कराड प्रतिनिधी । कराड येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयातील कु. सुहानी काळे या विद्यार्थिनीने आईस स्टॉक अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले.
दि. 27 जानेवारी ते 31 जानेवारी 2025 या कालावधीत गुलमर्ग काश्मीर येथे अखिल भारतीय अंतर विद्यापीठ महिला आईस स्टॉक स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या संघाने देखील सहभाग घेतला. या संघात आमच्या महाविद्यालयातील कु. सुहानी काळे (बी.ए. भाग २)हिने प्रतिनिधित्व केले व उत्कृष्ट खेळ करून सुवर्णपदक पटकावले.
या यशाबद्दल संस्थेचं कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिवा मा.शुभांगी गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कौस्तुभ गावडे, सहसचिव (प्रशासन) प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे , महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो (डॉ.) सतीश घाटगे, महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.