भाजप आमदार जयकुमार गोरेंच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीस्वारांना उडवले; 2 युवक ठार

Accident News 20240824 171501 0000

सातारा प्रतिनिधी | भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव वाहनाने दुचाकीला उडवल्याने दोनजण ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. भाजप आमदार गोरे जनसंवाद दौऱ्यासाठी बोराटवाडी येथील आपल्या निवासस्थानातून बाहेर पडले. ही सर्व वाहने भरधाव वेगात निघाली असताना बिदाल व दहिवडी दरम्यान असलेल्या शेरेवाडी दरम्यान भीषण अपघात झाला. अनिकेत नितीन मगर (वय : २६ वर्षे) … Read more

रक्षाबंधनासाठी सातारला येत असताना दुचाकीची एसटीला धडक, अपघातात युवकाचा मृत्यू

Accident News 20240819 073428 0000

सातारा प्रतिनिधी | रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून सातारला येत असलेल्या युवकावर शनिवारी रात्री मेढा येथे काळाने घाला घातला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथून महाबळेश्वरमार्गे सातारला येत असताना मेढा बसस्थानकाजवळ अचानक आडव्या आलेल्या एसटीला दुचाकीने धडक दिली. या अपघातात आदित्य संजय साळुंखे (वय २३, रा. सिद्धिविनायक रेसिडेन्सी, बसाप्पा पेठ, करंजे, सातारा), या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आदित्य हा रत्नागिरी … Read more

ट्रक-आशयर टेम्पोची समोरासमोर धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर

1 20240812 081224 0000

सातारा प्रतिनिधी | भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने आयशर टेम्पोला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यात दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात आज सोमवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव तालुक्यातील अंबवडे संमत वाघोली येथे हा अपघात झाला. भरधाव कंटेनगर समोरून येणाऱ्या … Read more

टेम्पो मागे घेताना झालेल्या अपघातात 3 वर्षाची चिमुकली ठार

Karad News 14

कराड प्रतिनिधी । टेम्पो पाठीमागे घेताना टेम्पोखाली सापडून अवघ्या तीन वर्षांची चिमुकली जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कराडच्या कार्वे नाका येथे घडली. स्वरा नितीन शिंदे (वय ३) असे ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात टेम्पोचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेची रात्री उशिरापर्यंत पोलीस … Read more

इर्टिगाची दुचाकीला जोरदार धडक; अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी

Car Accident News

सातारा प्रतिनिधी । सातारा ते परळी रस्त्यावर इर्टिगा कारच्या शिक्षिका महिला चालकने भरधाव वेगात येवून दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अविनाश विकास चव्हाण (वय ३०), अश्विनी चव्हाण (वय २७, दोघे रा. अंबवडे खुर्द ता. सातारा) अशी त्यांची नावे आहेत. त्याना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याबाबत … Read more

हिंगनोळेत एसटी बसचा अपघात; 12 विद्यार्थी झाले जखमी

ST Bus News

कराड प्रतिनिधी | एसटी बसचा स्टेरिंग रॉड तुटल्याने चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर बस रस्त्यालगत असणाऱ्या नाल्यात आदळून अपघात झाल्याची घटना चोरे ते उंब्रज मार्गावर हिंगनोळे ता. कराड गावच्या हद्दीत बुधवारी घडली. या अपघातात तब्बल १२ विद्यार्थी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड – चोरजवाडी ही एसटी बस … Read more

लोणंद-शिरवळ मार्गावर भरधाव कारने दुचाकीस्वाराला चिरडलं, युवकाचा जागीच मृत्यू

Crime News 20240722 091544 0000

सातारा प्रतिनिधी | लोणंद-शिरवळ रोडवरील गोळेगाव फाट्याजवळ भरधाव कार चालकाने चिरडल्याने गंभीर जखमी होऊन दुचाकीस्वार दत्तात्रय कराडे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, लोणंद एमआयडीसी जवळील गोळेगाव फाट्याजवळ दत्तात्रय गोपाळ कराडे (वय २७, रा. कराडवाडी ता. खंडाळा) हा आपल्या दूचाकीवरून (एमएच ११ डी. के. ३७०) लोणंदच्या दिशेने जात असताना भरधाव … Read more

सातारा-कराड मार्गावर बँजो पार्टीच्या टेम्पोला आयशरची भीषण धडक; अपघातात सहाजण जखमी

Karad News 37

कराड प्रतिनिधी । सातारा ते कराड मार्गावर गोटे गावच्या हद्दीत रस्त्याकडेला उभ्या असलेल्या बँजो पार्टीच्या टेम्पोला आयशर गाडीने पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, या धडकेत बॅन्जो पार्टीचा टेम्पो रस्त्याकडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाला. या अपघातात टेम्पोतील पाचजण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती … Read more

सातारा-महाबळेश्वर मार्गावरील वेण्णा नदीच्या पुलावरून 40 फूट खोल कार कोसळली; चार जण जखमी

Car Accident News

सातारा प्रतिनिधी । सातारा – महाबळेश्वर रस्त्यावरील वेण्णा नदीच्या पुलावरून कार चाळीस फूट खोल कोसळून चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातातील जखमींना सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जावळी तालुक्यातील करहरमधील एक कुटुंबीय महाबळेश्वरहून साताऱ्याकडे येत होते. त्यावेळी जावळी … Read more

पुणे-बंगळुरू महामार्गावर मलकापूरच्या हद्दीत कार मालट्रक अपघातात एकजण ठार

Accident News

कराड प्रतिनिधी | पुणे-बंगळुरू महामार्गाकडेला उभ्या मालट्रकला भरधाव कारची पाठीमागून धडक होऊन झालेल्या अपघातात कार ट्रकखाली घुसली. या अपघातात कारमधील एकजण जागीच ठार तर एकजण जखमी झाल्याची घटना पुणे- बंगळुरू महामार्गावर मलकापूर हद्दीत बुधवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर कराड -कोल्हापूर लेनवरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. विष्णू दत्तू सुतार (वय ५५, रा. पिंपळगाव … Read more

केंजळेतील सैन्य दलातील जवानाचा अपघाती मृत्यू

Accident news 20240701 111507 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा- मेढा रस्त्यावर हामदाबाज येथे भरधाव कारने दुचाकीला धडकदिल्यानंतर झालेल्या अपघातात सैन्य दलातील जवान विशाल दत्तात्रय केंजळे (वय ३२, रा. मु. केंजळ पो. मोरावळे, ता. जावली) यांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांचा भाचा व भाची जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दि. २८ जून रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली … Read more

पुणे-बंगळूर महामार्गावर मलकापूर नजिक अपघात महिलेचा जागीच मृत्यू; एकजण गंभीर जखमी

Karad News 20240629 170107 0000

कराड प्रतिनिधी | पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर हद्दीत रस्त्यावर दुचाकी घसरून खाली पडलेल्या महिलेला 10 चाकी कंटेनर खाली सापडून जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली. अर्चना राजाराम पाटील (रा. कुसुर, ता. पाटण) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून अक्षय उत्तम पाटील असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. … Read more