घरातील सोन्याच्या दागिन्यांची केली चोरी; लोणंद पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 3.5 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत

Crime News 5

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील एका घरातून सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारून मुद्देमाल नेल्याची तक्रार लोणंद पोलीसात दाखल करण्यात आली होती. त्याचा तपास करताना लोणंद पोलीसांनी एका संशयीतास अटक करून त्याच्याकडून चोरीचे २ लाख ४५ हजार रुपये किंमतीचे साडेतीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. याबाबत अधिक माहिती अशी की, लोणंद येथील गोटेमाळ परीसरातील एका … Read more

अनोळखी इसमाचा खून करुन ‘त्यांनी’ अपघाताचा केला खोटा बनाव, पोलिसांनी ठोकल्या चौघांना बेड्या

Crime News 1 2

सातारा प्रतिनिधी । अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका ४० ते ४५ वर्षांच्या अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून व त्याला बेदम मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना दि. १८ मे रोजी सुरूर ता. वाई येथे घडली होती. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात चाैघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील चार आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. … Read more

साताऱ्यात घडला चोरीचा अजब प्रकार; पगार कमी देतो म्हणून मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या कामगारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News

सातारा प्रतिनिधी । एखादी चोरीची घटना घडली कि त्या चोरी करणाऱ्यास पोलिस पकडतात. त्याला पकडल्यानंतर त्यामागचे कारण विचारल्यास कुणी गरिबीचे कारण सांगतो तर कुणी पैसे मिळवण्यासाठी आपण चोरी केल्याचे कारण पुढे करतो. मात्र, साताऱ्यात शहरातील एका कापड व्यावसायिकाच्या घरात त्याच्याच दुकानात काम करणाऱ्या कामगाराने चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. सदर कामगार चोरास कारण विचारले असता … Read more

भर जत्रेत पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरूणाला LCB ने ठोकल्या बेड्या,2 वर्षात पोलिसांनी किती शस्त्रे केली जप्त?

Karad News 20240528 080522 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात दर आठवड्याला तरूणांकडे बेकायदेशीर शस्त्रे सापडत आहेत. बेकायदेशीर शस्त्रे घेवून तरूण खुलेआम फिरत आहेत. सातारा जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखा अशा बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांवर धडक कारवाई करत असून कराड तालुक्यातील कोरेगावच्या यात्रेत पिस्टल घेवून फिरणाऱ्या तरूणाला एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत. निखिल शशिकांत थोरात (वय २५, रा. नांदलापूर, ता. कराड), … Read more

चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराकडून बहीण-भावाची हत्या : निंभोरे दुहेरी खुनाचा पोलिसांकडून छडा

20240525 213317 0000

सातारा प्रतिनिधी | फलटण तालुक्यातील निंभोरे गावाच्या हद्दीत पालखी महामार्गावरील नवीन उड्डाणपूल शेजारी सख्ख्या बहिण भावाच्या खून केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेत फलटण पोलीसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत दुहेरी खुनाच्या गुन्ह्याचा 10 तासांच्या आत छडा लावत आरोपीस जेरबंद केले. सुमित तुकाराम शिंदे (वय २०) व शीतल तुकाराम शिंदे उर्फ शीतल रणजित … Read more

भाजपचा प्रचार करतो म्हणून विक्रेत्यास मारहाण करून मोबाईल केला लंपास, 72 तासात तिघांना केले जेरबंद

Crime News 20240503 180238 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा एलसीबी आणि सातारा ग्रामीण पोलिसांनी ७२ तासात उघडकीस आणत तिघांना अटक केली आहे. भाजपचा प्रचार करतोस काय?, तुला लय मस्ती आली आहे काय?, असे म्हणत सरबत विक्रेत्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून, कोयत्याने मारहाण करत त्याचा मोबाईल चोरून नेला होता. याप्रकरणी पोलिसांनी रजत राजेंद्र निंबाळकर, प्रवीण दत्तात्रय … Read more

सातारा एलसीबीची मोठी कारवाई; निवडणुकीच्या काळात घातक स्फोटकांचा बेकायदा साठा केला जप्त

