मला फक्त दिल्लीत सोडा; बघा मी काय करून दाखवतो; साताऱ्यातील NCP च्या बढया नेत्याचं मोठं विधान

Sharad Pawar NCP

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. या बालेकिल्ल्याला भाजपकडून अनेक हादरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी हा बालेकिल्ला कुणाच्याही हातात जाऊन दिलेला नाही. आगामी सातारा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे खा. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी कुणाला निवडणुकीच्या रणांगणात उतरवणार हे पहावे लागणार आहे. अशात विधानपरिषदेचे … Read more

सातारा जिल्हा जिंकण्याचा BJP मध्ये दम नाही; शशिकांत शिंदेंचा निशाणा

NCP News

कराड प्रतिनिधी । आमचा सातारा जिल्हा हा स्वाभिमानी आहे आणि सर्वात महत्वाचे तो राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे. त्याला डिवचण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. सातारा जिल्हा जिंकण्याचा दम भाजपमध्ये नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपवर केला. उंब्रज ता. कराड येथे राष्ट्रवादीच्या बूथ कमिटीचा नुकताच मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी मंत्री आ. बाळासाहेब … Read more

एकनाथ शिंदे यांचे सैन्य भाडोत्री,BJP ला बाहेरुन घ्यावा लागतोय गद्दार मुख्यमंत्री; संजय राऊतांची घणाघाती टीका

Sanjay Raut News

कराड प्रतिनिधी । रशियात ज्याप्रमाणे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर त्यांनी नेमलेले भाडोत्री सैन्य उलटले आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे सैन्य भाजपाचे भाडोत्री सैन्य असून, हे सैन्य भाजपावर उलटल्याशिवाय राहणार नाही. कारण शिंदे यांचे सैन्य भाडोत्री आहे. आणि भाजपलाही अशा बाहेरून गद्दार मुख्यमंत्र्यांना घ्यावं लागतंय, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more

2024 मध्ये BJP चा जिल्ह्याचा लोकसभा, विधानसभेचा उमेदवार कोण असणार? फडणवीसांचे मोठे विधान

Devendra Fadnavis Karad

कराड प्रतिनिधी । संतोष गुरव सातारा जिल्ह्यात भाजपने अनेक विकास कामे केली आहेत. सातारा जिल्ह्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी आजच्या महाजनसंपर्क अभियान, मेळाव्यातून भाजपने सुरुवातच केल्यासारखे झाले आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या मेळाव्यात आगामी 2024 चा लोकसभा आणि कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचा भाजपचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. … Read more

जिल्ह्यातील दुष्काळी प्रकल्पांसह म्हसवड-धुळदेव MIDC ला गती देणार : देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis Karad

कराड प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात जे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांच्या माध्यमातून दुष्काळी भागांना पाणी मिळणार आहे, अशा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध केला जाईल. तसेच माण तालुक्यातील म्हसवड-धुळदेव औद्योगिक वसाहतीच्या कामालाही गती देण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. कराड येथील कृष्णा सहकारी बँकेच्या सभागृहात जिल्ह्यातील औद्योगिक वसाहत व जलसंपदा विभागाच्या … Read more

पंढरपूरात भक्तिभावाने या, पण राजकारणासाठी कोणी येऊ नये; फडणवीसांचा KCR यांना इशारा

jpg 20230622 143133 0000

कराड प्रतिनिधी | तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आपल्या पक्षाचे पाय रोवायला सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणजे आषाढी एकादशी निमित्ताने चंद्रशेखर राव पंढरपूर मध्ये जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता भक्तीभावाने कोणी पंढरपूरला आल्यास स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. कराड येथील कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

दोन्ही राजेंच्या वादावर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले की…

Devendra Fadnavis in Karad

कराड प्रतिनिधी | सातारा बाजार समितीच्या जागेतील भूमिपूजनाच्या राड्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह ५० जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, कालच्या वादानंतर दोन्ही राजेंनी आज सकाळी कराडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्र भेट घेतली आहे. या भेटीनंतर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही राजेंसोबत विकासकामा संदर्भात आज चर्चा झाली. वास्तविक दोन्ही राजे विकासकामांसाठी … Read more

Satara News : मुख्यमंत्री शिंदे अचानक साताऱ्यात दाखल, फडणवीसही कराडातच; चर्चाना उधाण

devendra fadnavis eknath shinde

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडकेराज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी म्हणजेच दरे येथे दाखल झाले आहेत. काल दुपारी 2 वाजता शिंदे अचानकपणे आपल्या मूळगावी दाखल झाल्याने चर्चाना उधाण आले आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आज साताऱ्यातील कराड तालुक्यात आहेत. भाजपच्या महाजनसंपर्क अभियानाअंतर्गत फडणवीस कराड येथे आले असून भाजपकडून भव्य … Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या कराड मुक्कामी; BJP कोअर कमिटीच्या बैठकीचे आयोजन

Devendra Fadnavis to stay in Karad

कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्यावतीने देशभर महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत कराडला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराडच्या दौऱ्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी (ता. 22) सकाळी 11 वाजता कराड येथे भव्य … Read more

इगो हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही; खासदार उदयनराजे भोसले

Udayanaraje Bhosale Shambhuraj Desai Shivendraraje Bhosale.

सातारा प्रतिनिधी । उदयनराजे भोसले आणि शंभूराज देसाई यांच्यातील हे इगो वॉर असून, त्यात सातारकर आणि शिवप्रेमी अडकले आहेत, अशी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली होती. त्यांच्या टिकेला आज खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिउत्तर दिले. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि आमचे सलोख्याचे संबंध आहेत. माझा कोणत्याही कामाला विरोध नाही; परंतु पोवई नाक्यावरील शिवतीर्थाचे पावित्र्य हे … Read more

आमदार जयकुमार गोरेंनी गजी नृत्यावर ढोल वाजवत धरला ठेका

MLA Jayakumar Gore News

कराड प्रतिनिधी । कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना कमी वयात निवडून आलेले आणि लोकांच्या विकासासाठी सदैव झटणारे माण येथील आमदार अशी जयकुमार गोरे यांची ओळख. 2009, 2014 आणि 2019 मध्ये सलग तीन वेळा ते विधानसभा निवडणूक जिंकले. 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करत निवडणूक लढवली होते. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे. … Read more

शिवतीर्थावरील वादाप्रश्नी आ. शिवेंद्रराजेंकडून उदयनराजे अन् पालकमंत्र्यांची कानउघडणी; म्हणाले की…

Shivendraraje Bhosale News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात जो काही इगो वॉर सुरू आहे. एकाने भिंतीवर चित्र रंगवलं म्हणून दुसऱ्याने स्मारकाचा विषय काढला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज किंवा सातारची छत्रपती शाहू महाराज यांच्याबाबत कोणतीही तडजोड कोणीही करणार नाही. सुरू असलेले इगो वॉर दोन्ही नेत्यांनी थांबवावे. पालकमंत्र्यांनीच याबाबतीत सामंजसपणा दाखवावा उदयनराजेंशी बोलण्यात काही अर्थच नाही कारण उदयनराजे हे … Read more