ओगलेवाडीत 110 तोळ्याच्या दागिन्यांसह दीड लाखाची रोकड लुटी प्रकरणी 24 तासात 2 संशयित ताब्यात, मुद्देमाल हस्तगत

Karad Crime News

कराड प्रतिनिधी | ऐन दिवाळी सणात कराडजवळच्या ओगलेवाडी गावात बंद घर फोडून चोरट्यांनी ११० तोळे दागिन्यांसह दीड लाखांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. या धाडसी चोरीमुळे ओगलेवाडी परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी चोवीस तासाच्या आत घरफोडीचा छडा लावत दोन संशयितांना मुद्देमालासह ताब्यात घेतलं आहे. स्थानिक उद्योजकाच्या बंगल्यात चोरी ज्या बंगल्यात चोरी झाली … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, रोकड, मद्य, वाहनांसह 1 कोटी 10 लाखाचा मुद्देमाल जप्त, 45 जणांवर गुन्हा नोंद

crime News 20241103 093040 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील शिरवळ हद्दीत पोलिसांनी जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत कोट्यावधीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ४५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुगाराचा अड्डा पोलिसांनी उध्दवस्त केला. पोल्ट्री फार्मच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर पोलिसांनी छापा मारून जुगाराच्या साहित्यासह रोकड, विदेशी दारू, दुचाकी, … Read more

स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सोन्या चांदीच्या दागिण्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Satara News 29

सातारा प्रतिनिधी । सातारा पोलीस ठाण्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या वतीने नुकतीच एक धडक कारवाई करण्यात आली आहे. पथकाने आकाश अटक करीत त्याच्याकडून सोन्या चांदीच्या दागिण्यांसह पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. निलेश अंकुश काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर … Read more

जमिनीच्या वादातून काळजमधील खून; हडपसर, नवी सांगवीतील पाच संशयितांना अटक

Lonanad News 20241025 092716 0000

सातारा प्रतिनिधी | काळज (ता. फलटण) येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या नितीन तकदीर मोहिते (वय ४०, रा. काळज) यांच्या खुनाचे गूढ उकलण्यात लोणंद पोलिसांना यश आले आहे. हा प्रकार जमिनीच्या वादातून झाल्याचे समोर आले असून, पोलिसांनी याप्रकरणी कृष्णा दीपक मोहिते (रा. नवी सांगवी), यश बबन सोनवणे (वय १८, रा. हडपसर) विशाल अशोक फडके (वय २०, नवी … Read more

कराडजवळ 3 कोटींची रोकड लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, निम्मी रोकड, वाहनांसह 2 संशयित ताब्यात

Crime News 25

कराड प्रतिनिधी । पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापुरातील ढेबेवाडी फाट्यावर कारमधील तीन कोटींची रक्कम लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात कराड शहर पोलिसांना यश आलं आहे. टोळीचा म्होरक्या हा कराडमधील असून तो रेकॉर्डवरील गुंड आहे. तसेच अन्य काही संशयित कोयना काठच्या गावातील आहेत. गुन्ह्यात वापरलेली वाहने, लुटलेल्या रक्कमेतील निम्मे पैसे आणि दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात आहेत. मुख्य संशयिताच्या तपासासाठी … Read more

जळगावच्या निलेश जाधव खून प्रकरणी दोघांच्या अटकेनंतर पोलिसांकडून मुख्य संशयिताचा शोध सुरू

Crime News 20241017 074324 0000

सातारा प्रतिनिधी | जळगाव, ता. कोरेगाव येथील निलेश शंकर जाधव यांच्या खूनप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी मंगळवारी करण उर्फ भीमराव मल्हारी देवराशे, (रा. नांदगिरी) याला अटक केली. आतापर्यंत या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांनी या गुन्ह्याच्या अनुषंगिक माहिती दिली. तपासादरम्यान करण उर्फ भीमराव मल्हारी … Read more

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस पुसेगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Crime News 14

सातारा प्रतिनिधी । पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चोरी तसेच सातारा जिल्ह्यातील एकूण १४ गुन्ह्यामध्ये व १० पेक्षा अधिक एनवीडब्ल्यू व स्टँडींग वॉरंटमध्ये असलेला आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून फरारी होता. या फरार आरोपीस अटक करण्यात पुसेगांव पोलिसांना यश आले आहे. झाकीर रिकव्हल्या काळे (मूळ रा. मोळ, ता. खटाव, सध्या रा. भांडेवाडी ता. … Read more

अंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या

Patan Crime News

कराड प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाच्या वतीने जबरी चोरीतील 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडुन गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल, चाकु तसेच रोख रक्कम १ लाख ८१ हजार ४१० रुपये व चोरीस गेलेले २ मोबाईल फोन जप्त केले आहेत. सुलतान अस्लम मुजावर (वय २५, रा. सोमवार पेठ कराड), मोहम्मद … Read more

साताऱ्यातील दोघांना स्फोटक बाळगल्याप्रकरणी अटक, 4 दिवस कोठडी, स्फोटाचे नमुने पाठवले फॉरेन्सिक लॅबला

Satara Crime News 20241004 083712 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यातील माची पेठ बुधवारी दुपारी भीषण स्फोटाने हादरली होती. या स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले होते. प्राथमिक तपासात या स्फोटामागील कारण समोर आलं आहे. दरम्यान, घटनास्थळावरील नमुने नागपूरच्या फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत. साताऱ्यातील माची पेठेत बुधवारी झालेला स्फोट हा कॉम्प्रेसरचा नसून तो फटाक्यांच्या दारूमुळे झाला … Read more

शाहुपूरी ‘गुन्हे प्रकटीकरण शाखे’ची धडाकेबाज कारवाई; 3 जबरी चोरीचे गुन्हे उघड करुन 2 लाखांच्या किमतीचा मुद्देमाल हस्तगत

Crime News 12

सातारा प्रतिनिधी । शाहुपूरी पोलीस ठाण्यामध्ये तीन ठिकाणी जबरी चोरीच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. या चोरीचा तपास करण्यात शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास यश आले आहे. या पथकाने तपास करीत गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अर्थव अरुण माने (वय 19, रा. पाटखळमाथा ता.जि. सातारा), शारुख नौशाद खान (वय 30, रा.205 सोमवार पेठ सातारा), … Read more

माण तालुक्यात तृतीयपंथीयाचा खून, हातावर गोंदलेल्या नावावरून सहा तासात संशयितास अटक

Satara Crime News 20240915 082805 0000

सातारा प्रतिनिधी | माण तालुक्यातील तृतीयपंथीयाचा गळा आवळून खून करणाऱ्या संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. विहिरीत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासात गुन्याचा छडा लावला. माण तालुक्यातील तृतीयपंथीयाच्या खुनाचा गुन्हा अवघ्या सहा तासात उघडकीस आला आहे. म्हसवड पोलिसांनी मृताच्या हातावरील गोंदलेल्या नावावरून संशयिताला बेड्या ठोकल्या. राशी उर्फ राहुल अजिनाथ घुटुकडे, असं खून झालेल्या … Read more

तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास लोणंद पोलिसांनी सोलापुरातून घेतलं ताब्यात

Crime News 20240910 202015 0000

सातारा प्रतिनिधी | लोणंद पोलीसांच्या वतीने तीन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्यास सोलापुरातून ताब्यात घेण्यात आले आहे. ऋषीकेश केशव जमदाडे (रा. विठ्ठलवाडी ता. फलटण जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.०१/०६/२०२४ रोजी लोणंद पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे विठ्ठलवाडी ता. फलटण जि. सातारा येथील एक १६ वर्षे वयाच्या अल्पवयीन … Read more