उदयनराजेंचा विजय हा महायुतीतील शिलेदारांच्या कष्टाचं फलित – सुनील काटकर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी मिळवलेला विजय हा महायुतीतील सर्व जिल्ह्यातील आमदार, ज्येष्ठ नेते यांचे मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व विधानसभा प्रमुख, सर्व विस्तारक, बूथ प्रमुख विधानसभा समन्वयक व विशेषतः सर्व पक्षांच्या महिला आघाडी पदाधिकारी यांनी घेतलेल्या कष्टाचे फलित म्हणून छत्रपतींच्या राजधानीत क्रांतिकारी शाहूनगरीला प्रथमच जिल्ह्याच्या इतिहासात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून खा. उदयनराजे भोसले यांनी दैदीप्यमान विजय मिळविला, असे प्रतिपादन सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर यांनी केले.

खा. उदयनराजे यांच्या लोकसभा निवडणुक विजयाबद्दल सुनील काटकर पुढे म्हणाले, या निवडणुकीला सामोरे जात असताना सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची भूमिका बजावलेले शहरातील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष नगरसेवक तसेच ग्रामीण भागातील सर्व आजी-माजी सभापती, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, मतदारांना बूथ पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पडणारे महायुती व खासदार उदयनराजेवर प्रेम करणारे सर्वसामान्य मावळे, यांच्या कामगिरीच्या जोरावर हा ऐतिहासिक विजय साजरा करण्याची संधी मिळाली.

वेगवेगळ्या आघाड्यावरती काम करत असताना सैनिक, शिक्षक, वकील, डॉक्टर, कामगार, उद्योग, दलित संघटना यासारख्या विविध संघटनांनी दिलेले योगदान हे या विजयात मैलाचा दगड ठरले. पोस्टल मतदानाद्वारे सैनिकांच्या जिल्ह्यातील सैनिकांनी आपली जबाबदारी चोख बजावत खासदार उदयनराजेंना भरघोस असे मतदान केले. त्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करून या निवडणुकीत हस्ते परहस्ते व ज्ञात अज्ञात नागरिकांकडून झालेले सहकार्य हे देखील तेवढ्याच तोला मोलाचे असून खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या सर्वांचे ऋण व्यक्त केले असल्याचं काटकर यांनी सांगितलं.