शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार हातात नवीकोरी पाठ्यपुस्तके

0
261
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शैक्षणिक वर्ष सुरु झाले कि, शाळेच्या पहिलया दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले जाते. दरवर्षीप्रमाणे येत्या शैक्षणिक वर्षात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत धुमधडाक्यात केले जाणार असून विद्यार्थ्यांना गणवेशासह शालेय पुस्तके देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. पुस्तकांचा पुरवठा वेळेत होऊन पहिल्या दिवशी पुस्तके विद्यार्थीच्या हातात पडण्यासाठी तयारी सुरू असून, पहिली ते आठवीच्या वर्गातील विद्यार्थी यासाठी प्रतीक्षेत आहे.

विद्यार्थांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तक मिळावीत यासाठी शिक्षण संचालनालयाकडून प्रयत्न सुरू असून त्यासाठी विद्यार्थी संख्येचा आढावा घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा वेळेत पुस्तकांचे वितरण होणे अपेक्षित आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाते.

आगामी शैक्षणिक क्षेत्रात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. पहिल्या दिवशी शाळेत उपस्थित नसलेल्या विद्यार्थ्यांना नंतरच्या दिवशी पुस्तके दिली जाणार आहेत. त्यामुळे ही पुस्तके कशी मिळणार याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.

पाठ्यपुस्तकांची कोरी पाने वगळली

दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम खिडकपाडी असलेल्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसतील याचा विचार करून दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वयांची कोरे पाणी समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या निर्णयावर शिक्षण क्षेत्रातून टीका करण्यात आली योजनेचा अपेक्षित उद्देश सफल न झाल्याने पाठ्यपुस्तकांमध्ये वयाची कोरी पाने समाविष्ट करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे यंदाच्या आणि त्या पुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके व यांच्या पानांशिवाय उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तालुकास्तरावरून पुस्तके मुख्याध्यापकांकडे

सातारा जिल्ह्यातील शाळांसाठी मागणी केलेली पुस्तके जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात प्राप्त झाल्यानंतर तेथून पंचायत समितीत गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतील. तालुका स्तरावरून ही पुस्तके नंतर केंद्रप्रमुख व तिथून प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांकडे रवाना करण्यात येणार आहे.

पहिली ते आठवीच्या लाखो विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके

जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांची मागणी करण्यात आली आहे विद्यार्थ्यांच्या हातात शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचा संच दिले जाणार असल्याने पुस्तकांची मागणी मार्च महिन्यातच केली जाते. तसेच यंदा देखील पुस्तकांची मागणी केली गेली आहे.

सातारा जिल्ह्यात शाळांची संख्या

विद्यार्थी संख्या : ४ लाख १० हजार
खासगी विनाअनुदानित शाळा : ३२
अनुदानित शाळा : ६१४
जिल्हा परिषद शाळा : २,६८२
नगरपालिका शाळा : ५२