सातारा प्रतिनिधी | आंतरजिल्हा बदली शिक्षकांना एक वेतनवाढ देण्यात यावे, अशी मागणी कास्ट्राईब शिक्षक संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागण्यांची दखल न घेतल्यामुळे संघटना आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली झाली आहे अशा सर्व शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्याचा शासनाचा जीआर शासनाने पारित केलेला आहे.
तरी देखील सातारा जिल्ह्यातील आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना अद्यापही वेतनवाढ मिळालेली नाही. तरी प्रशासन जाणूनबुजून सातारा जिल्ह्यातील अशा शिक्षकांवर अन्याय करतंय का प्रश्न शिक्षक वर्गातून निर्माण होत आहे. तरी या सर्व शिक्षकांना लवकरात लवकर एक वेतनवाढ मिळावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.