बांधासह जमिनीवर उगवणार बांबू!; पावसाळ्यात जिल्ह्यात बांबू लागवडीला सुरुवात

Bamboo News 20240519 181057 0000

सातारा प्रतिनिधी | जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर बांबू लागवड योजना राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना हेक्टरी ६ लाख ९० हजारांचे अनुदान मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल वाढत असून, कृषी आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत पावसाळ्यात शेतीच्या बांधावर आणि जमिनीवरही ९५२ हेक्टरमध्ये ५ लाख ८५ हजार रोपे लावण्यात येणार आहेत. राज्य शासनाने गेल्या वर्षीपासून बांबू लागवडीसाठी नवीन योजना आणली … Read more

सह्याद्री कारखान्याची सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस, शेतकरी संघटनेचे साताऱ्यात आंदोलन

Satara News 20240201 060428 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस पाठवली आहे. या नोटीसीनंतर शेतकरी संघटना व शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. या नोटीसीचा निषेध रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने केला आहे. त्याचबरोबर ही नोटीस रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनही सुरू केले आहे. याबाबत शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. … Read more

कराडनजीक गोळेश्वर परिसरात आगीत 100 एकर ऊस जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान

Crime News 27 jpg

कराड प्रतिनिधी | कराड शहरानजीक असलेल्या गोळेश्वर परिसरातील कैकाडा शिवारात काही शेतकऱ्यांनी ऊसाचा खोडवा पेटवला. यामुळे खोडव्याची आग परिसरात पसरून यामध्ये सुमारे 100 पेक्षा जास्त एकर ऊसाचे क्षेत्र जळाल्याची घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये सुमारे ७० हून अधिक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरानजीक गोळेश्वर परिसरातील कैकाडा … Read more

सातारा जिल्ह्यात रब्बीची ‘इतक्या’ टक्के झाली पेरणी

Rabi Season Agriculture News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने शेतकऱ्यांना जास्त उत्पादन घेता आले नाही. या पर्जन्यमानाच्या कमतरतेचा परिणाम रब्बी हंगामातील पेरणीवरही झाल्याचे पहायला मिळाले. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ६० टक्के म्हणजे सव्वा लाख हेक्टर इतक्या क्षेत्रात पेरणी झालेली असून गतवर्षी नोव्हेंबरअखेर ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. सातारा जिल्ह्यात खरीप आणि रब्बी असे दोन … Read more

Satara News : साताऱ्यात मान्सून ‘इतक्या’ टक्केच बरसला, दुष्काळ बनला गंभीर

Satara News 20231121 150327 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याला यंदा वरूणराजाची कृपादृष्टी झाली नसल्याने त्याचा पिकांना चांगलाच फटका बसला. विशेष म्हणजे पावसाळ्याच्या ४ महिन्यात अवघा ६५ टक्के पाऊस सातारा जिल्ह्यात बरसला असून त्यामुळे यंदा तब्बल ३०६ मिलीमीटर पावसाची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळी भागात पाझर तलाव, ओढे कोरडे पडले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन सुरू असून शेतकरी हवालदिल … Read more

साताऱ्यातील शेतकऱ्यांची दिवाळी झाली गोड ; विमा कंपन्यांकडून 2.5 कोटी जमा

Farmers News jpg

सातारा प्रतिनिधी | राज्यात खरीपामध्ये पाऊस लांबल्याने महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्यांच्या या नुकसानीपोटी २५ टक्के अग्रीम रक्कम देण्याबाबत शासनपातळीवर बैठका देखील पार पडल्या. मात्र, विमा कंपन्यांकडून कारणे सांगून टाळाटाळ केली जात होती. अखेर सातारा जिल्हा प्रशासनाच्या ठाम भूमिकेमुळे विमा कंपन्यांना ६३ मंडलातील शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम द्यावी लागत आहे. त्यामुळे दिवाळीतच शेतकऱ्यांच्या … Read more

तालुकास्तरीय कार्यशाळांच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

Satara Jitendra Doody News jpg

सातारा प्रतिनिधी । डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योनजेच्या तालुकास्तरावर कार्यशाळा घेऊन यामध्ये सरपंच, गटामध्ये सहभागी होणारे शेतकरी, कृषि सहायक, कृषि पदविधारक यांना आमंत्रित करुन जास्तीत जास्त क्षेत्र सेंद्रीय शेतीमध्ये रुपांतरीत करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेद्र डुडी यांनी केल्या. डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आढावा सभा जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच … Read more

पावसाच्या हजेरीनंतरही सातारा जिल्ह्यात अद्याप ‘इतक्या’ गावात ‘पाणीटंचाई’

Water Shortage Satara District News jpg

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. उन्हाळ्यातही वळीव बरसला नाही. त्यानंतर मान्सूनचा पाऊसही चांगला झाला नाही. मात्र, आता जिल्ह्यातील काही भागात परतीचा चांगला पाऊस झाल्याने टंचाईची स्थिती कमी झाली आहे. त्यामुळे टॅंकरची संख्या 102 वरुन आता 96 पर्यंत कमी झाली आहे. तरीही सध्या 86 गावे आणि 404 वाड्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा … Read more

सातारा जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; कोयना धरणाचा ‘इतका’ झाला पाणीसाठा

Koyna Dam 1

कराड प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात सध्या परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असून पश्चिम भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमानाची महाबळेश्वरला 64 मिलीमीटरची झाली आहे. तर नवजालाही चांगला पाऊस झाला. कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठा 93 टीएमसीवर गेला आहे. … Read more

तुर्कीतून बाजरीचे बियाणे आणून काढले 3 फुट लांबीचे कणीस…; ‘माण’च्या शेतकऱ्यानं करून दाखवलं!

Agriculture News jpg

सातारा प्रतिनिधी । पावसाअभावी पिकांना पाणी देणंही मुश्किलीचे बनले असल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. मात्र, दुसरीकडे कायम पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील एका शेतकऱ्याने कमाल करून दाखवली आहे. माण तालुक्यातील पळशी येथील शेतकरी बबन ढोले यांनी तुर्कीतून बाजरीचे बियाणाची आणून त्याची लागवड केली असून या पिकाला ३ फुटांपर्यत कणसे लागली आहेत. माण तालुका … Read more

सातारा जिल्हा परिषदेत शेतकऱ्यांच्या हिताच्या ‘या’ दोन योजनांना मिळाली मंजुरी

Satara ZP News 20230914 173000 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | जिल्हा परिषद सेस अंतर्गत जिल्हयातील शेतऱ्यांसाठी कृषि विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना थेट लाभ हस्तांतरण पध्दतीने राबविण्यात येत आहेत. दरम्यान, जनावरांच्या चाऱ्याचा कार्यक्षम वापरासाठी शेतकऱ्यांना मुरघास साठवणूकीसाठी सायलेज बॅग तसेच कडबाकुटी यंत्र या दोन योजनांना प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली आहे. राज्य शासनाच्या … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘हे’ गाव बनलय राज्‍यातील पहिले फळांचे गाव

Dhumalwadi Village News 20230904 091233 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मधाचे गाव, पुस्तकाचे गाव अशी गावे आपण पाहिली आणि एकली असतील. मात्र, जिल्ह्यात आता असे गाव तयार झाले आहे की त्या ठिकाणी फळांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जातेय. गावातच फळाचे उत्पादन, गावातच त्यावर प्रक्रिया केली जात आहे. ते गाव म्हणजे फलटण तालुक्यातील धुमाळवाडी हे होय. या ठिकाणी विविध १९ प्रकारची … Read more