सातारा प्रतिनिधी । पुण्यातील ड्रग्ज प्रकरण, अनधिकृत पब यासह अवैध धंद्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांच्याकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली जात आहे. याच मुद्द्यावरून उत्पादनशुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि काँग्रेस आ. रवींद्र धंगेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. “आम्ही मंत्री शंभूराज देसाईंच्या नोटिसीच्या धमकीला घाबरत नाही, उलट तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू,” असे प्रत्युत्तर अंधारे यांनी दिलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्री देसाई यांनी नोटिसीच्या दिलेल्या इशाऱ्याला प्रत्युत्तर दिले. सुषमा अंधारे म्हणाल्या की, आज विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा भोजवारा उडाला आहे. पब बारच्या संस्कृतीने सगळ्या तरुणाईला विळखा टाकलेला आहे. पुण्यात फक्त अधिकृत २३ पब बार आहेत. मग बाकीचे १०० पब बार कोणाच्या आशीर्वादने चालतात? देसाई “तुमच्या धमकीला मी घाबरत नाही. तुमच्या नोटिसा आम्ही डायपरसाठी वापरू, कुठल्या तोंडाने तुम्ही नोटिसा पाठवत आहात, आम्ही मागील १० महिन्यांपासून ड्रग्जच्या विरोधात आवाज उठवत आहोत. मग कारवाई का होत नाही?”
शंभुराज देसाई मंत्री म्हणून तुम्ही काय काम करता? मात्र, पुण्यातील पब बार माहिती आमच्याकडे आहे. चरणसिंग राजपूत या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याचे निलंबन करून चौकशी झालीच पाहिजे. शंभुराज देसाई तुमच्या अधिकाऱ्यामुळे पुण्याची ओळख अंमली पदार्थ अशी होत आहे. तुम्ही कारवाई केली नाही, तर आम्हांला रस्त्यावर उतरायला लागणार नाही. आमच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका,” असा इशारा सुषमा अंधारे यांनी यावेळी दिला.
चरणसिंग राजपूत आणि शंभूराजे देसाई यांच्यात काय नाते?
यावेळी सुषमा अंधारे यांनी थेट मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर निशाणा साधत त्यांचे आणि चरणसिंग राजपूत यांच्यातील नात्यावरचं प्रश्न उपस्थित केला. “आम्ही या सगळ्यांबाबत आंदोलन करत आहोत. पुण्यात कार अपघात प्रकरण नाही, तर राज्यातील इतर प्रश्नही अधिवेशन काळात ठोस भूमिका घेतल्या जातील. अजून कसले पुरावे देत आहे, आता तर २३ पब बार बाबत माहिती दिली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्याचे वाटोळे केले आहे चरणसिंग राजपूत आणि शंभूराजे देसाई यांच्यात काय नाते आहे, ते मला कळत नाही”, अशी टीका अंधारे यांनी केली.