राज्यातील MBBS म्हणजेच महागाई, बेरोजगारीसह भ्रष्टाचारी सरकारला हद्दपार करण्याची गरज : सुप्रिया सुळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विधानसभेची निवडणूक महत्त्वाची असून ती जिंकण्यासाठी नव्हे तर सत्ता बदलासाठी महत्त्वाची आहे. सध्या महाराष्ट्र गुंतवणूक, उद्योगात एक नंबरला दिसत नाही हे दुर्दैव आहे. मात्र, यावेळी महाविकास आघाडी सरकार बदलणार आहे. या एमबीबीएस म्हणजेच महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचारी सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करुन पारदर्शक, भ्रष्ट्राचार मुक्त महाराष्ट्र करण्याची गरज असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हंटले.

गुरुपौर्णिमेनिमित्त कराड येथील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, संगीता साळुंखे, प्रभाकर देशमुख, देवराज पाटील आदींसह उपस्थित होते.

यावेळी खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरु केली आहे. ते निवडणूक असल्यामुळे महाराष्ट्र फिरत नाही तर कायमच फिरत असतात. आज दुधाला दर नाही, शेती अडचणीत आहे. शेती खात्यात ११८ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे आरएसएस सांगितल्याचे मी वाचले आहे. त्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करुन कारवाई करायला हवी होती. मात्र, ती लावलेली नाही. या सरकराने शेतकऱ्याचे कंबरडे मोडायचे ठरवलेच आहे. महाविकास आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढवणार हे आठ दिवसात महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात येईल.

बारामतीच्या अगोदर साताऱ्याची सीट येणार, असा आमचा सर्व्हे होता. मात्र, दुर्दैवाने पिपाणी आणि तुतारी यात आमच्या पक्षाचे मोठे नुकसान झाले, असे सांगून खासदार सुळे म्हणाल्या, निवडणूक आयोगाकडे आम्ही चिन्हाबाबत हरकत घेतली होती. एकसारख्या चिन्हामुळे दिंडोरीला दीड लाख मते गेली. साताऱ्याला दुसरी पिपाणी नसती तर आज आमचाच खासदार असता. मात्र, विरोधक रडीचा डाव खेळत असतात. वर्ध्याला पिपाणी निवडणूक आयोगाने थांबवली, मात्र साताऱ्याला ती थांबवली नाही. त्यामुळे आमचा पराभव झाला. आम्ही पूर्ण आत्मचिंतन करुन कुठे कमी पडलो याचा विचार करुन पुढे जावू, असे सुळे यांनी शेवटी म्हटले.