छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर कोणत्या राजाने वाघनखांनी कोथळा काढलाय? : आ. शिवेंद्रराजे भोसले

Shivendraraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनख्यांनी अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला याची इतिहासात नोंद आहे. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य कुठल्याच राजाची अशी नोंद कुठेही आढळून येत नाही. याचाही कुठेतरी विचार करायला हवा. जो काही चुकीचा इतिहास पसरवला जातोय तो थांबविण्यासाठी श्री रामदासस्वामी संस्थान व आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा भाजप आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त … Read more

“मी पवारांचा चमचा नाही, माझ्या नादाला लागू नका”; आ. जयकुमार गोरेंचा नेमका कुणाला इशारा?

Jaykumar Gore News 20231008 110720 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | मी तालुक्‍यात आलो तेव्हाही चांगली गाडी घेऊनच आलो होतो. माझे जे काही आहे ते व्यवसायातून आणि खुल्या किताबाप्रमाणे आहे. मी प्रांत, कलेक्‍टर, आयुक्त, सचिव आणि पवारांचा चमचा नाही. पवारांनी माझी पाच वेळा चौकशी लावली होती. मात्र, ज्या दिवशी तुमची चौकशी लावू त्यादिवशी तुमची जागा कुठे असेल याचा विचार करा. जयकुमारला डिवचू नका. … Read more

वेळ आली तर लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी मोदी हिटलरप्रमाणे वागतील; डॉ. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

Prakash Ambedkar targeted Narendra Modi News 20231008 090025 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हिटलरने केले ते सगळे करतील यात शंका नाही. दिवाळीपूर्वी अटकसत्र सुरू होणार असून, ते निवडणुकीपर्यंत राहील. गोध्रा हत्याकांड, मणिपूर दंगल घडली, त्याप्रमाणे पुन्हा घडण्याची शक्यता आहे, असा आरोप ‘वंचित’चे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी करीत पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला. संविधान जनजागृती विचारमंचतर्फे काल अ‍ॅड. प्रकाश … Read more

प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं तसं होता येतं का?; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Chandrasekhar Bawankule News jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच्यावतीने जोरदार तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे ‘मेरी माटी, मेरा देश’ या या अभियानाच्या अंतर्गत ठिकठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सातारा व कराड दौऱ्यासाठी साताऱ्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केल्या … Read more

जावळीत आता ‘यांचा’ विषय संपल्यात जमा हाय…; बाजार समितीच्या सभेत आ. शिवेंद्रराजेंचा निशाणा कुणावर?

Shivendraraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । जावळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून संस्थेच्या उत्पन्न वाढीसाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. मात्र, दरवेळी कोणतीही निवडणूक लागली की काहींना निवडणूक लादण्याची हौस येते. आता प्रत्येक निवडणुकीत मतदार त्यांना मताच्या रूपात त्यांची जागा दाखवून देत आहेत. त्यामुळे अशा विरोधकांचा विषय आता तालुक्यातून संपल्यात जमा आहे, असे प्रतिपादन भाजप आमदार शिवेंद्रराजे … Read more

पालकमंत्री असताना निधी देत नव्हते आता त्यांना कसा मिळणार?; BJP जिल्हाध्यक्ष कदमांचा नाव न घेता आ. बाळासाहेबांवर निशाणा

Darhysheel Kadam Pess Conference News jpg

कराड प्रतिनिधी । भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सातारा व कराड दाैऱ्यावर येत आहेत. या पार्श्ववभूमीवर माहिती देण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी आज कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. जेव्हा यांच्याकडे मंत्रिपद होते तेव्हा यांनी … Read more

शेतकर्‍यांच्या पोरांचे पाय काढण्याची भाषा खपवून घेणार नाही : खा. रणजितसिंह निंबाळकरांचा इशारा

Ranjit Singh Nimbalkar News jpg

सातारा प्रतिनिधी । बापजाद्यांनी काढलेला कारखाना स्वतःमध्ये हिम्मत नसल्याने जवाहरच्या कुबड्या घेऊन चालवत आहात. कारखाना तुमच्या खाजगी मालकीचा नाही. तो शेतकर्‍यांच्या मालकीचा आहे. त्या शेतकर्‍यांच्या पोरांचे पाय काढण्याची भाषा तुम्ही कराल आणि आम्ही ते खपवून घेऊ, अशी तुमची अपेक्षा असेल तर मुळीच घेणार नाही. विश्वासराव भोसले यांच्या केसाला धक्का लावून दाखवा. फलटणची जनता तुमच्या कमरेला … Read more

साताऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाईंनी खासदार उदयनराजेंना वाकून घातला मुजरा; नेमकं काय घडलं?

Shambhuraj Desai Udayanraje Bhosale News 1 jpg

सातारा प्रतिनिधी । कधी शांत तर कधी हसमुख आणि मनात आणलं तर जनतेसाठी कायपण असे म्हणत कॉलर उडवत बिनधास्त डान्स करणाऱ्या सातारच्या भाजप खासदार उदयनराजे भोसले याना सर्वचजण ओळखतात. तर याउलट उत्तम संसद पट्टू आणि शिंदे गटाचे आमदार, साताऱ्याचे पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांच्याकडे पाहिले जाते. मध्यंतरी दोघांच्यात काही विषयांवर वाद चालले होते. मात्र, आता … Read more

छ. शिवाजी महाराजांची लंडनमधील वाघ नखे खोटी हे सिध्द करून दाखवा; साताऱ्यात शिवेंद्रराजेंचे विरोधकांना आव्हान

Shivendraraje Bhosale News jpg

सातारा प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या वाघनखांनी अफझलखानाचा कोथळा काढला. त्यासारखी व त्यावेळची वाघनखं महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा पाहायला मिळणार आहेत. लंडनच्या व्हिक्टोरिया म्युझियममधून वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार आहेत, परंतु ती वाघनखं महाराष्ट्रात येण्याअगोदरच त्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरले आहेत का? असा … Read more

केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा आजपासून 2 दिवस सातारा जिल्हयात

Ajay Kumar Mishra News jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी भाजपकडून बैठका घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे आजपासून दोन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या या दौऱ्यात भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक रात्री उशिरा … Read more

BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा अखिल मराठी पत्रकार संघातर्फे कराडात निषेध; दिला ‘हा’ थेट इशारा

Karad News 20230930 230918 0000 jpg

कराड प्रतिनिधी | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या अपमानकारक वक्तव्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा विविध पत्रकार संघटनेच्यावतीने निषेध करण्यात आला. दरम्यान, अखिल मराठी पत्रकार संघाच्या सातारा जिल्हाच्यावतीने देखील बावनकुळे यांचा नुकताच निषेध करण्यात आला. तसेच बावनकुळे हे कराड दौऱ्यावर यापुढे केव्हाही येतील त्यावेळी त्यांनी पत्रकारांबाबत केलेल्या या अपमानकारक वक्तव्याबाबत त्यांना याठिकाणी रोखठोक जाब विचारण्यात … Read more

केंद्र व राज्य सरकारच्या जनहिताच्या योजना समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा : डॉ. अतुल भोसले

Dr. Atul Bhosale News 20230924 131232 0000 jpg

कराड प्रतिनिधी | केंद्र व राज्य सरकारच्या वतीने ज्या जनहिताच्या योजना राबविल्या जात आहेत. त्या सर्व योजना भाजपाच्या बूथ प्रमुखांनी समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी केले. कराड दक्षिण मतदारसंघातील ३०८ बुथचे प्रमुख आणि शक्तीकेंद्र प्रमुखांच्या व्यापक बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे … Read more