सातारा प्रतिनिधी । सातारा येथे उपराकार लक्ष्मण माने यांनी आक्रमक होत सरकारवर निशाणा साधला. “सामान्य, कष्टकरी हेच देशाचे मालक आहेत. जी अडाणी प्रजा आहे ती फार सुजान नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाके व मराठा नेते मनोज जरंगे पाटील हे सरकारकडे जो न्याय मागत आहेत. पण त्यांना सरकार न्याय कुठे देत आहे? सरकार दहा टक्के लोकांच्या हितासाठी चालले आहे. ते ९० टक्के लोकांच्या हितासाठी नाही. ही झुटींगशाही आहे मराठ्यांची. राज्यामध्ये एक फडणवीस तुम्हाला ऐकत नाही, तुम्हाला एका बोटावर नाचवतो. हे वरचे लोक करणार नाहीत. कारण त्यांच्या डोक्यामध्ये वर्ण व्यवस्था, मनुची व्यवस्था आहे, असे उपराकार माने यांनी म्हंटले.
साताऱ्यात लक्ष्मण माने यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या या वांझोट्या भांडणात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. ओबीसी नेते लक्ष्मण हाके व मराठा नेते मनोज जरंगे पाटील हे सरकारकडे जो न्याय मागत आहेत. तो त्यानं मिळाला पाहिजे. गरीब मराठ्याला आरक्षण मिळण्याबाबत माझा विरोध नाही. त्यांना तर मिळालेच पाहिजे. कुणालाही अन्न मिळू नये या मताचा मी नाही. सगळ्यांना मिळाले पाहिजे आणि त्यांच्या हक्काचा मिळाला पाहिजे.
हाकेच्या उपोषणाला मी तात्पुरता पाठिंबा देतो, पण त्यांनी उपोषण करू नये. त्या मार्गाने हा प्रश्न सुटणारा नाही. आपण मिळवण्यासाठी उपोषण करतोय, पण ते व्यर्थ आहे. मग ते जरांगे यांनी करू दे किंवा हाके यांनी करू दे. ते काहीतरी मिळवण्यासाठी उपोषण करत असल्याचे माने यांनी म्हटले.