कोण कुणाशी कधी लग्न करतं अन् कधी घटस्फोट घेतं…; पक्ष फोडाफोडीवर गडकरींच वक्तव्य अन् सारवासारव

Nitin Gadkari News 20240504 210007 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील दहिवडी येथे महायुतीच्यावतीने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहीर सभा घेण्यात आली. या सभेस भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पक्ष फोडाफोडीवर सडेतोड मत मांडलं. मात्र, लगेचच त्यांनी सारसारव करण्याचा प्रयत्न केला. प्रचारसभेत मंत्री गडकरी म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रात अमेरिकन संस्कृती … Read more

भाजपचा प्रचार करतो म्हणून विक्रेत्यास मारहाण करून मोबाईल केला लंपास, 72 तासात तिघांना केले जेरबंद

Crime News 20240503 180238 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा एलसीबी आणि सातारा ग्रामीण पोलिसांनी ७२ तासात उघडकीस आणत तिघांना अटक केली आहे. भाजपचा प्रचार करतोस काय?, तुला लय मस्ती आली आहे काय?, असे म्हणत सरबत विक्रेत्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून, कोयत्याने मारहाण करत त्याचा मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी पोलिसांनी रजत राजेंद्र निंबाळकर, प्रवीण दत्तात्रय … Read more

माझ्या विरोधात शरद पवारांनी लकी ड्रॉ काढून भ्रष्टाचार केलेला उमेदवार उभा केला; उदयनराजेंचा पुन्हा हल्लाबोल

Udayanraje Bhosale News 20240502 184854 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीने आक्रमक प्रचाराला सुरूवात केली आहे. शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं आहे, तर महायुतीचे उमेदवार उदयनराजेंनी शरद पवार आणि उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या टीकेची झोड उठवली आहे. शरद पवारांनी लकी ड्रॉ काढून भ्रष्टाचार केलेला उमेदवार माझ्याविरोधात उभा केला असल्याची खरपूस टीका उदयनराजेंनी पाटखळ, शिवथर … Read more

उदयनराजेंची राज्यसभेची अजून 2.5 वर्षे बाकी शिंदेंना निवडून दिल्यास 2 खासदार मिळतील : अमोल कोल्हे

Wai News 20240502 180814 0000

सातारा प्रतिनिधी । भाजपच्या उदयनराजे भोसले ( Udayanraje Bhosale) यांची राज्यसभेची अजून अडीच वर्षे बाकी आहेत, त्यामुळे शशिकांत शिंदेंना (Shashikant Shinde) निवडून दिल्यास साताऱ्याला दोन खासदार मिळतील, अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते खासदार डॉ. अमोल कोल्हे उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी वाई विधानसभा मतदारसंघातील पाचवड … Read more

अजित पवार गटाच्या मेळाव्यात कराड, पाटण तालुक्यांसाठी उदयनराजेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Karad News 20240502 125539 0000

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत बुधवारी कराडमधील हॉटेल फर्नमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा नुकताच एक संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात खा. उदयनराजेंनी मोठी घोषणा केली. कराडमधील जनसंपर्क कार्यालयात आठवड्यातील दोन दिवस आपण कराड उत्तर, दक्षिण आणि पाटण मतदार संघातील लोकांना भेटून त्यांच्या समस्या … Read more

काँग्रेसमध्ये सर्वात मोठा भूकंप होणार, एक बडा नेता भाजपात जाणार; प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Karad News 20240502 091649 0000

कराड प्रतिनिधी | स्वतःला विरोधी पक्ष म्हणवणारा काँग्रेस संघटनात्मक पातळीवर क्षीण होत चालल्याने हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अंगावर घेऊ शकत नाही अशी टीका करताना, आता तर सातारा जिल्ह्यातील एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर असून, त्यांना राज्यपालपद कधी मिळणार हे केवळ बाकी असल्याचा गौप्यस्फोट वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी काल केला. … Read more

इंडिया आघाडी अन् काँग्रेस सत्तेत आल्यास संविधान बदलतील; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

Narendra Modi News 20240429 190218 0000

कराड प्रतिनिधी | कराड येथे सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार पडली. यावेळी त्यांनी काँग्रेससह इतर इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. “सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यातून समाजात फूट पाडत आहेत. इंडिया आघाडी आणि काँग्रेस तिसऱ्यांदा सत्तेत आले तर संविधान … Read more

Narendra Modi : कराडातील महाविराट सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दाखल; हात जोडत केला नमस्कार

Karad News 20240429 164440 0000

कराड प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक 2024 (Satara Lok Sabha Election 2024) मधील सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची कराड येथे आज सोमवार, दि. 29 विराट महाविजय सभा होत आहे. या सभेसाठी पंतप्रधान मोदी थोड्यावेळापूर्वीच दाखल झाले. यावेळी या ठिकाणी त्यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत … Read more

महाराष्ट्रात पक्ष फोडून सरकार पाडायला पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच राजाश्रय, पृथ्वीराज चव्हाणांचा थेट हल्लाबोल

Prithviraj Chavan News 20240429 080528 0000

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्रातील सरकार पाडायला आणि पक्ष फोडायला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्पष्ट आशिर्वाद होता. मोदींच्या संमतीनेच सगळं झालेलं आहे. त्यांनी लॉजिस्टिकल मदत पुरवली असल्याचा खळबळजनक दावा माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. तसेच हा राजनैतिक भ्रष्टाचार असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकार पाडण्यात राजनैतिक भ्रष्टाचार भ्रष्टाचार हा दोन प्रकारचा आहे. … Read more

नरेंद्र मोदींच्या सभेमुळे कराडला उद्या वाहतुकीत बदल; ‘अशी’ असणार वाहतूक

20240428 105704 0000

कराड प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सैदापूर (ता. कराड) येथील सभेच्या अनुषंगाने कराड शहरातील अंतर्गत वाहतुकीत बदल करुन वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी दि. २९ एप्रिल रोजी मध्यरात्रीचे एक वाजल्यापासून सभा संपेपर्यंत पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी अधिसूचना पारित केली आहे. या अधिसूचनेद्वारे वाहनांच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. सोमवारी दि. २९ एप्रिल रोजी … Read more

छत्रपती उदयनराजेंचा ‘संकल्पनामा’ पाहिला का?; मतदारांना केलं थेट ‘हे’ आवाहन

Satara News 20240427 160759 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) पायाला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. उदयनराजे भोसले यांचा २०१९ च्या पोटनिवडणुकीत पराभव झाला होता. आता पुन्हा एकदा त्यांच्या समोर शरद पवार गटाचे आव्हान आहे. शशिकांत शिंदे यांच्याशी त्यांचा थेट सामना होणार आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा … Read more

एपीएमसी शौचालय घोटाळ्यावरून आरोप-प्रत्यारोप, खा. उदयनराजे अन् शशिकांत शिंदेंनी काय दिली प्रतिक्रिया…

Udayanraje Bhosale News 20240426 085447 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | नवी मुंबई बाजार समितीतील शौचालय घोटाळ्यावरून साताऱ्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. साताऱ्याची निवडणूक महायुतीच्या हातून गेल्यामुळेच आपल्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले जात असल्याची प्रतिक्रिया मविआचे उमेदवार शशिकांत शिंदेंनी दिली आहे, तर शशिकांत शिंदेंवर त्यांच्या कर्मामुळे ही वेळ आली असल्याची टीका खा. उदयनराजेंनी केली आहे. आ. शशिकांत … Read more