कराडात 2800 विद्यार्थ्यांसह अवतरले भगतसिंग, राजगुरू अन् सुखदेव…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । आपण सर्वजण 15 ऑगस्ट रोजी ‘स्वातंत्र्यदिन’ साजरा करण्यासाठी सज्ज झालो आहोत. या स्वातंत्र्यदिनाची जय्यत तयारी सध्या शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांच्या ठिकाणी केली जात आहे. उद्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर तसेच भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत कराड येथील शाळा क्रमांक तीनच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीत सुमारे 2800 विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी रॅलीमध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव भारतीय क्रांतिकारकांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कराड येथील शाळा क्रमांक तीनच्या वतीने आज सकाळी नऊ वाजता शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांची उपस्थिती होती. आज शनिवार सकाळची शाळा असल्याने आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रॅलीचे कराडात आज आयोजन करण्यात आले. यावेळी काढन्याय आलेल्या तिरंगा रॅलीत मोठ्या संख्येने विद्यार्थी विविध वेशभूषेत सहभागी झाले होते.

कराड नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 3 मधून काढण्यात आलेली तिरंगा रॅली हि शाळेपासून दत्त चौक, बस स्थानक, यशवंतराव चव्हाण स्मृती सदन, काॅटेज हाॅस्पीटल समोरुन आंबेडकर पुतळा, प्रभात टाॅकीज, न्यायालय मार्गे काढण्यात आली. शेवटी या रॅलीचा समारोप शाळा क्रमांक तीन येथे आल्यानंतर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालकही रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

प्रत्येक व्यक्तीला देशाचा अभिमान वाटला पाहिजे : अर्जुन कोळी

कराड पालिका शाळा क्रमांक तीनच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीनंतर शाळेचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी संवाद साधला. प्रत्येक घरावरती तिरंगा हा लावला पाहिजे. हा देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. त्यांनी दिलेले बलिदान याची पुन्हा आठवण राहावी, त्याबाबत जागृती व्हावी म्ह्णून आज शाळा क्रमांक तिच्या वतीने हर घर तिरंगा हि रॅली काढण्यात आली आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्रातील इतिहासातील अभूतपूर्व अशी रॅली आज काढण्यात आली असून त्याला पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे मुख्याध्यापक कोळी यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले.