काही झालं तरी आम्ही मतदान करणारच; कराडच्या विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतली मतदानाची शपथ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कराड दक्षिण स्वीप पथकाच्या माध्यमातून कराड मलकापूर येथील विधी महाविद्यालयात मतदान जागृती अभियान राबवण्यात आले. देशाचे सुजाण नागरिक असणाऱ्या युवा मतदारांनी मतदान करून लोकशाही बळकट करावी असे आवाहन स्वीप पथकाचे सहाय्यक नोडल अधिकारी सुनील परीट यांनी केले. तसेच मतदानाची गरज व मतदानाचे महत्त्व विविध उदाहरणाद्वारे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी कराड दक्षिण स्वीप पथकातील ऋषिकेश पोटे, संतोष डांगे, सचिन चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. भारताचे भावी आधारस्तंभ असणाऱ्या युवकांनी उत्साहाने मतदान करून लोकशाहीचा सन्मान करावा, असे आवाहन विधी महाविद्यालयातील प्राध्यापक ॲड. संभाजी मोहिते यांनी प्रास्ताविकातून केले. स्वीप पथकातील आनंदराव जानुगडे यांनी युवा मतदारांना मतदान जागृती शपथ दिली.

तसेच मतदानाचा करून निर्धार लोकशाहीला देऊ आधार असे आवाहन केले. विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक खेरनार सर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी विधी महाविद्यालयातील सुजाण युवा मतदार तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.