मेढा-महाबळेश्वर मार्गावर कार-दुचाकीचा भीषण अपघात, एक तरूण जागीच ठार, एक गंभीर

Accideant News 20240629 071355 0000

सातारा प्रतिनिधी | मेढा-महाबळेश्वर मार्गावर आंबेघर तर्फ मेढा गावच्या हद्दीत भरधाव कारने दुचाकीला समोरून भीषण धडक दिली. या अपघातात (वरोशी ता. जावली) गावातील एक तरूण जागीच ठार झाला तर एक गंभीररित्या जखमी झाला आहे. प्रवीण कोडीबा कासुर्डे, असं मृत तरूणाचं तर सिद्धार्थ संतोष कदम, या तरूणाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू … Read more

साताऱ्याच्या भरतगाव नजीक पुणे – बंगळूर महामार्गावर मालट्रक पलटी

Accident News 1

सातारा प्रतिनिधी । पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील भरतगाव हद्दीत कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर मालट्रक पलटी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने या ठिकाणी काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड ते सातारा या लेनवर गुरुवारी एक ट्रक पलटी क्रमांक (KA 63 A … Read more

महाबळेश्वरात दाट धुक्याचा अंदाज न आल्याने कार दरीत कोसळली! सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

Accideant News

सातारा प्रतिनिधी । गेल्या काही दिवसापासून महाबळेश्वर पाचगणीमध्ये पावसाची रिमझिम सुरु आहे. पावसामुळे या दोन्ही पर्यटनस्थळांना मोठ्या संख्येने पर्यटक भेटी देण्यासाठी येत आहे. दरम्यान, महाबळेश्वर आणि पाचगणीकडे जाणाऱ्या घाटमार्गावर साचत असलेल्या दाट धुक्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना अडचणी येत आहे. या दरम्यान, महाबळेश्वर तापोळा रोडवरील भारत हॉटेल जवळ दाट धुक्याचा अंदाज न आल्याने एक कार थेट … Read more

कराडच्या मार्केटयार्ड रस्त्यावर ट्रकखाली सापडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Karad News 10

कराड प्रतिनिधी । कराड-तासगाव मार्गावर कार्वे नाका हद्दीत एका मालट्रकखाली सापडून दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 3.15 वाजण्याच्या सुमारास घडली. शशिकांत प्रकाश माळी ( वय 55, रा. काले, ता. कराड असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. अपघातात ठार झालेले शशिकांत माळी हे आत्माराम विद्यालय, ओगलेवाडी येथे शिक्षक होते. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, … Read more

पहाटे 5 च्या सुमारास आयशर कंटेनरला अचानक आग लागली; लाखो रुपयांचे नुकसान

Crime News 20240603 073445 0000 1

सातारा प्रतिनिधी | खटाव तालुक्यातील चोराडे येथील नांगरे वस्तीनजीक रविवारी पहाटे 5 च्या सुमारास आयशर कंटेनरला (एमएच-11-डीडी-6871) अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही. मात्र, कंटेनरचे 22 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेत चालक सूर्यकांत सदाशिव यादव हे जखमी झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पॅकिंगचे साहित्य भरलेला कंटेनर … Read more

साताऱ्यात भरधाव डंपरची मोटरसायकलला भीषण धडक, पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी

Accident News

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यात डंपर आणि मोटरसायकलच्या भीषण अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारी लिंब खिंडीजवळ घडली. रामचंद्र रघुनाथ उर्फ बाबू खादगे (वय ५०, रा. लिंब, ता. सातारा), असे मृताचे नाव आहे. त्यांच्या पत्नी कल्पना रामचंद्र खादगे या गंभीर जखमी आहेत. लिंबवरून साताऱ्याला येत असताना सेवा रस्त्यावर समोरून भरधाव … Read more

वडिलांना औषध आणण्यासाठी ‘त्या’ दोघी बहिणी भावासोबत गेल्या अन् अज्ञात वाहनाची बसली धडक; पुढं घडलं असं काही…

Accident News

सातारा प्रतिनिधी । आपल्या वडिलांसाठी औषध आणण्यासाठी दोघी सख्ख्या बहिणी भावासोबत अॅक्टिव्हा दुचाकीवरुन गेल्या असता त्यांना अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिली. या अपघातात सख्य्या बहिणींचा मृत्यू झाला असून भाऊ जखमी झाल्याची घटना पुणे-नाशिक महामार्गावर आळते फाटा येथे शनिवारी सकाळी घडली. या अपघातात जखमी झालेल्या अर्चना तानाजी कोठावळे (वय २८ रा. धावडशी), अमृता तानाजी कोठावळे (वय … Read more

पिकअप दुचाकीच्या धडकेत सातारा शहर ठाण्यातील पोलिसाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल

Satara News 4 1

सातारा प्रतिनिधी । सातारा शहराजवळ पिकअपने दुचाकीला दिलेल्या जोरात धडकेत सातारा शहर ठाण्यात कार्यरत असणारे हवालदार संदीप साहेबराव कणसे यांचा म्रुत्यु झाला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलीस हवालदार कणसे हे अंगापूर वंदन येथील रहिवाशी होते. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप कणसे (वय ४७, रा. अंगापूर वंदन) हे … Read more

गोटे हद्दीत महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव एसटीची धडक: अपघातात पादचाऱ्याचा मृत्यू

Crime News 5

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत दुभाजकाच्या झाडीतून घाईगडबडीत महामार्ग ओलांडताना भरधाव एसटीची धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना नुकतीच घडली. सोमवारी दुपारी पावनेतीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. बंटीराज बल्लाळ (रा. तांबवे, ता. वाळवा) असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे. अपघातस्थळ व पोलिसांकडून … Read more

निवडणूक बंदोबस्तावरील पोलिसांना घेऊन जाणाऱ्या बसला कराडनजीक भीषण अपघात, 12 किरकोळ तर 3 पोलीस गंभीर जखमी

Karad News 20240508 163213 0000

कराड प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपवून परत जाताना पोलिसांच्या खासगी ट्रॅव्हल्सला गुहागर-विजापूर महामार्गावर कराडनजीक भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकने हुलकावणी दिल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याकडेच्या पडक्या घराला धडकली. या अपघातात बसमध्ये पुढे बसलेले तीन पोलीस गंभीर तर अन्य १२ पोलीस किरकोळ जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना कराडमधील सहयाद्रि हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सर्व … Read more

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’चा थरार;18 चाकी कंटेनरची ट्रॅक्टर- ट्रॉली; कार,पिकअपला धडक

Crime News 20240427 145158 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | कोळकीकडून फलटण शहराकडे येणाऱ्या १८ चाकी कंटेनर चालकाने मद्यधुंद अवस्थेत कंटेनरने ट्रॅक्टर-ट्रॉली, कार, पिकअप गाड्यांना धडक देत फलटण येथील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्याचे संरक्षण कठडे तोडले. कंटेनर अगदी पुतळ्याजवळ जाऊन थांबल्याने अनेकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. फलटण शहरातील मध्यवर्ती क्रांतिसिंह नाना पाटील चौकात हा प्रकार घडल्याने दुपारी भर उन्हात अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. … Read more

गिरेवाडीतील अपघातात एकजण जागीच ठार

Accident News 20240425 061808 0000 jpg

पाटण प्रतिनिधी | मल्हारपेठ आठवडा बाजारास येताना चार वाजण्याच्या सुमारास गिरेवाडी (ता.पाटण) जवळ रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या चरीत गाडी घसरून ट्रॅक्टरखाली गेल्याने दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला. दिपक शंकर काटकर (वय ५५, रा. बेलदरे ता. कराड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बेलदरे गावाहून मल्हारपेठ बाजारास येताना गिरेवाडी गावाजवळ चौपदरी रस्त्याच्या मध्यमागी … Read more