वसंतगडला डोरेमॉनसह छोट्या भीमने केले विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । जिल्ह्यातील २ हजार ६८२ शाळांची पाहिली घंटा शनिवारपासून वाजण्यास सुरुवात झाली. सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मोठ्या थाटामाटात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. कराड तालुक्यात तर काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रतीकात्मक डोरेमॉनसह छोटा भीम, मिली माउस अवतरले होते. कराड तालुक्यातील वसंतगड येथील श्री चंद्रसेन शिक्षण संस्थेच्या विठ्ठल गणोजी माने हायस्कूलमध्ये देखील नवीन विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी व त्यांच्या मनात शाळेबाबत आस्था निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी शिळा परिषद शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव घेतला जातो. यंदाही सातारा जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या वतीने सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभावी व दर्जेदार तसेच उत्सुकतेने होण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कराड तालुक्यातील वसंतगड येथील श्री चंद्रसेन शिक्षण संस्थेच्या श्री विठ्ठल गणोजी माने हायस्कूल व ज्युनि.कॉलेज मध्ये सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात विद्यालयात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे वाजत गाजत तसेच टाळ्यांच्या गजरात व खाऊ वाटप करून स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी देखील काढण्यात आली होती. शाळेतील शिक्षिकांनी विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करत त्यांचे औंक्षण देखील केले. यावेळी शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकाचे शिक्षकांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव श्री. रघुनाथ नलवडे, संचालक तानाजी वाघमारे, मुख्याध्यापक श्री. विवेकचंद्र ढवळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक उपस्थित होते.

अनोख्या पद्धतीच्या स्वागताने भारावले विद्यार्थी

वसंतगड येथील शाळेत विद्यार्थ्यांच्या स्वागताची शनिवारी जय्यत तयारी करण्यात आली होती. ज्या शिक्षकांच्या हातात वर्गात असताना आपण छडी पाहतो. त्यांच्या हट्ट आज फुले आणिचॉकलेट पाहिल्यानंतर विद्यार्थी देखील हरकून गेले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जवळ घेत त्यांना पुस्तके, खाऊ भेट देत त्यांचे स्वागत केले. शिवाय स्वागताला डोरेमॉन, मिकी माउस आणि छोटा भीम यांच्या वेशात आलेल्यांची विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष वेधून घेतले.

WhatsApp Image 2024 06 16 at 11.51.54 AM

विद्यार्थ्यांकडून शाळेच्या उपक्रमाचे कौतुक

विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस असल्याने त्यांचे मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी नव्याने शाळेत प्रवेश घेतला. त्यांचे फुले, खाऊ देऊन उत्साहात स्वागत केले असल्याची प्रतिक्रिया वसंतगड येथील श्री चंद्रसेन शिक्षण संस्थेच्या श्री विठ्ठल गणोजी माने हायस्कूलचे
उपशिक्षक शिवाजी पाटील यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’ शी बोलताना दिली.