महाबळेश्वरातील हॉटेल व्यावसायिकाची फसवणूक, CID च्या अप्पर पोलीस अधीक्षकास अटक, 5 दिवस कोठडी

Crime News 20240909 081645 0000

सातारा प्रतिनिधी | महाबळेश्वर येथील हॉटेल व्यवसायिकाची मद्य विक्रीचा परवाना मिळवून देतो असे सांगून एक कोटी पाच लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभाग (पुणे) येथे नेमणुकीस असलेल्या अपर पोलीस अधीक्षकास अटक करण्यात आली आहे. त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. श्रीकांत नामदेवराव कोल्हापूरे असे अटक केलेल्या संशयीताचे नाव आहे. गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी, … Read more

सातारा MIDC मध्ये लूटमार करणाऱ्या टोळीस अटक; 2 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

Satara Crime News 20240821 093359 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात मुख्यमंत्री, गृहमंत्री असतानाच भरदिवसा एमआयडीसीत दोघांना एका टोळीतील सराईत गुंडांनी लूटमार करत मारहाण केल्याची घटना घडली होती. या मारहाण करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून पाच जणांना अटक केले आहे. संशयित युवकांची टोळी पवाराची निगडी, ता. सातारा येथील आहे. त्यांच्याकडून चोरीच्या रकमेसह २ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more

शाहूपुरी पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात चुलता-पुतण्याला ठोकल्या बेड्या, एका गुन्ह्यात चुलता 9 वर्षांपासून होता वॉन्टेड

Satara Crime News 20240819 211026 0000

सातारा प्रतिनिधी | शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा गुन्हा उघडकीस आणत गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील १,७०,००० रूपये किंमतीचे अडीच तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. अबुहसन तेजीबा ईराणी (वय ४३, रा. वॉर्ड क्रमांक ०१ निरा रेल्वे स्टेशनजवळ निरा, ता. पुरंदर, जि. पुणे) आणि रजा मास्तर ईराणी (वय ५५, … Read more

भिंतीलगत कागद जाळल्याने केली मारहाण; तिघा जणांना अटक

Crime News 20240814 091454 0000

कराड प्रतिनिधी | कागद जाळल्याच्या कारणावरून पती- पत्नीला तिघांनी मारहाण केल्याची घटना मलकापूर-आगाशिवनगर येथील इंद्रप्रस्थ कॉलनीत सोमवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्ह्यातील तिन्ही संशयितांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत प्रदीप पांडुरंग पवार (रा. चचेगाव, ता. कराड) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सर्फराज … Read more

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून 80 लाखाचा केला अपहार; 4 संशयितांना अटक

Crime News 20240803 091337 0000

सातारा प्रतिनिधी | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून जवळपास ऐंशी लाख रुपयांचा अपहार झाल्याबाबतची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी सर्व संशयित आरोपींना खंडाळा पोलिसांनी मुंबई, मनमाड, संभाजीनगर या ठिकाणाहून ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भीमसेन भालेराव, चित्रसेन भालेराव, मयूर व्यवहारे, जैन राहुल पालवे या सर्व संशयिताना न्यायालयाने पाच तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. … Read more

तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन करत घरी आलेल्या एकास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Karad News 20240723 222622 0000

कराड प्रतिनिधी | हद्दपारीचा आदेश असताना देखील पिस्तूल घेवून घरी आलेल्या एकास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले. कराड शहरातील रेठरेकर कॉलनीमध्ये पोलीस उपअधिक्षक कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी ही धडक कारवाई केली. निशिकांत निवास शिंदे (रा. रेठरेकर कॉलनी, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेकी माहिती अशी की, कराड शहरातील रेठरेकर कॉलनीतील निशिकांत शिंदे … Read more

‘त्या’ बेपत्ता तरुणाचा मारहाण करून खूनच, पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

Crime News 20240629 194052 0000

सातारा प्रतिनिधी | केळवली, ता. सातारा येथील बेपत्ता झालेल्या तरुणाचा मारहाण करुन खून केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर तपासादरम्यान पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून संबंधितांनी कोणत्या कारणातून खून केला याची माहिती पोलिस घेत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रमेश धोंडिबा जांगळे (वय २५) असे … Read more

हद्दपारीचा आदेश असतानाही ‘तो’ घरी थांबला; उंब्रज पोलिसांनी त्याला घरातच पकडला

Crime News 5 1

कराड प्रतिनिधी । दोन वर्षासाठी हद्दपारिचा आदेश असताना देखील पार्ट घरी आल्या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कराड तालुक्यातील पेरले येथील आकाश घरातून अटक केली. गणेश बाळासाहेब कांबळे (रा. पेरले, ता, कराड) असे अटक केलेल्या आआरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 24 रोजी उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांना … Read more

सर्कल, तलाठ्यावर हल्ला करून फरारी झालेला मुख्य संशयित घरी आला अन् पोलिसांच्या तावडीत सापडला

Crime News 4 1

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील नढवळ गावातील येरळा नदी पात्रात अवैध उत्खनन करणाऱ्यांवर महसूल विभागाने दि. ३० मार्च रोजी कारवाई केली होती. या कारवाईवेळी मंडलाधिकारी व तलाठ्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी चौघांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे. महेश नारायण गोडसे (रा. वडूज, ता. … Read more

‘त्यानं’ शालीने गळा आवळून ‘विजय’ची केली हत्या; अखेर पोलिसांनी शोधून काढलाच

Khatav Crime News

सातारा प्रतिनिधी । खटाव तालुक्यातील कणसेवाडी गावच्या हद्दीत डोंगराच्या जवळ एका शेतात पिंपरणीच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत एक मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. रागाच्या भरात पूर्वीच्या भांडणातून शालीने गळफास लावून हत्या केल्या प्रकरणी वडूज पोलिसांनी एकास आज अटक केली आहे. विजय महादेव डोईफोडे (वय ३४, रा. कणसेवाडी) असे मृत्यू झाल्याचे नाव असून अधिक बावा जाधव … Read more

तरुणाच्या खूनाचा गुन्हा 4 तासाच्या आत उघड; आठ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 10

सातारा प्रतिनिधी । अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरुन करंजोशीतील एका युवकाच्या शरीरावर गंभीर मारहाण करुन त्याचा खून केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे रविवारी सायंकाळी घडली होती. या घटनेनंतर पोलिसांनी घटनेचा गुन्हा चार तासांच्या आतमध्ये उघडकीस आणला आहे. या खून प्रकरणातील एका विधी संघर्षग्रस्त बालकासह आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये सहा कराड तालुक्यातील, एक … Read more

मोलकरणीचे काम मिळवून चोरी करणाऱ्या कोरेगावमधील महिलेस येरवडा पोलिसांकडून अटक

Crime News 20240612 080450 0000

सातारा प्रतिनिधी | घरात मोलकरीणचे काम मिळवून चोरी करणाऱ्या एका महिलेला येरवडा तपास पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेली महिला ही कोरेगाव तालुक्यातील आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये दि.२८/०५/२०२४ रोजी घरातील मोलकरीण हि फिर्यादी यांचे कपाटातून १३ लाख ३६ हजार ८०० रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरी करुन … Read more