पाचगणी पोलिसांची धडक कारवाई; 2 गुन्हे उघडकीस करून 51 लाखांचा माल हस्तगत

Crime News 20240919 201603 0000

सातारा प्रतिनिधी | पाचगणी पोलीसांनी २४ तासाच्या आत गुन्हा उघड़कीस आणुन हिरेजडीत सोन्याच्या अंगठया हस्तगत केल्या आहेत. तसेच मोटर सायकल चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणुन २ मोटर सायकली केल्या हस्तगत करून एकुण ३५ गहाळ मोबाईलचा शोध लावुन ५१ लाख रुपयांचा माल हस्तगत केला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दि.१०.०९.२०२४ रोजी सायं ७.३० वा.चे … Read more

साताऱ्यात फसवणूक केल्या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकास अटक

Crime News 20240902 094551 0000

सातारा प्रतिनिधी | अलीकडे फसवणूक करण्याच्या घटना चांगल्याच वाढलेल्या आहेत. दरम्यान, इमारत बांधून त्यामध्ये दोन फ्लॅट देतो, असे सांगून सुमारे 3० लाख रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी एका बांधकाम व्यवसायिकावर सातारा शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अमर सतीश देशमुख (रा. सदरबझार, सातारा) असे व्यावसायिकाचे नाव आहे. … Read more

गुप्तधनाचे आमिष दाखवत घरात 4 फूट खड्डा खणून केली अघोरी पूजा; 6 जणांना अटक

Crime News 20240704 111335 0000

कराड प्रतिनिधी | गुप्तधनाच्या आमिषापोटी घरात चार फूट खड्डा खणून अघोरी पूजा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार राधानगरी तालुक्यातील कौलव येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री सहा जणांना अटक केली आहे. या गुन्ह्यात अटक केल्या आरोपींमध्ये कराड आणि पाटण तालुक्यातील लोकांचा समावेश आहे. कौलव गावचे सरपंच रामचंद्र कुंभार यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड … Read more

तडीपारीचे उल्लंघन करणाऱ्या विरवडेतील गुंडास पाठलाग करून पकडले, कराड पोलिसांची धडक कारवाई

Crime News 20240629 210515 0000

कराड प्रतिनिधी | सातारा जिल्हयासह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा आणि शिराळा तालुक्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले असतानाही गावात येवून राहणाऱ्या गुंडाला कराड शहर पोलिसांच्या पथकाने पाठलाग करून पकडले. अक्षय आनंदा नाटकर (रा. विरवडे, ता. कराड), असे संशयिताचे नाव असून त्यास अटक करण्यात आली आहे. सतारा जिल्ह्यातील तडीपार गुंडांची माहिती काढून आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे … Read more

शेअर मार्केटमधून नफ्याचे आमिष दाखवून दोघांनी एकास 3 लाखांचा घातला गंडा

Crime News 20240610 081137 0000

पाटण प्रतिनिधी | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीदन अधिक नफ्याने आमिष दाखवून एकास तीन लाखाला गंडा घातल्या प्रकरणी तेलेनाडी नाडे, ता. पाटण येथील एका महिलेला मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. संशयित किशोर शिवलिंग माळी व प्रतीक्षा शिवलिंग माळी (दोघेही रा.तेलेवाडी, नाडे, ता.पाटण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रतीक्षा माळी हिला पोलिसांनी रविवारी अटक केली. मल्हारपेठ पोलिसांनी … Read more

अज्ञात महिलेच्या खुनाचा गुन्हा चोवीस तासांत उघड; नगर, इंदापूरच्या दोघांना अटक

Satara News 20240608 095526 0000

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव तालुक्यातील धोम डावा कॅनॉलमध्ये हात बांधलेला आणि सडलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळून आला होता. कोणताही धागादोरा नसताना सातारा पोलिसांनी कौशल्याने तपास करत या खून प्रकरणाचा छडा लावला आहे. कानातील दागिन्याच्या हॉलमार्क वरून महिलेची ओळख पटवत पोलिसांनी दोघांना गजाआड केलं आहे. खून झालेली महिला मुंढेकरवाडी (ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) येथील आहे. सोबत … Read more

