सातारा प्रतिनिधी । राज्यातील अनुदानास पात्र शाळातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांची देखील शाळा घेतली जाणार आहे. त्यामुळे शाळेतून अर्ध्यावर बुट्टी मारणे अवघड होणार आहे. राज्यातील अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. तसेच ही अट पूर्ण न करणाऱ्या शाळा, शिक्षकांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तत्काळ बायोमेट्रिक किंवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवने आवश्यक असणार आहे.
शाळेमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत सर्व शाळांना बायोमेट्रिक मशीन देण्यात आले आहेत. आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची हजेरी ही बायोमेट्रिक पद्धतीने घेतली जाणार आहे. राज्यातील सर्व अनुदान प्राप्त शाळांमधील विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे हजेरी बायोमेट्रिक प्रणाली किंवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदणीचे आदेश आहेत.
या प्रणालीमुळे गुरुजींना शिस्त लागण्यास मदत होणार असली तरी गुरुर्जीची अडचण वाढली आहे. पण ते प्रशासनाला बोलत नसले तरी खासगीत या नव्याने येणार असलेल्या प्रणालीला विरोध करत असल्याचा सूर जाणवत आहे.
बायोमेट्रिक हजेरी नसेल तर अनुदानाला कात्री
विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक असताना अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही ते बंधन केले आहे बायोमेट्रिक हजेरी नसेल तर अनुदानाला कात्री लागण्याची ही तजबीज करण्यात आली आहे.
हा नियम कोणत्या शाळांसाठी?
राज्यातील अनुदानास पात्र शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी हा नियम लागू असणार आहे.
शिक्षण विभागाचा नवा आदेश काय?
शिक्षकांची दैनंदिन हजेरी ही बायोमेट्रिक पद्धतीने व्हावी याबाबत शासनाने आदेश काढले आहेत या आदेशाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.
गुरू-शिष्याची हजेरी बायोमेट्रिकवर
शिक्षकाने विद्यार्थ्यांची हजेरी ही आता बायोमेट्रिक पद्धतीने घ्यावी लागणार आहे. मात्र या नव्या नियमांची अंमलबजावणी होईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ही हजेरी बंधनकारक असून शाळेला सुट्टी मारणाऱ्यांची मात्र यामुळे मोठी अडचण होणार आहे.
3 महिने एप्रिलपर्यंत द्यावे लागणार अपडेट
अनुदानित शाळांना बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याबाबत यापूर्वीही सूचना देण्यात आलेल्या आहेत शासन सूचनांच्या अंमलबजावणी बाबतचे अपडेट शाळा व्यवस्थापनाला एप्रिलपर्यंत द्यावे लागणार आहे.