कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचा महत्वाचा निर्णय; फक्त एक वेळच होणार लिलाव

Karad News 33

कराड प्रतिनिधी । कराडसह परिसरातील तालुक्यांमधून मोठ्या संख्येने शेतकरी आपला शेतीचा भाजीपाल्यासह इतर माल विक्रीसाठी कराड येथील स्वा. सै.शामराव पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये घेऊन येतात. या ठिकाणी मालाच्या लिलावाच्या वेळेबाबत शेतकऱ्यांकडून वेळोवेळी होत असलेल्या मागणीनुसार एक वेळ व खुली लिलाव पद्धत सुरू करण्याचा शुभारंभ आज शुक्रवारी करण्यात आला. शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश … Read more

फळबाग लागवड शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : जिल्हा कृषी अधीक्षकांनी केलं ‘या’ योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Farmar News

सातारा प्रतिनिधी । राज्याचे माजी कृषीमंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर (Bhausaheb Fundkar) यांच्या नावाने फलोत्पादन विभागाकडून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु करण्यात आली आहे. राज्य पुरस्कृत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सन २०२४ – २५ कालावधी सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत असून या योजनेतून शासनाच्या अनुदानाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी … Read more

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी; ‘या’ 2 योजनांच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Satara News 26

सातारा प्रतिनिधी । नियंत्रित वातावरणातील शेती, सुक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर तसेच अनेक फळपिके आणि भाजीपाला पिकांची लागवड करणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्ग, अनु. जाती व अनु. जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासन कृषी विभागामार्फत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजना राबविली जात आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन … Read more

ऊस लागणीसाठी धांदल; यंदा 86032 या प्रजातीच्या वाणाला पसंती

Agriculture News 20240605 090009 0000

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकून घेतली आहेत. सध्या तालुक्यात अनेक ठिकाणी ऊस लागणीसाठी लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकरी ८६०३२ या प्रजातीच्या उसाच्या वाणाला जास्तीत जास्त पसंती देत असल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने नगदी पीक असलेल्या उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात … Read more

एकंबे परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाणार!

Water News 20240520 084117 0000

सातारा प्रतिनिधी | पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतीनिष्ठ गाव म्हणून एकंबे गावची ओळख आहे. या नावलौकिक असलेल्या एकंबे परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभाग निश्चितपणे प्रयत्न करेल. त्यातून परिसर पाणीदार होऊन जलक्रांती घडवली जाईल, असा विश्वास सीएसआर विभाग प्रमुख डॉ. लीना देशपांडे यांनी व्यक्त केला. भारत फोर्ज लिमिटेड सीएसआर विभागामार्फत एकंबे येथे डोंगर पायथ्याला … Read more

पाणी प्रश्न पेटला… जिल्ह्यात ‘या’ ठिकाणी पाण्यासाठी चक्क वाघ्या मुरळीद्वारे जागरण

Vaduj News jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दुष्काळ भाग म्हणून ओळख असलेल्या खटाव तालुक्यात पाणी प्रशन चांगलाच पेटला आहे. खटाव तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी खटाव तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने येथील तहसीलदार कार्यालयासमोर प्रशासनाच्या दारात जागरण, गोंधळ घालण्यात आला. यावेळी वाघ्या मुरळीद्वारे ‘पाण्यासाठी नाचते मी पर्वा कुणाची..’ चे सादरीकरण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खटाव तालुक्यात सध्या पिण्यासह … Read more

उंडाळेतील बहूउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीचा सारंग बाबांच्या हस्ते उद्घाटन

Karad News 35 jpg

कराड प्रतिनिधी । शेतकऱ्यांना पिकाची उत्पादकता व उत्पादन वाढीसाठी कृषिविषयक अद्ययावत माहिती मिळणे गरजेचे आहे. उंडाळे येथील बहूउद्देशीय कृषि प्रशिक्षण केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येईल. असा विश्वास व्यक्त करून माजी मंत्री स्व.विलासराव पाटील यांनी कायम लोकहितासाठी कार्य केले, असे प्रतिपादन ‘राष्ट्रवादी’च्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केला. उंडाळे, ता. कराड येथे … Read more

मराठवाडी धरणातून वांग नदीपात्रात पाण्याचा सुरु झाला विसर्ग

Marathwadi Dam News 1 jpg

पाटण प्रतिनिधी । गेल्या अनेक दिवसांपासून मराठवाडी धरणाच्या लाभक्षेत्रात शेतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती. मात्र, त्याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त केली जात होती. आता पाटबंधारे विभागाकडून शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाकडे लक्ष देत बुधवारपासून धरणाच्या सिंचनद्वारातून वांग नदीपात्रात तातडीने विसर्ग सुरू करण्यात आला. नदीपात्रात पाणी येऊ लागल्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा … Read more

सातारा जिल्ह्यात ‘इतके’ हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना पडून, ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट

Satara News 91 jpg

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही दुष्काळाचा फटका बसलेला आहे. कारण म्हणजे गेल्यावर्षी पर्जन्यमान कमी झाले आहे. त्याचा परिणाम आता रब्बी पेरणीवर झाला आहे. जिल्ह्यात फक्त 81 टक्के पेरणी झालेली असून सुमारे 40 हजार हेक्टर क्षेत्र पेरणीविना राहिलेले आहे. विशेष म्हणजे ज्वारीसह गव्हाच्या क्षेत्रात मोठी घट झालेली आहे. सातारा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यास दोन … Read more

मातीचा गंध आणि सुगंध शेतीकडे खेचून आणतो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Satara News 77 jpg

सातारा प्रतिनिधी । मातीचा गंध आणि सुगंध आपल्याला शेतीकडे, आपल्या जन्मभूमीकडे खेचून आणतो. जेंव्हा मी माझ्या जन्मभूमीत येतो तेंव्हा माझे पाय आपोआप शेतीकडे वळतात, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांसाठी महाबळेश्वर तालुक्यातील आपल्या दरे गावच्या यात्रेला आले आहेत. आज त्यांनी बराच वेळ आपल्या शेतात घालवला. त्यांनी शेतात … Read more

जिल्ह्यातील ‘या’ गावातील शेतकऱ्यांच्या लालचुटूक स्ट्रॉबेरीचे नुकसान; नेमकं कारण काय?

Satara News 75 jpg

सातारा प्रतिनिधी । शेतकरी काबाडकष्ट करून पीक पिकवतो. नंतर ते बाजारात घेऊन त्याची विक्री करतो. मात्र, त्याच्या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर तो खचून जातो. मग कष्टानं पिकवलेला पीक तो डोळ्यादेखत नष्ट करतो.अशी वेळ जावळी तालुक्यात प्रामुख्याने कुडाळ, आखाडे सोमर्डी, महू, शिंदेवाडी आदी गावांतील शेतकऱ्यावर आली आहे. स्ट्रॉबेरीचा हंगाम संपण्यास अजून दोन महिने कालावधी … Read more

सातारा जिल्ह्यात कारखान्यांनी ऊस गाळपात गाठला उच्चांक

Satara News 20240121 135444 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात १६ सहकारी साखर कारखाने आहेत. त्यांच्याकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात ऊसाचे गाळप काढले जाते. दरम्यान, यंदाच्या वर्षी या साखर कारखान्यांकडून आतापर्यंत ५५ लाख ४ हजार ९८० टन ऊस गाळप करून ५२ लाख ६९ हजार २८५ क्विंटल साखर उत्पादन घेण्यात आले आहे. सध्या सरासरी ९.७५ टक्के उतारा मिळत आहे. यामध्ये सहकारी कारखान्यांनी … Read more