मालवणात पार पडली 14 वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा; कराडच्या मुलांनी मिळवले घवघवीत यश

0
2

कराड प्रतिनिधी । सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे नुकतीच १४ वी राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत कराडच्या मुलांनी घवघवीत यश प्राप्त केले.

संगम हेल्थ क्लबच्या जलतरणपटू व्योम पत्की, संहिता करमरकर, मल्हार खामकर, तसेच कराड नगरपालिका तलाव चे जलतरणपटू पृथ्वीराज मोरे व तन्वी शेख यांनी स्पर्धा पूर्ण करून पारितोषिक पटकावले. व्योम पत्की यास १ किलोमीटर स्पर्धेत दोन वेगवेगळ्या प्रकारात पदक मिळाले तर संहिता करमरकर हीला २ किलोमीटर स्पर्धेतील वेगवेगळ्या प्रकारात पदक मिळाले.

मल्हार खामकर १ किलोमीटर, पृथ्वीराज मोरे १ किलोमीटर तसेच, तन्वी शेख २ किलोमीटर यांचा एकाच क्रीम प्रकारात पदक मिळालेले आहे. संगम हेल्थ क्लबच्या जलतरणपटूंना ट्रायथलोन प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय खेळाडू ओंकार ढेरे आणि कराड नगरपालिका तलावच्या जलतरणपटूंना ओंकार भुइंगडे यांनी मार्गदर्शन केले. आमदार डॉ. अतुल भोसले यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले.