जिल्ह्यातील ‘हा’ पूल देतोय शिवरायांनी वापरलेल्या बांधकाम तंत्रज्ञानातील उत्कृष्ट नमुन्याची साक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक अशी ठिकाणे आहेत कि त्या ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा सापडतात. अशा ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक म्हणजे सातारा जिल्ह्यातील जावळी खोऱ्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या कोयना नदी वरील पार्वतीपूर आताच्या पार या गावाजवळ असलेला पूल होय. साधारण 52 मीटर लांबीचा, 15 मीटर उंचीचा आणि आठ मीटर रुंदीच्या या पुलाला पाच दगडी खांब आणि चार कमानी आहेत. या पुलामुळे छत्रपतींसह मावळ्यांचा प्रवास पावसातही सुकर झाला. इतिहासाची साक्ष देणाऱ्या या पुलाला ना कोणतं अत्याधुनिक तंत्रज्ञान ना कोणता इंजिनिअर लागला. असा आखीव रेखीव पूल की सध्याच्या टाय घातलेल्या इंजिनीयरांनाही विचार कारायला लावणारा आहे.

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार गावात हा पूल असून महाबळेश्वरच्या डोंगरातून उगम पवाणारी कोयनानदी पावसाळ्यात रौद्ररुप धारण करते. अशा स्थितीत पर्याची वाहतूक व्यवस्था असावी यासाठी महाराजांनी हा पूल बांधला. या पुलाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे बाजूने पाणी या पुलाखाली जाते. त्या प्रत्येक खांबाला धारदार कुऱ्हाडीसारख्या दगडी भिंती आहेत. हा पूल 52 मीटर लांब तर 8 मीटर रुंद आहे. विशेष बाब म्हणजे फक्त चुन्याचा वापर या पुलाचे बांधकाम करण्यात आले.

bridge 01

शिवरायांच्या काळात बांधलेल्या या पुलाचा उपयोग नंतर कोकणात जाण्यासाठी होऊ लागला. कोकणातील सर्व दळणवळणाची कामं याच पुलावरुन होऊ लागली. गड, किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. याप्रमाणेच महाराजांच्या कारकिर्दीत बांधण्यात आलेला पूल देखील कुतूहलाचा विषय आहे. या पुलाचे बांधकाम इतके मजबूत आहे याची रचना पाहून भले भले इंजिनीअर्स देखील चाट पडतात.

भक्कम बांधकामाचे वैशिष्ट्य

पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने पुलाच्या कमानींना धोका पोहचू नये म्हणून कमानीमधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो. हे सारेच बांधकाम चुन्यात केलेले आहे.सुमारे साडेतीनशे वर्षां नंतरही हा पूल अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभार उंचीचा ३०सेमी/१ फूटी दगडी कठाडा आहे. पाण्याचा प्रवाहाचा तडाखा सोसत, पाणी झिरपण्याच्या धोक्यावर मात करत, काही शतक देखभाल न कराव लागण हेच त्या भक्कम बांधकामाचे वैशिष्ट्य आहे.