पुण्यात बैठकीत अजितदादा अन् उदयनराजे एकत्र; सातारा जिल्हयातील विषयावर झाली चर्चा

Political News 20240112 104539 0000 jpg

कराड प्रतिनिधी | उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा साताऱ्याचे पालकमंत्री झाले त्यानंतर उदयनराजे-अजित पवार यांच्यातील द्वंद साताऱ्यासह सबंध राज्याने पाहिले. अलिकडच्या काही वर्षात अधूनमधून एकमेकांवर टीका-टीप्पणी आणि टोमणेबाजीही पाहायला मिळत होती. मात्र, गुरूवारी पुण्यात दोघांमधील ही जवळीक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी दोघांच्यात सातारा जिल्हयातील अनेक राजकीय विषयावर चर्चा देखील झाली. पुणे विभागाची राज्यस्तरीय … Read more

सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळणार

Satara News 20240107 140627 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यासह सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा शुल्काची रक्कम त्यांना तातडीने परत मिळणार आहे. याबाबतच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना दिल्या आहेत. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सांगली व सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ करून त्यांना भरलेली शुल्काची रक्कम … Read more

महायुतीतील जागा वाटपबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो…: चंद्रकांतदादा पाटील

Satara News 48 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सातारला शनिवारी आले होते. यावेळी त्यांनी शासकीय मेडिकल कॉलेजला भेट दिली यावेळी त्यांनी महायुतीतील जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षातील वरिष्ठ स्तरावर निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख यांच्यासह भाजपच्या पदाधिकारी … Read more

शरद पवारांनी बोलावलेल्या ‘त्या’ बैठकीबाबत वळसे पाटलांनी साताऱ्यात दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Satara News 46 jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आता फूट पडली असली तरी खासदार शरद पवारांनी बोलावलेल्या अध्यक्षपदाच्या बैठकीत नेमकं काय घडलं? आणि पवार साहेब अजितदादांना काय म्हणाले? यासह अनेक प्रश्न अजूनही जनतेत सुरु आहरेत. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडीवेळी नेमकं काय घडलं? पवार साहेबांच्या मनात काय होते? यासह बैठकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील … Read more

शालिनीताई पाटील यांनी अजितदादांना चांगलंच सुनावलं, पहा काय म्हणाल्या…

Satara News 26 jpg

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडत पुतण्या अजित पवार पवारांनी बंड केले. दुसरी राष्ट्रवादी तयार करत आमदारांना सोबत घेत भाजप आणि शिंदे गटाचा हात हातात घेतला. आता अजितदादांनी केलेल्या बंडाचा आणि पूर्वी काका खा. शरद पवार यांनी केलेल्या त्याकाळच्या बंडाची चर्चा सध्या केली जात आहे. मात्र, दोघांच्यातील बंडात नेमका … Read more

राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो, अजितदादा माझ्या प्रचाराला येणार – विजय शिवतारे

Satara News 20231213 090323 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | अजितदादा महायुतीत आल्यामुळे दुधात साखर पडली असल्याचं वक्तव्य माजी जलसंपदा मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विजय शिवतारे यांनी साताऱ्यात केलं आहे. राजकारणात वेळोवेळी अनेक घटना, घडामोडी घडत असतात. परंतु, कुणी कुणाचा कायमचा मित्र अथवा शत्रू नसतो. त्यामुळे अजितदादा पुरंदरला माझ्या प्रचारासाठी येतील, असंही शिवतारे यांनी सांगितलं. अजित पवार कुटुंबावर … Read more

सातारा लोकसभा मतदार संघात महायुतीमध्ये उमेदवारीवरून वादाची ठिणगी?

Satara News 20231210 165820 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघात आगामी लोकसभा निवडणुकीवरून अनेक घडामोडींना वेग आला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेस भवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठक घेत महायुती विरुद्ध व्यूहरचना आखली. त्यानंतर आता महायुतीतील भाजप पक्षाच्या एका नेत्याने भाजप आपला उमेदवार उभा करून सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढवणार असल्याचं सांगून टाकलं आहे. भाजप … Read more

अजितदादा-आनंदराव नानांची भेट, मग चर्चा तर होणारच!

Karad News 20231125 235928 0000 jpg

कराड प्रतिनिधी | संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्ताने कराड दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी माजी आमदार आनंदराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. काही दिवसांपूर्वीच आनंदराव नानांनी पुण्यात अजितदादांची भेट घेतली होती. नाना लवकरच अजितदादा गटात प्रवेश करणार अशी देखील चर्चा ऐकायला मिळत होती. त्यामुळे आज दादा आणि नानांच्या … Read more

लोकसभेच्या 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही, सातारा जिल्ह्यातील ‘या’ नेत्याचं नाव आघाडीवर

Satara Ajit Pawar News jpg

सातारा प्रतिनिधी । काही महिन्यांवर लोकसभेची निवडणूक येथून ठेपलेली आहे. या निवडणुकीची तयारी सध्या सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. सर्व पक्षांकडू राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. अशातच राज्यातील नऊ मतदारसंघांबाबत महायुतीतील अजित पवार गटाने आग्रह धरल्यामुळे महायुतीत जागावाटपावरून तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या राष्ट्रवादीच्या असलेल्या चार जागांसह आणखी … Read more

अजित पवार गटाच्या साताऱ्यातील ‘या’ आमदाराने घेतली शरद पवारांची भेट

Sharad Pawar

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील अजित पवार गटाच्या आमदाराने शरद पवार यांची भेट घेतली असून दोघांच्यात झालेल्या चर्चेमुळे जिल्ह्यात याची चांगलीच चर्चा सुरु आहे. सातारा जिल्ह्यातील अजित पवार गटाचे आ. मकरंद पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी गोविंद बागेत शरद पवारांची नुकतीच … Read more

प्रत्येकाला वाटतं आपण मुख्यमंत्री व्हावं तसं होता येतं का?; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

Chandrasekhar Bawankule News jpg

सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच्यावतीने जोरदार तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपातर्फे ‘मेरी माटी, मेरा देश’ या या अभियानाच्या अंतर्गत ठिकठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहेत. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सातारा व कराड दौऱ्यासाठी साताऱ्यात दाखल झाले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केल्या … Read more

धाकल्या पवारांच्या दौऱ्यात थोरल्या पवारांच्या गटातील ‘छुपे रूस्तम’ उघड होणार?

Ajit Pawar News 20230909 220807 0000 jpg

कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादीतील फुटीनंतर पहिल्यांदाच सातारा दौऱ्यावर येत असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागताची जिल्ह्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. स्वागताचे बॅनर झळकले आहेत. बॅनर्सच्या माध्यमातून अनेक राजकीय पुढाऱ्यांची भूमिका उघड झाली असून काही छुपे रुस्तम उद्या प्रत्यक्ष दौऱ्यावेळी समोर येणार आहेत. अजित पवार हे भाजप आणि शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर महाराष्ट्रात दुसरा … Read more