Crime News 20240503 164119 0000

सातारा प्रतिनिधी | सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. तीन दिवसांवर मतदान आहे. अशातच साताऱ्यात एलसीबीने मोठी कारवाई करत जिलेटीन आणि डिटोनेटर्स, अशा घातक स्फोटकांचा बेकायदा साठा जप्त केला आहे. स्फोटकांची वाहतूक करणारी स्कार्पिओ कार, १०७० जिलेटीनच्या कांड्या, ७६ डिटोनेटर्स, असा एकूण ६ लाख १७ हजार रूपये किंमतीच्या मुद्देमालाचा जप्त करून श्रीधर संभाजी निंबाळकर … Read more

साताऱ्यात दोघे ताब्यात, 2 पिस्टल अन् 3 जिवंत काडतुसे जप्त

Crime News 20240427 130545 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीमुळे जिल्ह्यात पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने सातारा शहरात दोघांना ताब्यात घेऊन देशी बनावटीचे दोन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे हस्तगत केली. तसेच या घटनेत एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला. या घटनेतील एक संशयित जावळी तालुक्यातील तर दुसरा सांगली जिल्ह्यातील आहे. ओंकार राजाराम … Read more

किरकोळ वादातून दगडाने मारहाण करुन पंधरा वर्षीय मुलाचा खून

20240422 003643 0000 jpg

कराड प्रतिनिधी | किरकोळ वादातून पंधरा वर्षीय मुलाला दगडाने मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला. तर आरोपींनी केलेल्या हल्ल्यात मुलाचा भाऊ गंभीर जखमी झाला. विमानतळ कराड येथे रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून अटक केले आहे. अल्तमस अहमद खान (वय १५, सध्या रा. वारुंजी, ता. कराड, … Read more

5 जणांनी केली बकऱ्यांची चोरी, 24 तासात आवळल्या मुसक्या, दोघे निघाले अल्पवयीन

Crime News 31 jpg

सातारा प्रतिनिधी । बकऱ्यांची चोरी करणाऱ्या संशयितांच्या लोणंद पोलिसांनी 24 तासाच्या आत मुसक्या आवळल्या. चोरून नेलेल्या बकऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेल्या स्विफ्ट कारसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ओंकार अशोक खुंटे, करण विनोंद खुंटे, सुरज ऊर्फ चिंग्या संतोष खुंटे आणि दोन अल्पवयीन मुलांचा या गुन्ह्यात सहभाग आढळून आला आहे. लोणंद पोलीस ठाण्याच्या हददीतील आंदोरी (ता. खंडाळा) … Read more

साताऱ्यातील साडीच्या दुकानावर दरोडा टाकून दहशतवाद्यांनी खरेदी केले होते बॉम्ब तयार करण्याचे साहित्य

Crime News 20240314 090534 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | गेल्या वर्षी इस्लामिक स्टेट (आयएस) संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांनी सातारा महामार्गावरील अजंठा चौकातील गणपती सिल्क साडी सेंटरवर दरोडा टाकून लुटलेल्या एक लाख रुपयांतून बॉम्ब तयार करण्याचे साहित्य खरेदी केल्याची धक्कादायक माहिती दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) तपासात समोर आली आहे. या प्रकरणी ‘एटीएस’ने महंमद शहानवाज आलम खान उर्फ अब्दुल्ला उर्फ … Read more

भुईंज पोलिसांनी उत्तर प्रदेशातून केली 2 परप्रांतीयांना अटक; 83 लाख रुपये केले हस्तगत

Satara News 85 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा पाेलिस दलातील भुईंज पोलिसांच्या पथकाने खासगी बसमधून पैशाची बॅग चोरणाऱ्या दोन परप्रांतीयांना उत्तरप्रदेश येथून अटक केली. आरोपीना अटक केल्यानंतर त्यांना घेऊन पथक आज साताऱ्यात दाखल झाले. दरम्यान, त्यांच्याकडून ८३ लाखांची राेकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. हसन जुम्मन मोहम्मद (वय २२, रा. भवानीगड, महाराजगंज, जिल्हा रायबरेली, उत्तरप्रदेश) तसेच इस्तियाक जान मोहम्मद (वय … Read more