पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात सोमवारी होणाऱ्या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष लावणार उपस्थिती

Patan News 6 jpg

पाटण प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तयारी केली जात आहे. त्यात विशेष करून सातारा जिल्ह्याकडे भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे विशेष लक्ष लागले आहे. पुढील आठवड्यात जिल्ह्यात पंतप्रधान मोदी साताऱ्यात येत आहेत. त्यामुळे भाजपकडून त्याची जय्यत तयारी सुरु केली जात आहे. तसेच पाटण मतदार संघमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे शिवसेनेचे … Read more

साताऱ्यातील पंतप्रधान मोदींच्या ‘शिवसन्मान’ सोहळ्याचा नियोजन अहवाल फडणवीसांकडे सादर

Satara News 2024 02 03T155100.879 jpg

सातारा प्रतिनिधी । शिवप्रभूंचे राजघराणे व तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला ‘शिवसन्मान पुरस्कार’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. साताऱ्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पुरस्कार सोहळ्याचा नियोजनाचा अहवाल आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करण्यात आला. दि. … Read more

“सत्तेची मस्ती या अर्थसंकल्पातून दिसते”; ‘बळीराजा’ संघटनेच्या पंजाबराव पाटील यांची प्रतिक्रीया

Karad News 34 jpg

कराड प्रतिनिधी । अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत देशाचे अंतरिम बजेट सादर केलं. आपल्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी मागील १० वर्षात मोदी सरकारने देशातील जनतेसाठी केलेल्या कामाचे वाचन केलं. आमचं सरकार समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करत असून २०४७ पर्यंत आपण विकसित भारत होऊ असं सीतारामन यांनी म्हंटल. मात्र, केंद्राच्या अर्थसंकल्पावर बळीराजा … Read more

BJP ने पाटणमध्ये केली ‘कमळ’ फुलवण्याची तयारी, विक्रमबाबांवर दिली ‘ही’ महत्वाची जबाबदारी

Patan News 20240201 044830 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी केली जात आहे. काहींनी लोकसभेचे उमेदवार ठरवले असून त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरु केली आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यात अगोदर अजित पवार गटाने जिल्ह्यातील पक्षवाढीसाठी बारामतीच्या शिलेदराची निवड केली. त्यानंतर भाजपनेही फळतांसह जिल्ह्यात कमळ फुलवण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांच्या निवडीला सुरुवात केली … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार साताऱ्यात; नेमकं कारण काय?

Satara News 2024 01 31T160008.745 jpg

सातारा प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान असून त्यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. पंतप्रधान मोदी हे साताऱ्यात प्रथम २०२९ च्या लोकसभा पोट निवडणूकीवेळी आले होते. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी ते पुन्हा सातारा येथे येणार आहेत. त्यांच्या सातारा दौऱ्याचं कारण देखील खास आहे. शिवप्रभूंचे राजघराणे व तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला ‘शिवसन्मान … Read more

अजितदादांच्या पाठोपाठ आता जिल्ह्यात ‘भाजप’कडूनही पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या

Phaltan News 3 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांच्यावर महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या सातारा निरीक्षकपदी बारामतीचे किशोर मासाळ यांची निवड केली व त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. आता त्याच्या पाठोपाठ भाजपही तयारीला लागले असून भाजपच्या सोशल मीडिया आयटी सेलच्या … Read more

‘काळजी करू नका, आरक्षणाला धक्का लागणार नाही,’ भुजबळांच्या नाराजीच्या विधानावर फडणवीसांचं प्रत्युत्तर

IMG 20240128 WA0008 jpg

पाटण प्रतिनिधी । मराठा समाजातील सग्यासोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारने नोटिफिकेशन काढलं आहे. राज्य सरकारच्या या नोटिफिकेशनच्या निर्णयावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी थेट नाराजी व्यक्त करत झुंडशाहीच्या जोरावर कायदे करता येणार नाही. आरक्षणाचा मुद्दा हा कोर्टात टिकणार नाही, अशा शब्दात सरकारला सुनावले. दरम्यान, त्यांच्या या नाराजीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटण … Read more

2 आठवड्यात म्हणणे सादर करा, द्विसदस्यीय खंडपीठाचे राज्य सरकारच्या वकिलांना आदेश

karad News 29 jpg

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील मशिदीवर हल्ला तसेच मुस्लिम धर्मीयांच्याविषयी भावना भडकवणारी वक्तव्ये करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचे नेते विक्रम पावसकर यांच्या विरोधात सातारा व सांगली पोलिसांनी का कारवाई केली नाही? असा सवाल करत येत्या दोन आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयात म्हणणे सादर करण्याचे आदेश सरकारच्या वकिलांना मुंबई उच्च न्यायालयाच्या द्वीसदस्यीय न्यायाधीशांच्या बेंचने दिला आहे. … Read more

मराठा समाजाला न्याय देण्याचं आ. शिवेंद्रराजेनी दिलं फडणवीसांना श्रेय, म्हणाले की…

Maratha News jpg

सातारा प्रतिनिधी । मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आज मोठं यश आल्याचं मानलं जातंय. त्याचं श्रेय साताऱ्यातील भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलंय. मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री होऊन गेले. अनेक नेते मराठा समाजाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यापैकी कोणीही मराठ्यांना न्याय दिला नाही. परंतु खऱ्या अर्थानं सगळ्यात आधी तो न्याय देवेंद्र फडणवीस … Read more

भाजपमुळेच आज राज्यात फोडाफोडीचं राजकारण; साताऱ्यात रोहिणी खडसेंची घणाघाती टीका

Satara News 76 jpg

सातारा प्रतिनिधी । राज्यात सध्या राजकीय वातारण चांगलेच तापले आहे. शिवाय ते गढूळ देखील झाले आहे. ते म्हणजे राज्यात भाजपने फोडाफोडीचे राजकारण केल्यामुळे होय. स्वकियांपेक्षा भविष्यात आमच्यासमोर कोणते आव्हान असेल तर ते या भ्रष्ट जुमला पार्टीचेच आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी केली. इतकेच नाही तर शरद पवार यांची … Read more

कोणता खेळाडू पुढे आणायचा, कोणाची विकेट घ्यायची, हे शरद पवारच ठरवतील; आमदार शिंदेंचा यॉर्कर

Shashikant Shinde 20240122 094520 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोणता खेळाडू पुढे आणायचा, कोणाची विकेट घ्यायची, हे आयपीएलचे जनक असलेले खासदार शरद पवारच ठरवतील, असे वक्तव्य आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात प्रसार माध्यमांशी बोलताना केलं आहे. दरम्यान, कारसेवक असल्याचे पुरावे फडणवीसांना द्यावे लागतात, हेच दुर्दैवी आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणविसांवर त्यांनी केली. शरद पवारांनीच आयपीएल आणली कराडमध्ये देवेंद्र फडणवीसांनी खा. उदयनराजेंना … Read more

सातारासह कराड दक्षिणेतील 3 मोठ्या पक्षांतील कार्यकर्त्यांचा ‘उबाठा’ शिवसेनेत प्रवेश

Karad News 20240121 112928 0000 jpg

कराड प्रतिनिधी | सातारा आणि दक्षिण कराडमध्ये आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून कार्यकर्त्याची मोर्चे बांधणी केली जात आहे. अशात आता सातारासह कराड दक्षिणेत भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडले आहे. कारण या 3 मोठ्या पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेना नेते तथा खासदार अनिल देसाई … Read more