खरीप हंगामासाठी मुदतीत पीक कर्जाचे वितरण करा ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे बँकांना निर्देश     

Collector Jitendra Dudi 1

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यामध्ये पतपुरवठामध्ये पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट 3 हजार 600 कोटींचे असून खरीप हंगामासाठी 2 हजार 520 कोटीचे पीक वितरणाचे उद्दिष्ट आहे. यापैकी 15 जुलै अखेर 1 हजार 396 कोटी पीक कर्ज वितरीत करण्यात आले आहे. बॅकांनी विहित मुदतीत खरीप पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी … Read more

शेतकऱ्यांना दर्जेदार कृषि निविष्ठांचा पुरवठा करा; जिल्हाधिकारी डुडी यांचे निर्देश

Jitendra Dudis News

कराड प्रतिनिधी । शेतकऱ्यांची बियाणे, खते, व किटकनाशके या कृषि निविष्ठांमध्ये फसवणूक होवून त्यांचे आर्थिक नुकसान होवू नये यासाठी कृषि विभागाने काटेकोर दक्षता घ्यावी. कोणत्याही स्थितीत शेतकऱ्यांची फसवणूक सहन केली जाणार नाही. गुणवत्ता नियंत्रणामध्ये ज्या बियाणे, खते, आणि किटकनाशकांचे नमुने अप्रामणित आढळून ज्या कंपन्या कोर्ट केस पात्र ठरल्या आहेत त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करावी. कृषि निविष्ठा … Read more

बांबू लागवड अभियान यशस्वीतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करा : नंदकुमार वर्मा

Bamboo Planting Campaign Guidance Workshop

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात मनरेगा अंतर्गत बांबू लागवड अभियान सुरू करण्यात आले आहे. बांबू उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना मनरेगाचे मिशन महासंचालक नंदकुमार वर्मा यांनी दिल्या. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बांबू लागवड अभियान मार्गदर्शन कार्यशाळा नुकतीच पार पडली. यावेळी शेतकरी नेते … Read more

कराड तालुक्यात तब्बल ‘इतक्या’ हजार हेक्टरवर पेरण्या रखडल्या

Farmers

कराड प्रतिनिधी । जुलै महिना सुरु झाला तरी पावसाच्या केवळ हलक्याशा श्री कोसळत आहे. तर गेल्या दोन दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा आभाळाकडं डोळं लावून बसला आहे. सध्या ऋतुमान बदलल्यामुळे पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचे पेरण्यांचे नियोजनच कोलमडले आहे. कराड तालुक्यात पाहिल्यास आतापर्यंत केवळ दोन ते तीन टक्के क्षेत्रात पेरणी झाली असून 34 हजार हेक्टरवरील पेरण्या … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : कोयना धरणात प्रतिसेकंद 9 हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू

Koyna Dam

कराड प्रतिनिधी | राज्यातील काही भागात अद्यापही पाऊस नसल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. येथील शेतकरी पावसाची प्रतिक्षा करीत असून पेरण्या देखील खोळंबल्या आहेत. अशा परिस्थितीत पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड व पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे कोयना धरणात प्रतिसेकंद 9 हजार 129 क्युसेक पाण्याची आवक सुरू झाली आहे. समाधानकारक पावसामुळे धरणातील … Read more

…तर शिंदे – फडणवीस सरकारने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करावे !

Rayat Kranti Sanganthan

कराड प्रतिनिधी | पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ऊसासारखी पिके वाळून निघाली आहेत. अधिकाऱ्यांनी वाळलेल्या पिकांचे पंचनामे करावे. जर 8 दिवसात पाऊस नाही पडला तर शिंदे – फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना एकरी 50 हजार नुकसान भरपाई द्यावी तसेच पीक कर्ज देखील माफ करावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष अशोक लोहार यांनी … Read more

CM एकनाथ शिंदे सपत्नीक रमले शेत शिवारात

cm eknath shinde

कराड प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस झाले सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळ गावी आले आहेत. गावी आल्यानंतर त्यांनी काल दिवसभरात अनेक कामे करत अनेक ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांनी आपल्या शेतात पत्नीसह केळीची लागवड केली. यावेळी त्यांच्या उपस्थितीत ५ हजार केळींच्या झाडांची लागवड करण्यात आली. तसेच नारळाच्या झाडांची देखील त्यांनी लागवड … Read more

गहू, तूर व उडीद अतिरिक्त साठा करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करणार : जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने

Vaishali Rajmane agriculture (1)

कराड प्रतिनिधी | केंद्र शासनाच्या अधिसुचनेनुसार गव्हाच्या साठ्यावरील निर्बंध 31 मार्च 2024 पर्यंत तर तूर व उडीद डाळींच्या अतिरिक्त साठ्यावरील निर्बंध 30 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू केले आहेत. या अधिसुचनेपासून व्यापाऱ्यांना 30 दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या साठ्याच्या मर्यादेपर्यंत गव्हाचा साठा कमी करणे आवश्यक राहील. मात्र, साठेबाजी केल्यास अशा साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, … Read more

आता गाई-म्हैशींच्या खरेदीवर मिळणार तब्बल 50 टक्के अनुदान !

50 percent subsidy cows and buffaloes News

सातारा प्रतिनिधी । ग्रामीण भागातील शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा जोडव्यवसाय करतो. या माध्यमातून त्याचा थोडाफार आर्थिक खर्चही भागतो. अशा पशुपालक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या पशु संवर्धन विभागाच्यावतीने अनेक खास योजना आणल्या जातात. अशीच एक राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात अमलात आणली जाणार आहे ती म्हणजे शेतकऱ्यांना गाई आणि म्हैशी यांच्या खरेदी करायची असेल … Read more