सातारा प्रतिनिधी | सातारा येथील शनिवार पेठेतील चहा व्यावसायिक सूरज चंद्रकांत गवळी (वय 30) यांनी घराच्या मागे असलेल्या जनावरांच्या पत्र्याच्या शेडमध्ये (दि. 10) रात्री 11 च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी शैलेश चंद्रकांत गवळी (वय 30, रा. 264, शनिवार पेठ) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
सूरज गवळी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सूरज गवळी यांचा मृतदेह घराच्या मागे असलेल्या या जनावरांच्या पत्र्याच्या शेडमधील लाकडी तुळईला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हवालदार पवार तपास करत आहेत.