4 पिढ्यांपासून गणेशमूर्ती बनवणारं कुटुंब; काले पंचक्रोशीतील प्रसिद्ध कारागीर

0
38
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | गणेशोत्सव अवघ्या ४ दिवसांवर आला असून गणेशभक्तांमध्ये मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. प्रत्येकाच्या घराघरात गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे. बाजारात अतिशय सुंदर गणेश मूर्ती विकण्यास आल्या असून बाजारपेठा गणेश मूर्त्यांनी सजल्या आहेत. यंदाच्या वर्षी मूर्तीशिल्पकारांनी प्रतिकूल परिस्थितीतही अतिशय सुंदर, सुरेख मुरट्या बनवल्या आहेत. असच एक कुटुंब आहे कराड तालुक्यातील काले गावातील सूर्यवंशी कुटुंब… मागील ४ पिढ्यांपासून हे कुटुंब गणरायाच्या मूर्ती बनवत आहेत आणि ग्रामीण भागातील लोकांना परवडेल अशा किमतीत त्याची विक्री करत आहेत.

IMG 20250823 WA0005

तर मित्रानो, मागील ४ पिढ्यापासून कराड तालुक्यातील काले गावात सूर्यवंशी कुटुंब हे गणेशाची मूर्ती बनविण्याचा व्यवसाय करते. यंदाही त्यांच्या गणेश मूर्तीला मोठी मागणी आहे. अतिशय आकर्षक आकार, लहान मोठ्या अशा सर्वच प्रकारच्या मुर्त्या आणि त्यांना आकर्षक असा रंग हि सूर्यवंशी कुटुंबाच्या गणेशमूर्तींची खास बाब… म्हणूनच कि काय फक्त काले गावच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीतील लोक प्रकाश सूर्यवंशी यांच्याकडून गणरायाची मूर्ती विकत घेतात. यंदाची हीच परिस्थिती बघायला मिळाली. अनेक गणेश मुर्त्यांचे महिनाभर आधीच बुकिंग झालं आहे. दरवर्षी प्रकाश सूर्यवंशी यांच्या हातून जवळपास ३०० ते ४०० मूर्ती तयार होतात. आकारानुसार छोट्या घरगुती मूर्तींपासून ते मोठ्या मंडळांसाठी ८ ते १० फूट उंच मूर्ती तयार करण्याची त्यांची खासियत आहे.

याबाबत हॅलो महाराष्ट्रने प्रकाश सूर्यवंशी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं कि, आमच्या अनेक पिढ्यांपासून हा व्यवसाय सुरु आहे. आम्ही दरवर्षी ५०० ते ६०० गणेश मूर्ती तयार करतो.. यामध्ये काही शॅडो मातीचे गणपतीही असतात. ग्रामीण भागातील जनतेला परवडेल अशा मोफत दरात आम्ही गणपती मूर्तींची विक्री करतो. लोकांचाही आम्हाला दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो. यावर्षी आम्ही ५५० घरगुती गणपती आणि १५ गणेश मंडळाच्या मूर्ती तयार केल्या आहेत. दिवसरात्र आमचं काम सुरु असते. भविष्यात सुद्धा अनेक मोठमोठ्या गणेश मूर्ती बनवण्याचा आमचा मानस आहे असं प्रकाश सूर्यवंशी यांनी यावेळी म्हंटल.