सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा कारागृहात ठेवण्यात आका कैद्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार काल सोमवारी घडला. यामुळे एकच खळबळ उडाली. आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा कारागृहातील कैद्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज राजू माने (रा. लश्मीटेकडी, सदरबझार, सातारा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्हा कारागृहात काही कैद्यांना ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी इतर कैद्यांप्रमाणे सुरज राजू माने याला देखील ठेवण्यात आले आहे. सुरज हा सध्या एका गुन्ह्यामध्ये जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे.
कारागृहातील नऊ क्रमांकाच्या खोलीमध्ये त्याला ठेवण्यात आले असता त्याने टॉवेलने स्वतःचा गळा आळवून तसेच गळ्यावर बुक्या मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबतची फिर्याद कारागृहातील शिपाई सतीश बाळासाहेब अब्दागिरे यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हवालदार सुडके करीत आहेत.