दरोडा टाकण्याच्या तयारीत होते तिघेजण इतक्यात पोलिसांना लागली खबर; पुढं घडलं असं काही…

Satara Crime News 20240531 233245 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या तिघा तरुणांना शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. संबंधितांकडून धारदार हत्यार, एअर पिस्टल, मोबाइल, चोरीची दुचाकी आदी मिळून सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, तर या टोळीकडून 4 गुन्हे उघडकीस आले आहेत. निखिल राजू बडेकर (वय १९, रा. अमरलक्ष्मी शेडगेवस्ती, सातारा), ऋषिकेश शशिकांत पवार (वय १९, … Read more

जाहीर नोटीस काढण्यासाठी धर्मादाय कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने घेतली 1 हजाराची लाच

Satara News 20240514 075741 0000

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने सोमवारी सायंकाळी एक कारवाई करण्यात आली. चाैकशीची जाहीर नोटीस काढण्यासाठी एक हजाराची लाच घेताना सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्रीकृष्ण दामोदर पाथरे (वय ५६, सध्या रा. यादोगोपाळ पेठ, सातारा. मूळ रा. अमरावती) यांना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी रंगेहाथ पकडले. याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार … Read more

बेकायदा कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा,8 जनावरांची सुटका; 2 संशयित ताब्यात

Karad News 3

कराड प्रतिनिधी । कराड येथील मुजावर कॉलनीत पोलिसांनी बेकायदा कत्तलखान्यावर छापा टाकत आठ जनावरांची सुटका केली असून कत्तल केलेल्या जनावरांचे सुमारे २१० किलोचे अवशेषही जप्त करण्यात आले आहे. तसेच याप्रकरणी दोघांवर कराड शहर पोलिस झालेली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान सिकंदर शेख (वय ३४, रा. चांद पटेल वस्ती, कराड) व समीर जावेद नदाफ … Read more

साताऱ्यातील घरफोडीच्या 5 गुन्ह्यांत सोनारासह चौघांना अटक, 25 लाखांचे 35 तोळे दागिने हस्तगत

Satara News 20240510 135800 0000

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडींच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (एलसीबी) यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार सराईत चोरट्यांसह एका सोनाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून २४ लाख ५० हजार रूपये किंमतीचे ३५ तोळ्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. याप्रकरणी सुनिल उर्फ सुशिल बबन भोसले (रा. दीपक देवानंद मंजरतकर … Read more

दुचाकी चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 1 लाख 40 हजाराच्या किंमतीच्या 2 दुचाकी जप्त

Crime News 20240419 142553 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | वाई पोलिसांच्या पथकाने आज शुक्रवारी केलेल्या धडक कारवाईत दोन दुचाकी चोरट्याला अटक केली. तसेच त्याच्याकडून १ लाख ४० हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी देखील जप्त केल्या. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांस त्यांच्या खास बातमीदारांमार्फत वाई पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा गुन्हा नोंद असलेला संशयित … Read more

सातारा ACB चा डबल बार, महसूल सहाय्यक व खासगी इसमाला लाच घेताना रंगेहात पकडले

Crime News 20240205 233413 0000 jpg

सातारा प्रतिनिधी | सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकाच दिवशी दोन कारवाया करत लाचखोरांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. एका घटनेत महसूल सहाय्यक १० हजाराची तर दुसऱ्या घटनेत वाटप पत्राची सातबाराला नोंद करण्यासाठी २० हजाराची लाच घेताना खासगी इसम सापळ्यात अडकला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक राजेश बनसोडे यांनी दिलेली माहिती अशी, वडीलोपार्जित … Read more