‘स्वाभिमानी’च्या ‘त्या’ याचिकेवर उद्या मुंबईत सुनावणी; ‘सह्याद्री’च्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काय निर्णय होणार?

0
898
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ५ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निवास थोरात यांचा अर्ज छाननीत अवैध ठरवला होता. त्यावर थोरात यांनी त्यांच्यासह ९ जणांनी प्रादेशिक सहसंचालकांकडे अपील केले होते. त्यात ते अर्ज पुन्हा वैध ठरवले. मात्र, निवास थोरात यांच्या निकाला विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेत रिट पिटिशन दाखल केले आहे. त्यावर उद्या शुक्रवार दि. २१ रोजी मुंबईत उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. यावेळी अपिलावर उद्या दुपारपर्यंत निर्णय होईल. आमची लढाई सत्तेसाठी नसून सत्यासाठी असल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली

सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याचा उद्या दि. २१ रोजी शेवटचा दिवस आहे. दरम्यान, अर्ज मागे घेण्याच्या आदल्या दिवशी काल बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी पुणे प्रादेशिक सहसंचालिकानी निवास थोरात यांच्यासह दहा जणाबाबत दिलेल्या निकालाच्या विरोधात बुधवारी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेथे रिट पिटिशन दाखल केले आहे. त्यावर शुक्रवार दि २१ रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे. वास्तविक पुण्यात अपिलावरील निकालाबाबत स्वाभिमानीच्या राजू शेळके यांनी शंका येत असल्याचे म्हटले आहे.

सह्याद्री सहकारी कारखाना निवडणुकीत २५१ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत काही अर्ज बाद झाले आहेत. अन् २०५ अर्ज उरले. अवैध अर्ज झालेल्या दहा जणांनी पुणे येथील प्रादेशिक सह संचालिका नीलिमा गायकवाड यांच्याकडे अपील केले होते. त्याची १३ मार्च रोजी सुनावणी झाली होती. तर १८ मार्च रोजी त्याचा निकाल लागला असून, १० पैकी ९ अर्ज वैध ठरले आहे. जर ९ अर्ज वैध ठरवले असतील तर इतर जे काही अर्ज अवैध ठरवले त्यांच्या अर्जाची बारकाईने छाननी ना करता त्यातील काही अर्क वैध ठरवता आले असते. ते का नाही ठरवले? पुण्यात सुनावणीवेळी असं काय घडलं की? सुरवातीला अवैध ठरवलेले अर्ज पुन्हा वैध ठरवण्यात आले? अशा परशा राजू शेळके यांनी उपस्थित केला आहे.

मुंबईत उद्या सुनावणीत निकाल आमच्याच बाजूने लागेल : राजू शेळके

निवास थोरात यांच्यासह इतरां विरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात गेलो असून त्या ठिकाणी रिट पिटिशन दाखल केले आहे. आता उद्या शुक्रवार दि २१ रोजी याबाबत सुनावणी घेतली आहे. याबाबत न्यायालयाने उमेदवार निवास थोरात, प्रादेशिक सहसंचालिका नीलिमा गायकवाड, निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार सुद्रिक यांच्यासह २०७ जणांना नोटीस काढली आहेत. त्यात त्यांना हजर रहाण्याचे सांगण्यात आले आहे. न्यायालयात आमच्या बाजूने आमचे वकील सविस्तरपणे आमची बाजू सादर करतील. उद्या न्यायालय जो जागी निर्णय देईल तो आम्हाला मान्य असणार आहे. उद्याचा निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास असल्याचे शेळके यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना सांगितले.