावत्या कारणे अचानक पेट घेतल्याची घटना पुणे-सातारा रस्त्यावरील पद्मावती परिसरात शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. कारमधील चालक, तसेच महिला बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कर पूर्णपणे जळून खाक झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे-सातारा रस्त्यावरुन कार कात्रजकडे … Read more

एकास धडक दिलेली कार अचानक कोसळली कालव्यात; पुढं घडलं असं काही…

Dhoom Canal Car News jpg

सातारा प्रतिनिधी । सध्या महामार्गावर चार चाकी वाहनांचे अपघात होण्याच्या घटना वाढत आहे. दरम्यान, आज पुणे- सातारा महामार्गावर खंडाळा तालुका हद्दीत एका भरधाव वेगाने पुण्याहून सातारच्या दिशेकडे निघालेल्या कारने एका युवकाला जोराची धडक दिली. या धडकेनंतर कार धोम कालव्यात जाऊन कोसळली. यावेळी स्थानिकांनी प्रसंगावधान राखत कालव्यातील पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जाणाऱ्या कारमधील लोकांना वाचविले तर कारच्या … Read more

देवदर्शनाला जाताना Omni Car झाडावर आदळली; अपघातात 3 जण जागीच ठार

Car Accident News 20230810 094958 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील धोंडेवाडी, ता. खटाव येथील पेट्रोल पंपानजिक सूर्याचीवाडी हद्दीतीतून देवदर्शनासाठी निघालेली ओमिनी कार झाडावर आदळून भीषण अपघात झाला. यामध्ये 3 जण जागीच ठार झाले असून चौघेजण गंभीर जमखी झाले असल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील पांडुरंग देशमुख यांच्या … Read more

यवतेश्वरला 2 कारची भीषण धडक : सातारा पालिकेतील कर्मचारी तरुणी जागीच ठार; 1 गंभीर

jpg 20230729 215953 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराजवळ असणाऱ्या यवतेश्वर घाट परिसरात दोन कारची समोरासमोर भीषण धडक झाल्याची दुर्घटना शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या अपघातात सातारा पालिकेतील कर्मचारी २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला. गायत्री दीपक आहेरराव (वय २१, रा. शनिवार पेठ, सातारा) असे अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर ओंकार लोखंडे … Read more

गप्पा मारत निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; Briza कार पलटी होऊन एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

Karad-Patan Road Accident

कराड प्रतिनिधी | कराड- पाटण रस्त्यावर भरधाव वेगाने Briza कार घेऊन जात असताना कार अचानक पलटी होऊन यामध्ये दोघा मित्रांचा अपघात झाल्याची घटना पाटण तालुक्यातील मल्हारपेठजवळील आबदारवाडी हद्दीत घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात घराचे तसेच गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सागर दिनकर माथणे (वय- 35, रा. … Read more