कराड प्रतिनिधी । कराड तालुक्यातील शामगाव या गावातील ग्रामस्थांनी शेतीच्या पाण्यासाठी अनेकवेळा आंदोलने केली. एकदा तर पायी चालत कराड तहसिलदार कार्यावर मोर्चा काढला.त्यांच्याकडून शेतीच्या पाण्याची करण्यात आलेली मागणीची दाखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी मंगळवार, २४ सप्टेंबर रोजी पाणी प्रश्नास मान्यता दिली. त्यामुळे शामगावच्या शेतीस पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला असल्याने गावातीळ शेतकरी, ग्रामस्थांनी गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतिषबाजी केली.
गावातील ग्रामस्थांनी गावातील मुख्य चौकात एकत्रित येत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतेमेस हार घातला. यावेळी “जोतिबाच्या नावानं चांगभलं, ओंनाथ देवाच्या नावानं चांगभलं, छत्रपती शिवाजी महाराज की जय” असा जयघोष देखील त्यांच्याकडून करण्यात आला.
शामगावचा गेले कित्येक वर्षे शेतीच्या पाण्याचा प्रश्न प्रलंबित होता यासाठी ग्रामस्थ राज्य सरकारने वेळोवेळी मागणी करत होते. शामगाच्या शेतीला १८५० हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे १२५० क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. अखेर महायुतीच्या काळात शामगावाचा पाणी प्रश्न निकालात निगाल्यांने गावात आनंदाचे वातावरण असून भविष्यात मोठा कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे.
शामगाव,पाचुंद गावांना टेंभू योजनेच्या पाण्याचा लाभ मिळणार
सण २०१९ साली शेतीच्या पाण्यासाठी शामगावातील ग्रामस्थांनी शामगांव ते कराड पायी चालत कराड तहसिलदार कार्यावर मोर्चा काढला होता. त्यानंतर एक दिवस चूल बंद आंदोलन देखील केले होते. दि. १ नोव्हेंबर २०२३ ला सर्व पक्षीय ग्रामस्थांनी पाच दिवसाचे अमरण उपोषण केले होते. तेव्हापासून ग्रामस्थ शेतीच्या पाणी प्रश्नासाठी पाठपुरावा करत होते. आज त्यांच्या पाठपुराव्यासखऱ्या अर्थाने यश आले आहे.