सातारा प्रतिनिधी | करंजे नाका येथील पुलावर आढळून आलेल्या दगडी शिलालेखाचे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात संवर्धन केले जाणार आहे. हा शिलालेख १८४९ सालचा व छत्रपती शहाजी राजे ऊर्फ आप्पासाहेब महाराज यांच्या कारकिर्दीतील आहे.
करंजे पुलावर एक दगडी शिलालेख असल्याची माहिती शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने यांनी दिली होती. त्यानुसार अभिरक्षक प्रवीण शिंदे व कर्मचाऱ्यांनी या शिलालेखाची पाहणी करून त्याचे संग्रहालयात संवर्धन करण्याचा निर्णय घेतला. या शिलालेखाचे अनिल दुधाने यांनी वाचन केले.
शिलालेख १८४९ सालातील असून, छत्रपती शहाजी राजे ऊर्फ अप्पासाहेब महाराज यांच्या कारकिर्दीतील आहे. संग्रहालयातील इतिहास गॅलरीत हा शिलालेख पाहण्याकरिता ठेवण्यात येणार आहे.