स्वच्छ सर्वेक्षणात कराड, पाचगणी नगरपालिका अव्वल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | केंद्र सरकारतर्फे दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षण’ स्पर्धेत 2023 या वर्षात सातारा जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी नगरपालिकेने देशाच्या पश्चिम विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. दि. 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात देशातील पश्चिम विभागातील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्यप्रदेश या पाच राज्यांमध्ये पालिकांनी सहभाग घेतला होता. त्या पालिकाच्या 50 हजार ते 1 लाख लोकसंख्येच्या आतील नगरपालिकांमध्ये कराड नगरपालिकेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. यापूर्वी 2019, 2020 अशी दोन वर्षे देशात प्रथम, 2021 साली सहावा तर 2022 साली देशात तिसरा क्रमांक पटकावला होता. दरम्यान, या यशाबद्दल पाचगणीसह कराडकर नागरिकांनी जल्लोष साजरा केला.

स्वच्छ सर्वेक्षणात देश आणि राज्य पातळीवर विभागनिहाय क्रमांक दिले जातात. यापूर्वी 2018 साली पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेला स्वच्छ्ता अभियानात पश्चिम विभागात पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2021 आणि आता तिसऱ्यांदा पुरस्कार पटकावत पाचगणीने पुरस्कारांची हॅट्रिक केली आहे. सध्या नगरपालिकेवर प्रशासक आहे.