सातारा विधानसभा संघातील नव मतदारांची नोंदणी करावी : सुधाकर भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | लोकशाहीत मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी वयाची १८ वर्ष पूर्ण केल्यानंतर नव मतदार नोंदणी करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे मार्फत विशेष पुनरिक्षण कार्यक्रम आगामी विधानसभा निवडणुकीचे पार्श्वभूमीवर नुकताच घोषीत केला आहे. त्याअंतर्गत २६२ सातारा विधानसभा मतदार संघातील नव मतदारांची नोंदणी करावी, असे निर्देश प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी दिले.

शाहू कलामंदिर सातारा झालेल्या बीएलओ पर्यवेक्षकांची नुकतीच महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीला तहसीलदार नागेश गायकवाड उपस्थित होते. १ जुलै २०२४ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र युवा मतदारांकडून ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज भरून घ्यावेत.

सर्व बी. एल ओ मोहीम कालावधीत घरोघरी जाऊन प्रत्यक्ष भेट देणार असून त्याबाबत सर्व मतदारांनी बी.एल.ओ याना सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी भोसले यांनी केले आहे.